Jewellery

मराठमोळ्या मंगळसूत्र डिझाईन्स खास तुमच्यासाठी | Maharashtrian Mangalsutra Designs

Leenal Gawade  |  Jan 30, 2022
मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिझाईन्स


हिंदू धर्मामध्ये मंगळसूत्र घालण्याची पद्धत आहे. ते सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे मंगळसूत्र घातले जाते असे म्हणतात. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील कलह दूर करण्याची ताकद मंगळसूत्रामध्ये असते असे म्हटले जाते.  मंगळसूत्र घालण्याचे महत्व हे विवाहित महिलेल्या जीवनात अनन्यसाधारण आहे. असेही सांगितले जाते की, मंगळसूत्रातील काळे मणी हे तुमचे रक्षण नकारात्मक उर्जेपासून तुमचे संरक्षण करते. म्हणून ते परिधान करावे. पण लग्नानंतर का? असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही एका नव्या आयुष्याची सुरुवात करत असता म्हणून तसे करतात असे सांगितले जाते. मंगळसूत्राची डिझाईन युनिक असावी असे प्रत्येकीला वाटते.. खास तुमच्यासाठी आम्ही शोधून काढल्या आहेत मराठमोळ्या मंगळसूत्र डिझाईन्स खास तुमच्यासाठी (Maharashtrian Mangalsutra Designs) या सोबत आम्ही मंगळसूत्र डिझाईन फोटो देखील शेअर केले आहेत.

काळे मणी मंगळसूत्र डिझाईन

मंगळसूत्र हे काळे मण्यांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळे मंगळसूत्रात काळे मणी असतील तर ते अधिक सुंदर दिसते. जर तुम्ही काळे मणी असलेले मंगळसूत्र करुन घेता येईल. काळ्या मण्यांच्या मंगळसूत्रामध्येही तुम्हाला बऱ्याच डिझाईन्स मिळतात

चंद्रकोर काळे सरीचे मंगळसूत्र

चंद्रकोर काळे सरीचे मंगळसूत्र

खूप जणांना काळेमणी हवे असतात पण असे मंगळसूत्र ट्रेंडी असावे असेही वाटत असते. अशावेळी तुम्ही थोडे काळे मणी मोठे घेऊन आणि अशा प्रकारे डायमंडचे चंद्रकोर आकारातील पेंडंट घेऊन मस्त मंगळसूत्र निवडू शकता. यामध्ये तुम्हाला मंगळसूत्राची उंची निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. हे मंगळसूत्र नक्कीच उठून दिसते.

एविल आय मंगळसूत्र

एविल आय मंगळसूत्र

खूप जणांना मंगळसूत्राची सर सोडली तर त्या खाली असे काहीतरी स्पिरिच्युअल असे मंगळसूत्र हवे असते. अशावेळी तुम्हाला एविल आय असलेले मंगळसूत्र निवडता येईल. नजरेची बाधा असणाऱ्यांना अशा प्रकारे एविल आय मंगळसूत्र निवडता येईल. हे दिसायला वेगळे दिसते. त्यामुळे ते उठून दिसते. 

दोन लेअरचे मंगळसूत्र

दोन लेअरचे मंगळसूत्र

खरंतर या आधी ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेमुळे तीन पदरी मंगळसूत्र फारच प्रसिद्ध झाले होते. पण आता तीन पदरीच्या तुलनेत अशाप्रकारे दोन पदरी मंगळसूत्र चलतीमध्ये आहे. याचे पेंडंट तुम्हाला आवडत असलेल्या आकारामध्ये निवडता येतात. त्यामुळे ते दिसायलाही तितकेच चांगले दिसते.

नथीचा बदलता ट्रेंड तुम्हाला नक्की आवडेल, पाहा फोटो

टर्टल पेंडंट मंगळसूत्र

टर्टल पेंडंट मंगळसूत्र

 ज्या प्रमाणे आपण एविल आय असलेले मंगळसूत्र पाहिले अगदी तसेच आहे टर्टल पेंडंट मंगळसूत्र. खूप जणांना शुभ चिन्ह असलेली मंगळसूत्र हवी असतात. अशांसाठी ही मंगळसूत्र डिझाईन एकदम परफेक्ट असे आहे. 

लाँग पेंडंट मंगळसूत्र

लाँग पेंडंट मंगळसूत्र

 खूप जणांना पेंडंट हे लांब असलेले आवडते. अशांसाठी ही डिझाईन खूपच सुंदर आहे. यामध्ये पेंडंट हे थोडे लांब आहे. पण ते दिसायला खूपच वेगळे चांगले दिसते. इतकेच नाही तर त्याची थोडी हँगिंग डिझाईन दिसायला अधिक चांगली दिसते.

Short Mangalsutra Design Gold

ऑफिस किंवा रोज घालण्यासाठी म्हणून अनेक महिला छोट्या मंगळसूत्रांना अधिक जास्त पसंती देतात. तुमच्या रोजच्या रुटीनमध्येही हे मंगळसूत्र युनिक दिसावे यासाठी मंगळसूत्राच्या खास डिझाईन्स

कुंदन शॉर्ट मंगळसूत्र

कुंदन शॉर्ट मंगळसूत्र

सेलिब्रिटींमुळे कुंदन सध्या चांगलेच ट्रेंडमध्ये आहेत. खरे कुंदन हे दिसायला खूपच रिच दिसतात. जर तुम्हाला छोटे पण ठसठशीत असे मंगळसूत्र घालायचे असेल तर तुम्हाला असे एखादे शॉर्ट मंगळसूत्र विकत घेण्यास काहीच हरकत नाही. कुंदन थोडे हेव्ही असल्यामुळे तुम्हाला यामध्ये दोन सरी घेणे गरजेचे असते. दोन सरी असतील तर हे मंगळसूत्राचे पेंडंट हे त्याचा भार उचलू शकते.

डिस्को बॉल मंगळसूत्र

डिस्को बॉल मंगळसूत्र

पेंखूप जणांना ठशठशीत वाटी असलेले मंगळसूत्र अजिबात आवडत नाही. अशावेळी जर तुम्हाला थोडे लाईट आणि कधीही घालता येणारे मंगळसूत्र हवे असेल तर तुम्ही असे डिझाईन मंगळसूत्र बनवू शकता. यामध्ये तुम्हाला काळ्या मण्यांची सर घेता येते. तसे करायचे नसेल तर तुम्ही सोन्याची चैन ही त्यामध्ये ठेवू शकता. हे मंगळसूत्र दिसायला खूप चांगले दिसेल.

झुमका शॉर्ट मंगळसूत्र

झुमका शॉर्ट मंगळसूत्र

झुमके हे कानात घालण्यासाठीच नाही तर तुम्हाला हे असे मंगळसूत्रातही गुंफता येते. अशीच आहे ही मंगळसूत्र डिझाईन. काळ्या मण्यांमध्ये किंवा चैनमध्ये तुम्ही ही गुंफू शकता. अशा प्रकारे तुम्हाला हे मंगळसूत्र छान ट्रेंडी असे करता येते. या डिझाईनमध्ये तुम्हाला मध्येमध्ये काळेमणीही ठेवता येतील.

ड्रॉप मंगळसूत्र

ड्रॉप मंगळसूत्र

मंगळसूत्राची ही डिझाईनही एकदम नाजूक आहे. ज्यांना खूप हेव्ही असं काही घालायचं नसेल तर अशावेळी तुम्ही असे छोटे छोटे ड्रॉप असलेले मंगळसूत्र डिझाईन्स असलेले मंगळसूत्र नक्कीच ट्राय करु शकता. हे मंगळसूत्र दिसायलाही सुंदर दिसते. हे मंगळसूत्र छान गळ्यालगत असते. त्यामुळे अशीही एक डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा. 

रुबिक क्युब मंगळसूत्र

रुबिक क्युब मंगळसूत्र

ज अगदीच वेगळे असे मंगळसूत्र हवे असेल तर तुम्हाला रुबिक क्युब असलेले मंगळसूत्र देखील तयार करता येईल. लहान मुलं खेळतात. तसे ह रुबिक क्युब पेंड्टसारखे ओवलेले आहे. यामध्ये चेन आणि काळे मणी योग्य प्रमाणात असल्यामुळे ही मंगळसूत्र डिझाईन दिसायला खूपच सुंदर दिसते. 

वाचा – पारंपरिक कोल्हापुरी साजच्या (Kolhapuri Saaj) या डिझाईन्सने खुलवा तुमचे सौंदर्य

  मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिझाईन्स (Latest Mangalsutra Designs/ Long Mangalsutra)

काही जणांना रोजच्या वापरासाठीही मोठे मंगळसूत्र घालायला आवडते. अशावेळी मंगळसूत्राच्या नाजूक आणि युनिक अशा डिझाईन्स तुम्ही निवडायला हव्यात असे मंगळसूत्र खूपच सुंदर दिसते. लांब मंगळसूत्राच्या सुंदर डिझाईन्स  Latest mangalsutra designs खास तुमच्यासाठी 

वाटी मणी मंगळसूत्र

वाटी मंगळसूत्र

काहीही म्हणा ट्रेडिशनल वाटी मंगळसूत्र हे नेहमीच सुंदर दिसते. पण त्यातही तुम्हाला त्याची सर जर सुंदर बनवता आली तर ते मंगळसूत्र अधिक चांगले दिसते. आता या मंगळसूत्रामध्ये तुम्हाला छान नाजूक अशी वाटी दिसेल. पण याची सर ही थोडी वेगळी आहे. यामध्ये सोन्याचे मणी हे लांब आकाराचे आहेत. त्यांची गुंफणही वेगळी असल्यामुळे हे मंगळसूत्र वेगळे दिसते. तुम्हाला साडी किंवा ड्रेसवरही हे अगदी सहज घालता येईल. 

चौकोनी वाटी मंगळसूत्र

चौकोनी वाटी मंगळसूत्र

खूप जणांना टिपिकल अशा गोलाकार वाट्या आवडत नाही. अशांसाठी ही मंगळसूत्र डिझाईन ही एकदम आयडिअल आहे. याचे कारण असे की, यामधील चौकोनी वाट्यांसारखी डिझाईन दिसायला एकदम ट्रेंडी दिसते. ज्यामुळे तुमचा लुक अधिक चांगला उठून दिसतो. शिवाय ज्यांना सोने अधिक आवडते त्यांना अशा सरी घेऊन त्याला अधिक चांगले ट्रेंडी बनवता येते. त्यामुळे असे मंगळसूत्र तुम्हाला सोन्यात घडवून घेता येईल.

लक्ष्मी वाटी मंगळसूत्र 

लक्ष्मी वाटी मंगळसूत्र 

हल्ली साऊथ इंडियन प्रकाराच्या डिझाईन्सने प्रेरित डिझाईन्स खूप जणांना आवडतात. लक्ष्मी, हत्ती अशी काही प्रतिके असलेली पेंडंट खूप जणांना आवडतात.  जर तुम्हाला लक्ष्मी हार आठवत असेल तर अशा लक्ष्मी हाराच्याविचार केला तर त्यामध्ये असणारी लक्ष्मीची चकती अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला लक्ष्मी वाटी मंगळसूत्र असते. यामध्ये पेंडंचच्या ठिकाणी लक्ष्मीच्या या चकत्या असतात. त्याला थोडा अधिक चांगला लुक देण्यासाठी तुम्ही हिरे, खडे यांचा उपयोग करु शकता. जे तुमच्या मंगळसूत्राचा लुक अधिक चांगला वाढवू शकतील. 

मल्टी कलर मंगळसूत्र

मल्टी कलर मंगळसूत्र

कोणं म्हणतं मंगळसूत्रांमध्ये केवळ काळेच मणी असायला हवे. खूप जणांना काहीतरी हटके असं घालायचं असतं. अशावेळी जर तुम्ही असे छान रंगीबेरंगी मंगळसूत्र घातले तरी देखील ते उठून दिसते. काळे मणी, खडे आणि मोती यांची मस्त गुंफण केलेले असे हे मंगळसूत्र डिझाईन खूपच सुंदर आहे जे तुम्हाला वापरण्यास काहीच हरकत नाही.

कॉटन आणि हँडलूमच्या या ब्लाऊज डिझाईन्स देऊ शकतात तुमच्या साडीला सुंदर लुक

डिझायनर पेंडंट मंगळसूत्र

डिझायनर पेंडंट मंगळसूत्र

जर तुम्हाला थोडं डिझायनर आणि ट्रेडिशनल असं काहीसं मंगळसूत्र हवं असेल तर तुम्हाला अशा प्रकारे मस्त डिझायनर पेंडंट मंगळसूत्र निवडता येईल. हे मंगळसूत्र दिसायला सुंदर दिसते. शिवाय या पेंडंटचा हेवी लुक हा तुमच्या साडीचा किंवा ड्रेसचा हेवी लुकही वाढवतो. यामध्ये पेंडंट बदलायची सोय केली तर तुम्हाला सर बदलता येते.

 मालिकेमुळे प्रसिद्ध झालेल्या मंगळसूत्र डिझाईन्स (Celebrity Special Mangalsutra) 

मालिका या महिलांसाठी फारच महत्वाच्या असतात. कारण त्यामधून त्यांना नवनव्या फॅशन कळतात. मालिकेत एखादे लग्न असेल तर तिचे मंगळसूत्र कसे असेल याची उत्सुकता अनेकांना असते. त्यावरुनच आपल्याला मंगळसूत्राच्या वेगळ्या आणि हटके डिझाईन्स कळत असतात. 

नेहाचे मंगळसूत्र

नेहाचे मंगळसूत्र

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील नेहा यशवर्धन अर्थात सगळ्यांची लाडकी प्रार्थना बेहरे. हिचं मंगळसूत्र सध्या चांगलंच ट्रेंडमध्ये आहे. हे मंगळसूत्र डायमंड आणि सोने याचं सुरेख कॉम्बिनेशन आहे. नेहाचे हे मंगळसूत्र दोन पदरी असून ते लांब आहे. यामध्ये काळे मणी आणि सोन्याची चैन अशी ठेवण्यात आली असून त्याचे पेंडंट हे मंगळसूत्राचे खास आकर्षण आहे. कारण हे डायमंडचे असे मंगळसूत्र असून ते दिसायला खूपच सुंदर दिसते. डायमंडच्या या सुंदर पेंडंटचा आकार जणून एखाद्या फुलासारखा आहे. वाटीप्रमाणे यामध्ये दोन फुलं आहेत. त्यामुळे हे पेंडंट अगदी छान राहते. शिवाय नाजूकही दिसते. यात काही शंका नाही. साडीवर हे मंगळसूत्र चांगलेच शोभून दिसते. 

 बेला मंगळसूत्र

बेला मंगळसूत्र

 मराठी नाही तर हिंदी मालिकांमधील मंगळसूत्राच्या नाजूक डिझाईन्स लोकांना अधिक आवडतात. आता नागिन मालिकेतील बेलाच घ्या ना तिचे मंगळसूत्र अगदीच नाजूक असे आहे. हे मंगळसूत्र तुम्हाला नक्की आवडेल असे आहे. या मध्ये विशेष असे काही नसले तरी मंगळसूत्राच्या काळ्या सरीमध्ये असलेला तो एक डायमंडही चांगला भाव खाऊन जात आहे. मालिकांमुळे प्रसिद्ध झालेल्या मंगळसूत्र डिझाईन्स पैकी ही एक आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. 

सई रानडेचे मंगळसूत्र

सई रानडे मंगळसूत्र

अभिनेत्री सई रानडे सध्या लेक माझी दुर्गा या मालिकेत काम करत आहे. तिचे मालिकेतील मंगळसूत्र हे अत्यंत नाजूक आहे. मोरपंखाप्रमाणे असलेले हे मंगळसूत्र दिसायला नाजूक असले तरी देखील ट्रेंडी आहे. तुमच्या कोणत्याही नाजूक कपड्यांवर ते नक्कीच उठून दिसतील असे आहे. 

मयुरी देशमुखचे मालिकेतील मंगळसूत्र

मयुरी देशमुखचे मालिकेतील मंगळसूत्र

मयुरी देशमुख ज्या हिंदी मालिकेत काम करते. त्या मालिकेत तिची भूमिका ग्रे शेड देणारी असली तरी तिचे कपडे आणि तिचा एकूण गेटअप हा फारच लक्ष देण्यासारखा आहे. तिचे मंगळसूत्रही यात फारच सुंदर आहे.  काळी सर आणि त्या खाली कुंदन, गोल्ड असे पेंडंट असून ते दिसायला खूपच सुंदर आहे. 

 आदिती मंगळसूत्र

आदिती मंगळसूत्र

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतील अभिनेत्री अमृता पवार नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. तिच्या मालिकेत तिचे आधीच लग्न झाले आहे. तिचे छोटे मंगळसूत्र हे खूपच सुंदर आहे. तिचे हे मंगळसूत्र वाटीचे नसून त्याचे पेंडंट हे थोडे स्टायलिश असल्यामुळे ते दिसायला खूपच सुंदर दिसते. 

 गंठण मंगळसूत्र  (Chokar Mangalsutra)

गंठण प्रकारातील मंगळसूत्र हे खूप क्लासिक आणि चांगली दिसते. हे मंगळसूत्र गळ्यालगत असल्यामुळे तुम्ही अगदी हमखास हे मंगळसूत्र ट्राय करायला हवे. लो नेक साडी, एखादा ट्रेडिशनल ड्रेस यावर हे मंगळसूत्र खूपच जास्त उठून दिसते. त्यामुळे अशी मंगळसूत्र तुमच्या ज्वेलरी कलेक्शनमध्ये असायलाच हवी.

मुहूर्तमणी गंठण

गंठण मंगळसूत्र

खूप जणांकडे मुहूर्तमणी दिला जातो. त्याचे नंतर मंगळसूूत्रात रुपांतर केले जाते. जर तुम्हाला त्याचे घसघशीत असे मंगळसूत्र करायचे असेल तर तुम्हाला अशा जास्त सरी असलेले मंगळसूत्र नक्कीच बनवता येईल ते दिसायलाही सुंदर दिसते. जर तुम्ही लो नेक किंवा डीप नेक ब्लाऊज घातला असेल तर असे मंगळसूत्र तुम्हाला नक्कीच वापरता येतात.

नथ मंगळसूत्र

नथ मंगळसूत्र

नथ मंगळसूत्रामध्येही तुम्हाला मस्त असा लुक येऊ शकतो. सचिन तेंडुलकरची लेक साराने अशा पद्धतीचा एक नथ चोकर हार घातला होता. जो चांगलाच प्रसिद्ध झाला.महाराष्ट्राची शान असलेली अशी नथ तुम्हाला मस्त मंगळसूत्रात गुंफता येते.

ठुशी मंगळसूत्र

ठुशी मंगळसूत्र

कोल्हापुरी ठुशी या फारच प्रसिद्ध आहेत. या ठुशींच्या काही डिझाईन्स घेऊन तुम्हाला मस्त असे ठुशी मंगळसूत्र तयार करता येऊ शकते. हे मंगळसूत्र ट्रेडिशनल आणि तितकेच चांगले दिसते. त्यामुळे तुम्ही असे मंगळसूत्र हमखास वापरायला हवे.

चिंचपेटी मंगळसूत्र

चिंचपेटी मंगळसूत्र

चिंचपेटी ही देखील महाराष्ट्रीयन दागिन्यांमधील सगळ्यात आवडती अशी डिझाईन आहे. तुम्हाला जर पेंडंटचा उपयोग करुन छान मंगळसूत्र घडवता आले तर खूपच सुंदर. हे मंगळसूत्र डिझाईन दिसायला खूपच सुंदर दिसते

गंठण मंगळसूत्र

गंठण मंगळसूत्र

गंठण हे ठशठशीत असतात. म्हणूनच त्यांना गंठण असे म्हटले जाते. ही डिझाईनही त्यांच्यासाठी आहे ज्यांना ठसठशीत मंगळसूत्र घालायला आवडते. जर तुम्हालाही असे मंगळसूत्र आवडत असेल तर तुम्ही सोने किंवा इमिटेशनमध्ये घेऊन ते वापरु शकतात. ट्रेडिशनल अशा प्रकारातील हे मंगळसूत्र आहे

वर दाखवलेल्या मंगळसूत्राच्या डिझाईन्स आवडल्या असतील तर नक्की अशा डिझाईन्समध्ये मंगळसूत्र करा. शिवाय तुमच्या खास मैत्रिणींसोबत हे शेअर करायला अजिबात विसरु नका.

Read More From Jewellery