आरोग्य

महामारीनंतर जीवनशैली झाली आहे सुस्त, तज्ज्ञांचे मत

Dipali Naphade  |  Sep 8, 2021
sluggish lifestyle

गेली दोन वर्ष घरातून काम अर्थात WFH, सेल्फ-आयसोलेशन, क्वारंटाईन यामुळे बहुतेक लोकांसाठी दैनंदिन आयुष्य जगणे यामध्ये एक प्रकारे निष्क्रिय जीवनशैली निर्माण झाली आहे. गतिहीन वर्तनामुळे शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. याच्या परिणामस्वरूप कंटाळवाणी आणि सुस्त जीवनशैली निर्माण झाली आहे. याचा नक्की काय परिणाम शरीरावर होत आहे याबाबत आम्ही डॉ. प्रियंका शास्त्री, कन्सल्टंन्ट फिजिओथेरपिस्ट, मसीना हॉस्पिटल यांच्याकडून जाणून घेतले. कारण सध्या अनेकांना वेगवेगळे आजारही यामुळे उद्भवत आहेत. विशेषतः अनेक लोकांना मानसिक आजारालाही यामुळे सामोरं जावं लागत आहे.

अधिक वाचा – खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव कारणांमुळे वंधत्वाच्या समस्येत वाढ

काय होत आहेत परिणाम

डॉक्टरांशी चर्चा करताना त्यांनी सांगितले की, एकदा आपण अधिक कार्य न करण्याच्या नित्यक्रमात शिरलात की आपण काही दिवसातच त्याचे परिणाम जाणवू शकतात. शारीरिक हालचालींचा अभाव, दीर्घ वेळ चालणारे कामकाज यामुळे होणाऱ्या झोपेचे स्वरूप विस्कळीत होते. वाढलेला ताण आणि घरात असल्यामुळे सतत खाणे, तोंडावर ताबा न राहणे या सगळ्या गोष्टींनी परिस्थितीला आणखी गुंतागुंतीचे बनविले आहे. तसेच, गतिहीन जीवनशैलीमुळे कार्डिओ-वास्क्युलरची कामगिरी कमजोर होते. ज्या लोकांच्या शरीराची हालचाल होत नाही अशा लोकांमध्ये हार्ट रेट उच्च असते आणि सक्रिय व्यक्तींपेक्षा ऑक्सिजनचा वापर ही कमी असतो. शरीराला मिळणाऱ्या पोषक घटकांचे ऊर्जेमध्ये रुपांतर करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने, कमी ऑक्सिजीनेशनसह ऊर्जादेखील कमी होते. उच्च हार्ट रेटसह थकवा येतो. ‘हे तुमच्या हृदयासाठी अत्यंत वाईट आहे. त्यामुळेच सध्या हार्ट अटॅकचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. त्यात भर म्हणून, यामुळे सतत बसून किंवा पडून राहिल्यामुळे पाठदुखी आणि जॉईंट स्टीफनेसदेखील वाढू शकतो.

अधिक वाचा – गर्भधारणेसाठी करताय प्रयत्न, मग वेळीच बदला आहाराच्या चुकीच्या सवयी

या लहानशा गोष्टीनेही पडेल फरक

पण तुम्हाला यामध्ये काही फरक हवा असेल तर तुम्ही घरबसल्या ही एखादी लहानशी गोष्ट नक्की अंगवळणी पाडून घ्या. थोड्या प्रमाणात काही गोष्टींमध्ये बदल करून किंवा दिनचर्या बदलून, आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होऊ शकतो. यामुळे जीवनशैली सक्रिय होण्यास मदत होऊ शकते.

तुम्हीही घरबसल्या काम करताना मध्ये उठत नसाल तर या टिप्सचा उपयोग करा. अन्यथा तुमच्या शरीरावर आणि मनावर होणारा परिणाम हा पुढच्या आयुष्यासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे वेळीच स्वतःला सावरा आणि योग्य ते पाऊल उचला.  तुमच्या शरीराची काळजी तुमच्यापेक्षा अन्य कोणीही करू शकत नाही. त्यामुळे दिनचर्येत हा लहानसा बदल नक्की घडवून आणा आणि स्वतःच्या शरीराची काळजी घ्या. 

अधिक वाचा – दीर्घायुषी व्हायचं असेल तर आताच स्वतःला लावा ‘या’ चांगल्या सवयी

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य