मनोरंजन

सध्या ट्रेंडमध्ये आहे ‘नेहा यशवर्धन चौधरी’चं मंगळसूत्र, नववधूंमध्ये वाढतेय क्रेझ

Trupti Paradkar  |  Jun 27, 2022
Majhi Tujhi Reshimagath Nehas Mangalsutra is popular in Marathi

‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मराठी मालिका सध्या प्रेक्षकांना खूप आवडत आहे. कधी कधी त्याच त्याच धाटणीतील विषय लोकांना कालांतरांने कंटाळवाणे वाटू लागतात. सहाजिकच सासू -सुनेचे वाद आणि प्रेमाचे त्रिकोण असे विषय सध्या प्रेश्रकांना नकोसे झाले आहेत. या मालिकेत मात्र सिंगल पॅरेंट असलेल्या नेहाचं आणि श्रीमंत यशवर्धनचं प्रेम दाखवण्यात आलं आहे. निराळा विषय आणि दिग्गज कलाकारांमुळे प्रेक्षक पुन्हा मराठी मालिकांकडे वळले आहेत. नेहाची भूमिका यात प्रार्थना बेहरे तर यशवर्धनची भूमिका श्रेयस तळपदे साकारत आहे. नुकतंच या मालिकेत नेहा आणि यशच्या लग्नाचा थाटमाट दिसून येत आहे. मात्र या लग्नासोबतच आता एका वेगळ्याच विषयाने सोशल मीडियावर जोर धरला आहे. तो विषय आहे लग्नात नेहाने परिधान केलेल्या मंगळसूत्राचा… तुम्हालाही हवं असेल असं हटके मंगळसूत्र तर मराठमोळ्या मंगळसूत्र डिझाईन्स खास तुमच्यासाठी | Maharashtrian Mangalsutra Designs तसंच साखरपुड्यासाठी विविध ब्रायडल लुक्स (Marathi Engagement Look For Bride), लग्नात नवरीसाठी मराठी उखाणे (Marathi Ukhane For Bride), नववधूसाठी स्टायलिश ‘ब्रायडल फुटवेअर’ (Footwear For Bride In Marathi), लग्नाचे कपडे आणि शॉपिंगसाठी खास टिप्स (Lagnache Kapde And Shopping Tips In Marathi).

नेहाचं मंगळसूत्र आहे ट्रेंडमध्ये

काही वर्षांपूर्वी अशात एका मालिकेतील पात्राच्या मंगळसूत्राचा ट्रेंड बाजारात आला होता. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील जान्हवी साकारणाऱ्या तेजश्री प्रधानने परिधान केलेलं तीन पदरी मण्यांचं मंगळसूत्र इतकं फेमस झालं होतं की, घरोघरी प्रत्येक स्त्रीला तेव्हा अगदी जान्हवीप्रमाणेच मंगळसूत्र हवं होतं. आता इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा मालिकेमध्ये वापरण्यात येणाऱ्या मंगळसूत्राचा ट्रेंड बाजारात येत आहे. नेहा आणि यशवर्धनच्या लग्नातील सर्व फोटोज आणि व्हिडिओजमध्ये नेहाच्या या मंगळसूत्राची चर्चा रंगत आहे. सध्या मालिकेत त्यांच्या लग्नाचा ट्रॅक सुरू आहे. नेहाने या लग्नातील विधींसाठी मराठमोळी साडी परिधान केलेली आहे. हिंदू लग्नातील विधींप्रमाणे तिने लग्नासाठी एक छोटं मंगळसूत्र आणि डायमंडचं पेडंट असलेलं मोठं मंगळसूत्र परिधान केलेलं दिसत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या दोन्ही मंगळसूत्रांचे फोटो व्हायरल होत आहेत. 

तुम्ही नेहा चौधरीचं मंगळसूत्र पाहिलं का

प्रार्थना बेहरेने या मालिकेत नेहा कामतची भूमिका केली आहे. लग्नानंतर आता ती मिसेस नेहा यशवर्धन चौधरी होणार आहे. नेहा मिसेस चौधरी झाल्यावर मालिकेत अनेक वेगवेगळी वळणं पाहायला मिळणार आहेत. मात्र ती पाहण्याआधी सध्या प्रेक्षक नेहा आणि यशच्या लग्नाच्या सोहळ्याचा आनंद साजरा करत आहेत. श्रीमंत घरची सून दाखवण्यासाठी सहाजिकच नेहासाठी मालिकेतही ब्रायडल वेअर आणि ज्वेलरी खास डिझाइन करण्यात आले होते. प्रार्थनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे काही फोटोज आणि व्हिडिओज शेअर केले आहेत. एवढंच नाही तर तिने कॉस्चुम आणि ज्वेलरी डिझानरला प्रत्येक फोटोमध्ये टॅगदेखील केलं आहे. धनश्री आर्ट ज्वेलर्स (Dhanashree Art Jewels) ने नेहासाठी हे खास मंगळसूत्र डिझाइन केलं आहे. वेडिंग सीझन सुरू झाला की अशी मालिकांमध्ये वापरण्यात येणारी मंगळसूत्रं देखील ट्रेंडमध्ये येतात. कारण नववधू नेहमी त्यांच्यासाठी ट्रेंडमध्ये असलेले दागिने आणि कपडे निवडत असतात. सहाजिकच आता प्रत्येक नववधूला नेहा चौधरीप्रमाणेच असं डायमंडचं मंगळसूत्र हवं असणार आहे. म्हणूनच की काय नेहाचं मंगळसूत्र सध्या सोशल मीडियावर सर्वात जास्त चर्चेत आहे.  

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन