आंब्याला फळांचा राजा असं म्हटलं जातं. जर उन्हाळ्यात भरपूर आंबा तर खावाच पण त्यासोबतच आंब्याच्या काही हटके रेसिपीज आणि त्यातही मँगो ड्रींक्स करून पाहायलाच हव्यात. या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही खास मँगो ड्रींक रेसिपीज सांगणार आहोत. ज्या सोप्या तर आहेतच पण आंबा असल्यामुळे पौष्टीकही आहेत. मग पाहूणे आल्यावर करा या मँगो ड्रींक रेसिपीज आणि मिळवा वाहवा. या रेसिपीज खानदानी राजधानीचे कॉर्पोरेट शेफ महाराज जोधाराम चौधरी आणि रसोवराचे कॉर्पोरेट शेफ महाराज हेमाराम चौधरी यांनी सांगितल्या आहेत.
मँगो लस्सी
साहित्य
पिकलेला आणि सोलून घेतलेला 2 कप आंबा
दही 1 कप
दूध 1/2 कप
साखर 3 मोठे चमचे किंवा स्वादानुसार
आमरस ½ कप
वेलची पावडर 1 चमचा
कृती
दही, आंबा, आमरस आणि साखर ब्लेंड करून घ्या.
आता यामध्ये वेलची पावडर घालून पुन्हा ब्लेंड करा.
आता एका लांबट ग्लासमध्ये हा मिश्रण घालून त्यात वेलची पावडर आणि कापलेल्या आंब्याच्या फोडी घालून सजवा. थंड थंड सर्व्ह करा.
वाचा – संत्र्याचे आरोग्यदायी आणि सौंदर्य फायदे
आमरस
साहित्य
पिकलेला आंबा 1 किलोग्रॅम
केसर 1/4 चमचे
पिठीसाखर 1 कप
थंड दूध 2 1/2 कप
कृती
आंबा सोलून घ्या आणि त्याचे क्यूब्स कापून मिक्सरमध्ये साखर, दूध आणि केसरसोबत स्मूदीसारखं ब्लेंड करून घ्या. नंतर ग्लासात घालून आईस क्यूब्ससोबत थंडगार सर्व्ह करा.
मँगो आईस टी
साहित्य
सोललेला आणि कापलेला आंबा -1 कप
टी बॅग्स- 2 किंवा चहा पावडर – 2 चमचे
पाणी – 4 कप
लेमन ज्यूस – 1 चमचा
मँगो क्रश – 2 चमचे
साखर – स्वादानुसार
पुदीन्याची पान – गार्निशिंगसाठी
कृती
पाणी उकळून घ्या. आता त्यात टी बँग्ज किंवा टी पावडर घाला आणि साखर घाला. आता 1-2 मिनिटांपर्यंत उकळून घ्या. जोपर्यंत हे काळं होत नाही.
हे मिश्रण एका पातेल्यात घेऊन गाळून घ्या. आता यामध्ये लेमन ज्यूस, मँगो सिरप आणि आईस क्यूब्स घालून चांगलं मिक्स करा.
आता सर्व्हिंग ग्लासमध्ये आईस क्यूब्स, कापलेला आंबा घाला आणि वरून टी घाला.
सर्वात शेवटी पुदीनाच्या पानांनी गार्निश करून सर्व्ह करा.
मग तुम्हीही या मँगो ड्रींक रेसिपीज नक्की करून पाहा आणि तुम्हाला आवडल्या का ते कळवा.
हेही वाचा –
उन्हाळ्यात सब्जा खाण्याचे आरोग्यदायी फायदे
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade