मनोरंजन

मधुबालासारख्या दिसणाऱ्या या मुलीचा टिक टॉक व्हिडिओ होतोय व्हायरल

Leenal Gawade  |  Oct 13, 2019
मधुबालासारख्या दिसणाऱ्या या मुलीचा टिक टॉक व्हिडिओ होतोय व्हायरल

मधुबालाच्या सौंदर्यांची तारीफ करु तितकी कमीच आहे. आजही सुंदरता म्हटली की, मधुबालाचे नाव आवर्जून घेतले जाते. इतकी वर्षे उलटूनही मधुबालाचे ते सौंदर्य आजही लोकांनी मनात साठवून ठेवले आहे. या मधुबालाची अचानक आठवण झाली आहे ती सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे. हुबेहूब मधुबालासारख्या दिसणाऱ्या या मुलीचा व्हिडिओ आणि तिचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मस्त व्हायरल होत आहे. तुम्हीही मधुबालाचे चाहते असाल तर मग तुम्ही तिला पाहायलाच हवे. कारण मधुबालाची आठवण झाल्यावाचून तुम्ही राहणार नाही.

अबब! हुबेहूब शाहरुख खान…सोशल मीडियावर या शाहरुखची चर्चा

कोण आहे ही नवी मधुबाला?

Instagram

आता अनेकांना ही नवी मधुबाला कोण असा प्रश्न पडणारच. पण ही नवी मधुबाला अशी तशी कोणी नसून एक अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमधून तिने काम केले आहे. या मधुबालाचे नाव प्रियांका कंडवाल असून तिने ‘पवित्र रिश्ता’, ‘न जाना दिल से दूर’, ‘मरियम खान रिपोर्टींग’ अशा मालिकांमधून काम केले आहे. त्यामुळेच ती काही नवखी नाही. पण तिला ही मधुबालाची ही ओळख मात्र नव्याने मिळाली आहे. या आधी तिचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतात. पण तिच्या या नव्या फोटोने सोशल मीडियावर धुमा्कूळ घातला आहे. तिला सगळेच जण आता मधुबाला म्हणूनच कमेंट करत आहेत.

मधुबालासारखेच काढले फोटो

Instagram

प्रियांकाचा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला मधुबाला आठवल्यावाचून राहणार नाही. तिने तिचे आतापर्यंत शेअर केलेले फोटो हुबेहूब मधुबालासारखे असून तिने तसा गेटअपही केला आहे. अनारकली वेषातील तिचा फोटो सर्वाधिक पसंती मिळवलेला आहे. एकूणच तिच्या या फोटोंना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

फनी व्हिडिओज केले शेअर

सध्याचा काळ हा टिक टॉकचा आहे. अनेक सेलिब्रिटी हे टिक टॉकवर आहेत. प्रियांकाही टिक टॉकवर असून तिने आतापर्यंत तिचे अनेक व्हिडिओ शेअर केले आहे. विशेष म्हणजे यामध्ये ती मधुबाला यांच्या गाण्यावर किंवा डायलॉगवर हा व्हिडिओ करताना दिसत आहे. तिचे हे व्हिडिओ आणि फोटो पाहूनच तिच्या चाहत्यांनी तिला मधुबालाची उपमा देऊन टाकली आहे.  आज मधुबाला असती तर तिला देखील तिच्या डुप्लिकेटला पाहून आनंद झाला असता.

सेलिब्रिटींचे डुप्लिकेटही होतात प्रसिद्ध

बॉलीवूड सेलिब्रिटींचे हुबेहूब आता काही नवीन राहिले नाही. या आधीही अमिताभ बच्चन, शाहरुख खान, रणवीर सिंह, ऋतिक रोशन, अजय देवगण या सारख्या स्टार्सचे डुप्लिकेट आहेत. हे सेलिब्रिटी वगळता क्रिकेटर्स सारखे दिसणारे ही काही जण आहेत. केवळ सारखे  दिसणे हे त्यांच्यासाठी फायद्याचे झाले असून त्यांनाही स्टार्सप्रमाणेच आतापर्यंत पसंती मिळाली आहे. 

एकूणच सध्या या नव्या मधुबालाचा बोलबाला सोशल मीडियावर आहे. आता तुम्हीही एकदा आरशात स्वत:ला नीट निरखून पाहा. तुम्ही तर दिसत नाही ना एखाद्या सेलिब्रिटीसारखे…

समशेराचा फर्स्ट लुक व्हायरल, पाहा रणबीर कपूरचा हा लुक

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From मनोरंजन