आरोग्य

‘मदर्स डे’ (Mother’s Day) निमित्त जाणून घ्या विटामिन डी चे आईसाठी असणारे महत्त्व

Dipali Naphade  |  May 6, 2021
‘मदर्स डे’ (Mother’s Day) निमित्त जाणून घ्या विटामिन डी चे आईसाठी असणारे महत्त्व

सध्याच्या परिस्थितीत गर्भवती असणाऱ्या महिलांनी आपली विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कोविड काळात ज्या महिला गर्भवती आहेत आणि आई होणार आहेत, त्यांच्यासाठी मदर्स डे (Mother’s Day) च्या निमित्ताने विटामिन डी चे नक्की काय महत्त्व आहे हे आम्ही पटवून देण्याचा प्रयत्न या लेखातून करत आहोत. आम्ही यासंदर्भात डॉ. चिराग बोराना, मसिना रूग्णालयातील सल्लागार ऑर्थोपेडिक सर्जन आणि जॉईंट रिप्लेसमेंट तज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली. मदर्स डे च्या निमित्ताने खरं तर प्रत्येक महिलेला आई असताना स्वतःची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असते हे समजून घेणेही गरजेचे आहे. आई आणि बाळ या दोघांनाही विटामिन डी अत्यंत उपयुक्त आहेत. विटामिन डी ची कमतरता ही तुमच्यासाठी योग्य नाही. योग्य पोषण आणि व्यायाम या दोन्हीची जागरूकता होणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. 

कोरोनाविरूद्ध प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर प्या हे ज्युस

विटामिन डी ची कमतरता करते सर्व अवयवांवर परिणाम

Freepik

हाडांच्या विकासासाठी आणि वाढीसाठी विटामिन डी आवश्यक असते हे सर्वांनाच सामान्य ज्ञान आहे. पण डॉ. चिराग यांनी सांगितल्याप्रमाणे अलीकडे करण्यात आलेल्या संशोधनात सिद्ध झाले आहे की, विटामिन डी ची कमतरता ही सर्व अवयव प्रणालींवर परिणाम करते. केवळ रक्त अथवा हाडांवरच त्याचा दुष्परिणाम होतो असं नाही तर संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम जाणवतो. हाडांमध्ये वेदना, वाढ मंदावणे हे विटामिन डी च्या कमतरतेचे मुख्य लक्षण आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा आई होणार असता तेव्हापासूनच तुम्हाला शरीरामध्ये विटामिन डी व्यवस्थित प्रमाणात सुरू करायला हवे. जेणेकरून आई म्हणून तुमची आणि तुम्ही तुमच्या बाळाची योग्य काळजी घेऊ शकता. तुम्हाला दोघांनाही योग्य पोषण मिळणे अत्यंत गरजेचे आहे. विकसित देशांमध्ये विटामिन डी ची कमतरता असल्यामुळे होणारे आजार कमी असले तरीही या गोष्टीकडे दुर्लक्ष करून अजिबातच चालणार नाही. अपुरे विटामिन डी असणाऱ्या मातांना जन्मलेल्या अर्भकाच्या हाडांच्या अयोग्य वाढीचा धोकाही संभवतो. त्यामुळे त्याकडे व्यवस्थित लक्ष देणे गरजेचे आहे असं मत डॉ. चिराग यांनी मांडले आहे. त्यामुळे कोणत्याही वयात विटामिन डी ची पातळी ही योग्य राखणे महत्त्वाचे आहे. 

कोरोनाच्या काळात कशी घ्याल तुमच्या हाडांची काळजी

विटामिन डी ची पातळी कशी राखावी?

संतुलित आहार आपल्याला शरीराच्या 10% विटामिन डी देण्याची मदत करू शकतो. पण उर्वरित 90% मिळविण्यासाठी आपण सूर्यकिरणांची मदत घ्यायला हवी. सकाळच्या वेळी नियमित आपण सनस्क्रिनचा वापर करून काही काळ स्वतःला सूर्यप्रकाशामध्ये घेऊन जाणे आवश्यक आहे. आपली त्वचा आधीच गडद आणि सावळ्या रंगाकडे झुकणारी असली तरीही सकाळच्या कोवळ्या उन्हात तुम्ही रोज किमान अर्धा तास तरी चालायला हवे. तुमच्या अंगावर ही सूर्याची किरणे येणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला योग्य क्षमतेते विटामिन डी मिळते. सध्या कोविड (Covid 19) काळात हे कसे जमणार असाही विचार तुमच्या मनात येईल. ते खरं आहे. तसंच कोविड आणि विटामिन डी  चा काही संबंध आहे का? असाही प्रश्न येऊ शकतो. यासंबंधात डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पुरसे जीवनसत्व आणि खनिजांचे प्रमाण राखणाऱ्या लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती तुलनेने मजबूत असते. म्हणूनच विटामिन डी ची पातळी राखणे गरजेचे आहे. जेणेकरून आपली रोगप्रतिकारकशक्ती निरोगी ठेवण्यास याचा उपयोग होतो. कारण जीवनसत्व डी हे शरीरातील सर्व सिस्टिममध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. सध्या कोविड काळात बाहेर जाणे कठीण असले तरीही आहारातून तुम्ही नक्कीच याची पातळी वाढवू शकता. त्यामुळे या मदर्स डे च्या दिवशी सर्व आई आणि गर्भवती असणाऱ्या महिलांनीही लक्षात घ्यावे की कोविडमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्वास्थ्यासाठी विटामिन डी ची कमतरता होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे हे लक्षात ठेवावे. 

मग या मदर्स डे ला आईला शुभेच्छा द्या आणि तिची काळजी घेण्यासाठी हा लेख तिच्यासोबत नक्की शेअर करा.

ड जीवनसत्व, मानसिक आरोग्य आणि उच्च रक्तदाब यांचा परस्पर संबंध काय, तज्ज्ञांचे मत

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य