मनोरंजन

माधुरी दीक्षितचा डिजिटल डेब्यू, अनामिकाचा घेणार शोध

Trupti Paradkar  |  Mar 3, 2021
माधुरी दीक्षितचा डिजिटल डेब्यू, अनामिकाचा घेणार शोध

धक धक गर्ल माधुरी दीक्षितला पाहिल्यावर आजही अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. तिच्या अभिनय आणि नृत्याचे अनेक चाहते आहेत. जेव्हा जेव्हा ती कमबॅक करते तेव्हा तेव्हा तिच्या चाहत्यांना अपरिमित आनंद होत असतो. कलंक या चित्रपटानंतर माधुरी बराच काळ कोणत्याच चित्रपटातून दिसली नाही. आता मात्र चाहत्यांसाठी तिने एक महत्त्वाची गोष्ट शेअर केली आहे. माधुरी दीक्षित डिजिटल प्लॅटफॉर्मवरून एन्ट्री करत आहे. करण जोहर निर्मित एका वेब शोमधून लवकर ती प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. सोशल मीडियावर ही गोष्ट व्हायरल झाली तेव्हापासून माधुरी यासाठी चर्चेत होती. आता मात्र यावर खऱ्या अर्थाने अधिकृत शिक्कामोर्तब झालं आहे. माधुरीने स्वतः ही गोष्ट तिच्या ट्विटरवरून शेअर केली आहे. तिचं हे ट्विट पाहून चाहत्यांना आता तिच्या या डिजिटल डेब्यूची नक्कीच घाई झाली आहे. 

माधुरीचा कमबॅक

करण जोहरने बराच काळ कोणतीच घोषणा केली नव्हती. मात्र त्याने आता त्याच्या आगामी प्रोजेक्टची अधिकृत घोषणा केली आहे. माधुरी दीक्षितसोबत एत धमाकेदार शो करत असल्याचं सांगत त्याने त्याच्या इतर आणखी चार प्रोजेक्टविषयी माहिती दिली. या सर्व घोषणेमध्ये सर्वात आकर्षक घोषणा होती ती म्हणजे माधुरी दीक्षितचा डिजिटल डेब्यू. खरंतर दिग्दर्शक बजॉय नांबियार आणि करिश्मा कोहली यांनी या वेब शोवर मागच्या वर्षीच काम करण्यास सुरूवात केली आहे. मात्र करणच्या धर्मा प्रॉडक्शनने याबाबत कोणतीच अधिकृत घोषणा आजवर केली नव्हती. या वेबसिरिजचं नाव ‘फायडिंग अनामिका’ असं असणार आहे. हा एक रहस्यमय ड्रामा असून यामध्ये माधुरीसोबत संजय कपूर, मानव कौल मुख्य भूमिकेत असणार आहेत. 

करणचे इतर प्रोजेक्ट

करण जोहरने यासोबतच आणखी चार प्रोजेक्टची घोषणा केली आहे. ज्यामध्ये तो चित्रपटमालिका करणार आहे. या मालिकेत चार शॉर्ट फिल्म एकत्र असतील. ज्यांचे दिग्दर्शन करणार आहेत शशांक खेतान, नीरज घेवन, राज मेहता आणि कायोदे इराणी. या चारपैकी ‘मजनू’ मध्ये जयदीप अहलावात आणि फातिमा शेख असणार आहे, ‘खिलौना’मध्ये नुसरत भरूचा आणि अभिषेक बॅनर्जी असणार आहे, ‘गीली पुच्ची’ मध्ये कोंकणा सेन शर्मा आणि आदिती राव हैदरी असणार आहे, ‘गीली पुच्ची टू’मध्ये शेफाली शाह आणि मानव कौल असणार आहे. 

या वर्षी असणार मनोरंजनाची धमाल

करण जोहर अतरंगी फिल्स यासोबतच ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ हा चित्रपट तयार करत असल्याचीही घोषणा केली. ज्यात सान्या मल्होत्रा आणि अभिमन्यु दास मु्ख्य भूमिकेत असतील. या चित्रपटाचं दिग्दर्शन विवेक सोनी करणार आहेत. यासोबतच धर्मा प्रॉडक्शन ओशोची सहाय्यक असलेली मॉं आनंद शीला यांच्यावरही एक डॉक्टुमेंट्री बनवणार आहे. यात मॉं आनंद शीलाच्या घरी परत येण्यावर फोकस केला जाणार आहे. यासोबत धर्मा प्रॉडक्शन ‘फॅब्युलस लाईव्ह ऑफ बॉलीवूड वाईफ्स’चा दुसरा सीझनही लवकरच बनवणार आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षी धर्मा प्रॉडक्शनच्या एका पेक्षा एक चित्रपट आणि वेबसिरिज प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज असतील.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

गायिका हर्षदीप कौर झाली आई, मुलगा झाल्याचे सोशल मीडियावर जाहीर

अंकुश चौधरीची नवी भूमिका, गुंतवणूकदार म्हणून लेटफ्लिक्समध्ये प्रवेश

परफेक्ट बिकिनी बॉडीसाठी निया शर्मा होती दोन दिवस उपाशी

Read More From मनोरंजन