प्रत्येक महिलेसाठी मासिक पाळी (Menstrual Cycle) हा अत्यंत नाजूक विषय आहे. काही महिलांना या काळात अधिक रक्तस्राव होतो तर काही महिलांना अगदी साधारण रक्तस्राव होतो. काही महिलांना दर महिन्यात कमी – अधिक प्रमाणात रक्तस्राव होत असतो. खरं तर मासिक पाळीच्या दिवसात ज्या महिलांना कमी रक्तस्राव होतो त्यांना ही समस्या तणाव अथवा कमी वजनामुळे उद्भवू शकते. तसंच ही समस्या गरोदरपणासंबंधित अथवा हार्मोन्सच्या चढउताराच्या बाबतीतही संकेत देत असते. महिलांना मासिक पाळीच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मासिक पाळीत कमी रक्तस्राव होणे ही समस्या तणावामुळे निर्माण होते. पण याचा उपाय तुम्ही घरी करू शकता. मासिक पाळीच्या दिवसात तुमचे ब्लिडिंग अर्थात रक्तस्राव योग्य होण्यासाठी तुम्ही या सोप्या उपायाचा वापर करू शकता. कमी रक्तस्रावाचा त्रास असेल तर तुम्ही अपान मुद्राची मदत घेऊ शकता.
काय आहे अपान मुद्रा आणि कसा होतो उपयोग?
तुम्हीही कमी रक्तस्रावाच्या समस्येपासून त्रस्त असाल तर तुमच्यासाठी सोपा उपाय म्हणजे अपान मुद्रा (Apan Mudra). अपान मुद्रा अपान वायु मुक्त करते आणि रक्तस्राव व्यवस्थित होण्यास सक्षम करते. अपान वायु हे विसर्गासाठी जबाबदार ठरते. बेंबी आणि ओटीपोट यातील मधल्या अंगांना नियंत्रित करण्याचे काम हे करते. त्यामुळे अपान वायु मासिक पाळीचे रक्त, मल, मूत्र याचे व्यवस्थित विसर्ग करू शकते. अपान अर्थात वात जे आपल्या शरीरातील खालच्या भागात असते आणि मुद्रा अर्थात पोझ. अपान मुद्रेला पाचनशक्ती मुद्रादेखील म्हटलं जातं. याचा कसा उपयोग करून घ्यायचा पाहूया.
अपान मुद्रेची पद्धत (How To Do Apan Mudra)
- अपान मुद्रा करण्यासाठी तुम्ही आरामात बसा
- आपले दोन्ही हात आपल्या मांडीवर घ्या आणि नंतर आकाशाच्या दिशेने वर न्या
- त्यानंतर मध्यमा आणि अनामिका (मधलं बोट आणि साखरपुड्याच्या अंगठीचे बोट) दुमडा आणि अंगठ्याच्या वरच्या भागाला हे टेकवा
- लक्षात ठेवा, यादरम्यान तर्जनी आणि करंगळी संपूर्णतः स्ट्रेच करावी
- असे दोन्ही हाताने करा
- हे आसन करत असताना तुम्ही तुमचे दोन्ही डोळे बंद करून घ्या
- हळूहळू श्वास घ्या आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा
- लक्षात ठेवा की, ही मुद्रा साधारण 5 मिनिट्सपर्यंत तुम्ही करावी
अपान मुद्रेचे फायदे (Benefits of Apan Mudra)
- अपान मुद्रा तुमच्या मासिक पाळीत रक्तस्राव वाढण्यास मदत करते
- तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास कमी करते
- मूत्राचा त्रास होत असल्यास, यापासून सुटका मिळवून देते
- तुम्हाला दिवसभर ताजेतवाने राहण्यास फायदेशीर ठरते
- शरीरातील पृथ्वी आणि आकाश तत्व संतुलित राहण्यास मदत करते
- पोटाचा खालचा भाग, पेल्विकचा भाग आणि त्याचे कार्य नियंत्रित करण्यास याची मदत मिळते
काय घ्यावी काळजी (Care While Doing Apan Mudra)
- गर्भवती महिलांनी या मुद्रेचा वापर करू नये
- तसंच तुम्हाला दस्ताचा त्रास होत असेल तर तुम्ही ही मुद्रा करू नये
तुम्हालाही मासिक पाळीदरम्यान कमी रक्तस्राव होत असेल आणि योग्य ब्लिडिंग व्हायला हवे असेल तर तुम्ही या मुद्रेचा वापर करावा. हा सोपा उपाय आहे. तुम्ही कधीही मुद्रा केली नसेल तर तुम्ही तुमच्या तज्ज्ञांकडून याबाबत जाणून मगच याचा वापर करावा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक