मनोरंजन

‘कुमकुम भाग्य’ फेम या अभिनेत्रीकडे आहे गुडन्यूज, पण लॉकडाऊनमुळे सध्या चिंतेत

Dipali Naphade  |  Apr 22, 2020
‘कुमकुम भाग्य’ फेम या अभिनेत्रीकडे आहे गुडन्यूज, पण लॉकडाऊनमुळे सध्या चिंतेत

सध्या लॉकडाऊनमध्ये काही ठिकाणी ब्रेकअपच्या न्यूज येत आहेत तर काही ठिकाणी गुड न्यूज येत आहेत. अशीच एक गुडन्यूज दिली आहे, ‘कुमकुम भाग्य’ फेम शिखा सिंहने. गेले सहा वर्ष आलियाची भूमिका साकारणारी शिखा सात महिन्यांची गरोदर आहे. जून महिन्याच्या शेवटी शिखाकडे गोड पाहुणा येणार आहे. पण सध्या लॉकडाऊनमुळे शिखा काहीशी चिंतेत आहे. तिने याविषयीच आपले मन मोकळे केले आहे. लग्नाच्या चार वर्षानंतर आता शिखा सिंह आणि तिचा नवरा करण शाह आई वडील होणार आहे. एप्रिल महिन्यापासून शिखा मालिकेतून ब्रेक घेणार होती. तिने तसं निर्मात्यांना कळवलंही होतं. मात्र मार्चपासूनच तिला सक्तीची विश्रांती लॉकडाऊनमुळे करावी लागली आहे. गरोदर असल्यामुळे लॉकडाऊनच्या  काळात तिला खूपच काळजी घ्यावी लागत असल्याचं तिने सांगितले आहे.

लग्न तुटल्याच्या बातमीवर गायिका सुनिधी चौहानचं मौन पण…

बाळाची काळजी घेण्यासाठी घेतेय सध्या ऑनलाईन क्लास

शिखाने आपल्या गरोदरपणाबद्दल अगदी मनमोकळेपणाने सांगितले. तिचा नवरा पायलट असल्याने नेहमी बाहेरगावी असतो. मात्र आता या काळात त्याची सर्वात जास्त तिला गरज होती आणि त्यामुळे लॉकडाऊनच्या निमित्ताने करणही सध्या तिच्याबरोबर असून तिची पुरेपूर काळजी घेतो आहे. या काळात तिची आई आणि बहीणही हरयाणावरून येणार होते. मात्र आता ते इतक्यात लवकर शक्य आहे असे तिला वाटत नाही. तिचा नवरा टेक्नोलॉजी एक्स्पर्ट असल्याने त्यांनी घरातील कामांसाठी एक रोबोच आणला आहे. त्यामुळे शिखाला घरकामात जास्त त्रास होत नाही. त्याशिवाय तिला करणही खूप मदत करत असल्याचे तिने सांगितले आहे. केवळ जेवण स्वतः शिखा बनवत असून डॉक्टर आणि हॉस्पिटल दोन्ही घराजवळच असल्याचेही तिने सांगितले आहे. त्यामुळे बाळाची आणि स्वतःची काळजी या काळात कशी घ्यायची याचे सतत ऑनलाईन क्लास ती डॉक्टरांच्या मदतीने घेत आहे. तसंच ती स्वतःची आणि बाळाची काळजी घेत आहे. 

लॉकडाऊनमध्ये प्रियांका चोप्रा अशी घेत आहे स्वतःच्या केसांची काळजी

तिच्यासाठी क्वारंटाईन एक वर्षासाठी वाढणार

शिखाच्या मते तिला हा क्वारंटाईन वर्षभर पाळावाच लागणार आहे. कारण जून महिन्याच्या शेवटी बाळाचा जन्म होईल आणि त्यानंतर तिला बाळाची योग्य काळजी घेण्यासाठी आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी क्वारंटाईन पाळावाच लागणार आहे. तिला एक वर्ष तरी किमान घरातून कुठेही हलता येणार नाही याची तिने मानसिक तयारीही करून ठेवली असल्याचं म्हटलं आहे. घरात बाळ असल्याने कुठे जाता येईल असं आपल्याला वाटत नसल्याचं तिने सांगितलं आहे. शिवाय नावाबद्दल काय विचार केला  आहे असं विचारताच ती म्हणाली अजून तरी काहीही विचार केला नाही. मात्र काही लोकांना या काळात बाळाला जन्म दिल्यानंतर त्याचं नाव कोरोना असं ठेवल्याचे ऐकताच खूपच आश्चर्य वाटल्याचंही तिने सांगितलं. इतक्या भयानक व्हायरसच नाव आपल्या बाळाला कसं काय देऊ शकतात  असंही तिने म्हटलं. शिखा आणि करणने काही वर्षाच्या नात्यानंतर 2016 मध्ये लग्न केलं. गेल्या सहा वर्षापासून आलियाची भूमिका साकरणारी शिखा आपल्या व्यावसायिक आयुष्यात आनंदी असून आता आपल्या खासगी आयुष्यातील एका वेगळ्या भूमिकेत शिरण्यासाठी सज्ज झाली आहे.  आपण अतिशय आनंदी असून आयुष्यातील हे क्षण खूपच एन्जॉय करत असल्याचे तिने सांगितले आहे. 

कर्करोगग्रस्त रुग्णांना केस दान करण्यासाठी या अभिनेत्रीने केले टक्कल

Read More From मनोरंजन