Make Up Trends and Ideas

मेकअप करताना टाळा ‘या’ चुका नाहीतर दिसाल वयस्कर

Trupti Paradkar  |  Feb 12, 2020
मेकअप करताना टाळा ‘या’ चुका नाहीतर दिसाल वयस्कर

प्रत्येकीला आपण नेहमीच चिरतरूण दिसावं असं वाटत असतं. मात्र काळाच्या ओघात चेहऱ्यावर एजिंगच्या खुणा दिसू लागतात. कामाचं टेन्शन, धुळ, प्रदूषण, अपुरी झोप यामुळे तर कमी वयातच तुमच्या चेहऱ्यावर सुरकूत्या आणि काळे डाग दिसतात. एवढंच नाही तर  चुकीच्या पद्धतीने केलेल्या मेकअपमुळे कधीकधी तुम्ही तरूण असतानाही वयस्कर दिसू लागता. तर कधी कधी वयोमानुसार दिसणाऱ्या एजिंगच्या खुणा लपवण्यासाठी मेकअप करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. यासाठीच या मेकअप टिप्स तुमच्या नक्कीच उपयोगाच्या आहेत. 

अती कन्सिलर अथवा फाऊंडेशनचा वापर करणे –

प्रत्येकाच्या त्वचेच्या रंग आणि पोतानुसार मेकअपसाठी फाऊंडेशन आणि कन्सिलरची निवड करावी लागते. कन्सिलर, फाऊंडेशन चुकीचे निवडले की तुमच्या मेकअपवर याचा नक्कीच परिणाम जाणवतो. शिवाय तुम्ही फाऊंडेशनचा कोणता प्रकार निवडत आहात हे देखील फार महत्त्वाचे आहे. फाऊंडेशनमध्ये जेल फाऊंडेशन, पावडर फाऊंडेशन, क्रीम  अथवा मुस फाऊंडेशन असे अनेक प्रकार असतात. सहाजिकच प्रत्येकीच्या त्वचेला ते सूट होतातच असे नाही. जर तुम्ही तुमच्या त्वचेला सूट न होणारं फाऊंडेशन निवडलं तर त्यामुळे तुम्ही तुमच्या वयापेक्षा अधिक मोठे दिसता. 

Shutterstock

फेस प्रायमर लावायला विसरणे –

अनेकींना मेकअप करायला आवडतो. मात्र मेकअप करण्यापूर्वी आणि नंतर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे माहीत नसतं. कधी कधी माहीत असूनही त्या गोष्टी करण्याची टाळाटाळ केली जाते. जर तुम्ही मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर प्रायमर लावलं नाही. तर तुमच्या चेहऱ्यावरील रोमछिद्रे मेकमुळे ब्लॉक होतात. ज्याचा परिणामामुळे तुमचा  चेहरा निस्तेज आणि वयस्कर दिसतो. 

ब्युटी ब्लेंडरचा वापर न करणे –

फाऊंडेशन, करेक्टर अथवा कन्सिलर त्वचेवर व्यवस्थित लावणं गरजेचं आहे. त्वचेवर मेकअप ब्लेंड करण्यासाठी ब्युटी ब्लेंडरचा वापर केला जातो. मात्र जर तुम्ही ते व्यवस्थित ब्लेंड करू शकला नाहीत तर त्याचा परिणाम तुमच्या लुकवर होतो. ब्लेंड न केल्यामुळे तुमचा मेकअर पॅची  दिसतो ज्यामुळे तुमच्या वयापेक्षा तुम्ही मोठ्या आणि थोराड दिसता. 

Shutterstock

डोळ्यांच्या खालील पापण्यांना मस्कारा लावणे

मस्कारामुळे तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. मात्र जर तुम्ही डोळ्याच्या खालील पापण्यांना मस्कारा लावला तर त्यामुळे तुमचा लुक कधी कधी बिघडू शकतो. डोळ्याखालील पापण्यांना मस्कारा लावणं कितीही गरजेचं असलं तरी अती मस्काराचा वापर केल्यामुळे तुमचा चेहरा वयस्कर दिसू लागतो. यासाठी चुकूनही खालच्या पापण्यांवर अती मस्कारा लावू नका.

मेकअपसाठी चुकीच्या ब्रशचा वापर करणे –

मेकअप करणं ही एक कला आहे. प्रत्येक स्त्रीला स्वतःचे सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी या कलेबद्दल बेसिक ज्ञान असायलाच हवं. चेहऱ्यावरील प्रत्येक भागाच्या मेकअपसाठी  निरनिराळ्या मेकअप ब्रश अथवा टूल्सचा वापर केला जातो. या ब्रशचा वापर कसा करायचा हे माहीत नसेल तर तुमचा मेकअप खराब होण्याची दाट शक्यता असते. ज्यामुळे तुम्ही मेकअप केल्यावर वयाने फार मोठ्या दिसू शकता. 

Shutterstock

चुकीची लिपस्टिक निवडणे –

वाढत्या वयानुसार तुमचे ओठ जाड आणि सैल पडू लागतात. त्यामुळे अशा ओठांवर योग्य लिपस्टिक लावणं फार गरजेचं आहे. वाढत्या वयात लिपलायनर आणि नैसर्गिक रंग वापरले तर तुम्ही जास्त तरूण  दिसता. या उलट अशा ओठांवर अती गडद रंग आणि ग्लॉसी लिपस्टिक लावल्यास तुमचा लुक बऱ्याचदा वयस्कर दिसण्याची शक्यता असते.

फोटोसौजन्य –  शटरस्टॉक

हे ही वाचा –

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अघिक वाचा –

तुमच्या मेकअप किट मध्ये हे ‘5’ मेकअप ब्रश आहेत का

‘या’ लाईफ चेजिंग मेकअप टीप्स तुम्हाला माहित असायलाच हव्या

मेकअप न करता सुंदर दिसण्यासाठी सोप्या टिप्स

 

Read More From Make Up Trends and Ideas