मनोरंजन

लता मंगेशकर यांची मराठी भावगीत | Lata Mangeshkar Marathi Songs

Trupti Paradkar  |  Jan 15, 2022
Lata Mangeshkar Marathi Songs

भारतरत्न गानसम्राज्ञी ‘लता मंगेशकर’ यांची अनेक गाणी (Lata Mangeshkar Marathi Songs)अजरामर आहेत. सुमधूर सुरांनी त्यांनी या गाण्यांमधून संपूर्ण विश्वालाच वेड लावलं आहे. म्हणूनच त्यांना जगभरात गानकोकीळा या नावाने ओळखलं जातं. लतादिदींनी आतापर्यंत मराठी, हिंदी अशा एकूण वीस भाषांमध्ये विविध प्रकारची गाणी गायली आहेत. खरंतर त्यांची सर्वच गाणी सुपरहिट आहेत. मात्र आज आपण मराठी गाणी लता मंगेशकर पाहणार आहोत. तुम्ही जर संगीतप्रेमी असाल तर तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच हवी लता मंगेशकर मराठी गाणी (Lata Mangeshkar Marathi Songs).

गजानना श्री गणराया

Lata Mangeshkar Marathi Songs

लवकरच गणेशोत्सवाला सुरूवात होईल. गणेशोत्सवामध्ये अगदी आवर्जून हे गाणं सर्व ठिकाणी लावलं जातं. कारण या गाण्यातून बाप्पाची मनोभावे प्रार्थना केलेली आहे. भगवान गणेशाचं हे सुंदर वर्णन लतादिदींनी आपल्या सुमधुर सुरात केलेलं आहे. हे गाणं (Lata Mangeshkar Marathi Songs) कधीही ऐकलं तरी मन बाप्पाच्या चरणी लीन होऊ शकतं इतकी या शब्द आणि सुरांमध्ये ताकद आहे. 

गीतकार – शांता शेळके

संगीतकार – पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर 

गायिका – लता मंगेशकर

गीतप्रकार – भक्तीगीत

चिंब पावसानं रान झालं आबादानी

Lata Mangeshkar Marathi Songs

मुसळधार पाऊस, प्रणयगीत आणि मराठी भावगीते लता मंगेशकर (Lata Mangeshkar Marathi Bhavgeet) यांचं नेहमीच एक छान नातं असतं. पावसाला सुरूवात झाली की वृक्षवल्ली, पशू-पक्षी आणि  प्रेमी युगुलांच्या प्रेमाला उधाण येतं. या गाण्यातून हा प्रणय खूप सुंदर पद्धतीने मांडण्यात आलेला आहे. आजही पावसाला सुरूवात झाली की हे गाणं प्रत्येकाच्या मनात सर्वात आधी रुंजी घालतं. लता दिदींनी या गाण्याला स्वरताज चढवलेला आहे.  

गीतकार – ना. धों. महानोर

संगीतकार  – पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर

गायिका – लता मंगेशकर

चित्रपट – सर्जा

गीत प्रकार – प्रेमगीत

ऐरणीच्या देवा तुला

Lata Mangeshkar Marathi Songs

भालजी पेंढारकर यांच्या साधी माणसं या चित्रपटातील हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. या गाण्याच्या निर्मितीची सुद्धा एक सुंदर कथा आहे. या चित्रपटातील मराठी भावगीत लता मंगेशकर (Lata Mangeshkar Marathi Bhavgeet) थीम सॉंग लिहण्यासाठी भालजी पेंढारकर यांनी खेबूडकरांना शाळेत तास सुरू असताना तातडीने बोलावून घेतलं होतं. लोहारकाम करणारं जोडपं, नवऱ्याबाबत बायकोच्या मनात असेललं निस्सीम प्रेम, लोहारांचा देव अशी सुंदर मांडणी यात करण्यात आलेली आहे. काळ बदलला तरी लता दिदींच्या आवाजातील हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. 

गीतकार – जगदीश खेबूडकर

संगीतकार – आनंदघन

गायिका – लता मंगेशकर

चित्रपट – साधी माणसं

गीतप्रकार – चित्रपटगीत

श्रावणात घन निळा

Lata Mangeshkar Marathi Songs

निसर्गाची विविध रूपं आणि त्यावर अनेक गाणी आतापर्यंत रचण्याच आलेली आहेत. मात्र श्रावणातील गाण्यांची बातच न्यारी आहे. श्रावण महिना आला की या गाण्याची आठवण आली नाही असं मुळीच होत नाही. मराठी भावगीत लता मंगेशकर या गाण्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत. 

गीतकार – मंगेश पाडगांवकर

संगीतकार – श्रीनिवास खळे

गायिका – लता मंगेशकर

गीतप्रकार – भावगीत

आज गोकुळात रंग खेळतो हरी

Lata Mangeshkar Marathi Songs

श्रावण महिना सुरू झाला की त्यासोबतच विविध सणसमारंभानां सुरूवात होते. गोकूळ अष्टमीसाठी कृष्णाच्या विविध लीलांवर आधारित गाणी , गवळणी प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच एक सुपरहिट गाणं म्हणजे आज गोकुळात रंग खेळतो हरि. या गाण्यातून लता दिदींनी कृष्णाच्या लीला आणि राधिकेता भक्तीभाव सुंदर व्यक्त केला आहे.

गीतकार – सुरेश भट

संगीतकार – पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर

गायिका – लता मंगेशकर

गीतप्रकार – भावगीत

लटपट लटपट तुझे चालणे

Lata Mangeshkar Marathi Songs

स्त्रीचे सौंदर्य आणि साजसृगांर यांचा मराठीतील लावणी या गीतप्रकारात आवर्जून उल्लेख आढळतो. या लावणीचं वैशिष्ठ्यं हे की यातून तिच्या विविध भावभावनांचे अविष्कार मांडण्यात आले आहेत. हे गाणं लता मंगेशकर यांनी गाऊन त्याला आणखीनच स्वरताज चढवला आहे. 

गीतकार – शाहीर होनाजी बाळा

संगीतकार – वसंत देसाई

गायिका – लता मंगेशकर 

चित्रपट – अमरभूपाळी

गीतप्रकार – लावणी

वेडात मराठे वीर दौडले

Lata Mangeshkar Marathi Songs

महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराज हे एक अतूट नातं आहे. संगीतातही पोवाडा, स्फूर्तीगीतांमधून हा वर्षानूवर्ष महाराजांच्या वारसा जपण्यात आलेला आहे. स्वराज्याच्या शौर्यकथेचं पुष्प या गाण्यात गुंफण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र दिन अथवा महाराजांच्या जयंतीनिमित्त  सार्वजनिक ठिकाणी हे गाणं आवर्जून लावण्यात येतं. या गाण्यातून दिदींच्या आवाजाची एक तीक्ष्ण सुरेल धार जाणवते.

गीतकार – कुसुमाग्रज

संगीतकार – पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर 

गायिका – लता मंगेशकर 

गीतप्रकार – स्फूर्ती गीत

मोगरा फुलला

Lata Mangeshkar Marathi Songs

महाराष्ट्राला संत वाङ्‌मय आणि अभंगांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. संत ज्ञानेश्वर म्हणजे संताचे शिरोमणी… त्यांनी रचलेला हा सुंदर अंभग लता दिदींच्या स्वरात ऐकणं हा एक सुंदर अनुभव आहे. ही संतवाणी ऐकताना तुमचे मन आपोआपच परमेश्वराच्या चरणी स्थिर होते. 

गीतकार अथवा रचना – संत ज्ञानेश्वर 

संगीतकार – पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर

गायिका – लता मंगेशकर

गीतप्रकार – संतवाणी

मी रात टाकली

Lata Mangeshkar Marathi Songs

काही चित्रपट आणि गाणी ही अजरामर होण्यासाठीच त्यांची निर्मिती होत असते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे जैत रे जैत हा चित्रपट आणि त्यातील सर्वच गाणी. मी रात टाकली हे गाणं एक स्मिता पाटील यांच्यावर चित्रीत करण्यात आलं होतं. लता मंगेशकर यांचा आवाज आणि स्मिता पाटील यांच्या अप्रतिम सौंदर्याचा याचा सुंदर मिलाप यात आढळतो. 

गीतकार – ना. धों. महानोर

संगीतकार – पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर

गायिका आणि गायक – चंद्रकांत काळे, लता मंगेशकर आणि रविंद्र साठे

चित्रपट – जैत रे जैत

गीतप्रकार – चित्रपटगीत

मेंदीच्या पानावर

Lata Mangeshkar Marathi Songs

लग्न आणि त्यावेळेस नववधूच्या मनात  असलेली भावना यांचं सुंदर वर्णन या गीतातून करण्यात आलेलं आहे. लता मंगेशकर यांनी त्यांच्या सुरेल आवाजात या भावना या गीतातून मांडलेल्या आहत.  पूर्वी लग्नकार्यात हे गीत आवडीने लावलं जायचं. लता मंगेशकर मराठी गाणी ऐकायची असतील हे गाणं जरूर ऐका 

गीतकार – सुरेश भट

संगीतकार – पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर

गायिका – लता मंगेशकर

गीतप्रकार – भावगीत

चाफा बोलेना

Lata Mangeshkar Marathi Songs

तुमच्यापैकी अनेकांना हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकण्याची नक्कीच आवड असेल. कारण लता दिदींनी स्वरबद्ध केलेलं हे गाणं आजही अजरामर आहे. पुढच्या अनेक पिढ्या हे गाणं तितकंच लोकप्रिय असेल याची अनेकांना खात्री आहे. याचं कारण म्हणजे या गाण्यातील शब्दांचा  अर्थ आणि ते स्वरातून मांडण्याची दैवी शक्ती असलेल्या लता मंगेशकर

गीतकार – कवी बी

संगीतकार – वसंत प्रभू

गायिका – लता मंगेशकर

गीतप्रकार – भावगीत

जीवनात ही घडी

Lata Mangeshkar Marathi Songs

जीवन जगताना असे अनेक क्षण येतात जे कधीच संपू नयेत अथवा पुढे जाऊ नयेत असं आपल्याला वाटत असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात असा क्षण कधी ना कधी तरी येतच असतो. आयुष्याच्या प्रत्येक आनंदी क्षणात या गाण्याची आठवण तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही.

गीतकार – यशवंत देव

संगीतकार- यशवंत देव

गायिका – लता मंगेशकर

चित्रपट – कामापुरता मामा

गीतप्रकार – चित्रपटगीत

घन ओथंबून येती

Lata Mangeshkar Marathi Songs

लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्यातून निसर्गाचं मोहक रूप सुंदर पद्धतीने  टिपण्यात आलं आहे. त्यामुळे जेव्हा माणूस निसर्गाच्या सानिध्यात असतो तेव्हा त्याच्या मनात हेच गाणं सतत सुरू असतं. तुम्ही देखील निसर्गवेडे असाल तर हे गाणं तुमच्या प्ले लिस्टमध्ये असायलाच हवं.

गीतकार – ना. धों. महानोर

संगातकार – पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर

गायिका – लता मंगेशकर 

गीतप्रकार – भावगीत

लेक लाडकी या घरची

लता मंगेशकर मराठी भावगीते

मुली म्हणजे घरचा प्राण असतात. मात्र त्या जेव्हा लग्न करून सासरी जातात तेव्हा आईवडीलांच्या मनात काहूर निर्माण करतात. आपल्या मुलींचा संसार सुखाचा व्हावा असं प्रत्येक आईवडीलांना वाटत असतं. मात्र जेव्हा लेक लग्नाच्या बोहल्यावर चढते तेव्हा  त्यांना नेमकं काय वाटतं ते या गाण्यातून मांडण्यात आलेलं आहे. लता दिदींचे हेही गाणं फारच लोकप्रिय आहे.

गीतकार – पी. सावळाराम

संगीतकार – वसंत प्रभू

गायिका – लता मंगेशकर

चित्रपट – कन्यादान

गीतप्रकार – चित्रपटगीत

सख्या रे घायाळ मी हरणी

Lata Mangeshkar Marathi Songs

लता मंगेशकर यांनी आपल्या स्वरातून या गाण्याला आजही जिवंत ठेवलं आहे. सामना चित्रपटात नायिकेने घातलेली साद प्रेक्षक आणि ऐकणाऱ्यांच्या ह्रदयाला पार चिरत जाते. या गाण्यातील आर्त भावांनी त्याला एका वेगळ्या उंचीवर पोहचवलेलं आहे.लता मंगेशकर मराठी गाणी टॉप लिस्टमध्ये हे गाणं नक्की सेव्ह करा.

गीतकार – जगदीश खेबूडकर

संगीतकार – भास्कर चंदावरकर 

गायिका आणि  गायक – लता मंगेशकर आणि रविंद्र साठे

चित्रपट – सामना

गीतप्रकार – चित्रपटगीत

फोटोसौजन्य आणि गाण्यासाठी सौजन्य – इन्स्टाग्राम आणि  युट्यूब

अधिक वाचा –

दिवसाची सुरूवात करा या पहाटेच्या भक्ती गीतांनी – Morning Devotional Songs In Marathi

मराठीतील बहारदार लावण्या (Best Marathi Lavani Songs In Marathi)

लग्नसराईमध्ये या 15 गाण्यांनी मोहरेल नववधूचे मन (Marathi Wedding Songs)

Read More From मनोरंजन