लाईफस्टाईल

मराठी भाषा दिन कविता | Marathi Bhasha Din Kavita in Marathi

vaibhavgurav  |  Feb 26, 2022
Marathi Bhasha Din Kavita

२७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिवस म्हणजेच मराठी भाषिकांसाठी अभिमानाचा दिवस. दरवर्षी २७ फेब्रुवारीला महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक, कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाराज यांचा जन्मदिन साजरा केला जातो. कुसुमाराजांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असून मराठी ही ज्ञानभाषा करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. कुसुमाग्रज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचा वाढदिवस ‘मराठी भाषा गौरव दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय सरकारने 2013 मध्ये घेतला होता.

या दिवशी महाराष्ट्रात उत्साह असतो. प्रत्येक मराठी भाषिक एकमेकाला मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा संदेश पाठवून मराठी असल्याचा अभिमान दाखवतात. बरेच लोक शुभेच्छा च्या स्वरूपात “मराठी भाषा दिन कविता” पाठवण्यात पसंती दर्शवतात. म्हणून आम्ही आज तुमच्यासाठी मराठी भाषा दिनानिमित्त उस्त्फुर्त कविता संग्रह आणला आहे, ज्या तुम्ही आपल्या प्रियजनांना पाठवून हा मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करू शकतात.

मराठी भाषा दिन कविता क्र 1 | Marathi Bhasha Din Kavita In Marathi

एक सूर एक ध्यास छेडितो मराठी
एक संघ एक बंध गुंजीतो मराठी,

एक श्वेत अनेक रंग रंगतो मराठी
एक बोध एक विचार मांडतो मराठी,

एक साज एक आवाज ऐकतो मराठी
एक मन एक क्षण जगतो मराठी,

माय मराठी, साद मराठी
भाषांचा भावार्थ मराठी
चाल मराठी, बोल मराठी
जगण्याला या अर्थ मराठी

सांगतो मराठी…… वाहतो मराठी
पूजितो मराठी….. साहतो मराठी
हुकरते मराठी…. गर्जते मराठी

मराठी भाषा दिन कविता क्र 2

माय मराठी! तुझिया पायी तनमनधन मी वाहियले,  तुझिया नामी, तुझिया धामी अखंड रंगुनि राहियले.

कष्टामधली तुझीच गोडी चाखायाची मज आई, मला आवडे तुझा विसावा, तुझीच निर्भर अंगाई.

तुझे झरे अन् तुझी पाखरे, वास तुझा जनलोक तुझा, हवाहवासा मला वाटतो राग तुझा, संतोष तुझा.

माय मराठी! तुझिया अंकी लोळण घेते, बागडते, तसेच अलगत तव आभाळी भरारणे मज आवडते.

तुझे चालणे, तुझे बोलणे, दाखव मजला रीत तुझी, जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी.

तुझियासाठी गुंफित बसते मोहनमाला शब्दांची, अर्थ साजरा, गंध लाजरा, नवलपरी पण रंगांची.

माय मराठी! तुझियासाठी वात होउनी जळते मी, क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी.

कवी: वि.म. कुलकर्णी.

मराठी भाषा दिन कविता क्र 3

माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट,

माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवित.

ज्ञानोबांची तुकयाची मुक्तेशाची जनाईची,

माझी मराठी गोडी रामदास शिवाजीची.

‘या रे, या रे अवघे जण, हाक मायमराठीची,

बंध खळाळा गळाले साक्ष भीमेच्या पाण्याची.

डफ तुणतुणे घेऊन उभी शाहीर मंडळी,

मुजर्‍याची मानकरी वीरांची ही मायबोली.

नांगराचा चाले फाळ अभंगाच्या तालावर,

कोवळीक विसावली पहाटेच्या जात्यावर.

हिचे स्वरूप देखणे हिची चाल तडफेची,

हिच्या नेत्री प्रभा दाटे सात्विकाची, कांचनाची.

कृष्णा गोदा सिंधुजळ हिची वाढवती कांती,

आचार्यांचे आशिर्वाद हिच्या मुखी वेद होती.

माझ्या मराठीची थोरी नित्य नवे रुप दावी,

अवनत होई माथा मुखी उमटते ओवी.

कवयित्री : संजीवनी मराठे

वाचामराठी भाषा दिनाच्या निमित्ताने, मराठी भाषेचा प्रवास

मराठी भाषा दिन कविता क्र. 4

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म पंथ जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमच्या मनामनात दंगते मराठी

आमच्या रगा रगात रंगते मराठी

आमच्या उरा उरात स्पंदते मराठी

आमच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी

आमुच्या लहानग्यात रांगते मराठी

आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी

आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी

येथल्या फुलाफुलात हासते मराठी

येथल्या दिशादिशात दाटते मराठी

येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी

येथल्या वनावनात गुंजते मराठी

येथल्या तरुलतात साजते मराठी

येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी

येथल्या पिकांमधून डोलते मराठी

येथल्या नद्यांमधून वाहते मराठी

येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी

आपुल्या घरात हाल सोसते मराठी

हे असे कितीक खेळ पाहते मराठी

शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

कवी : सुरेश भट

वाचादैनंदिन वापरातील हरवलेले काही मराठी शब्द

Marathi Bhasha Din Kavita No. 5

माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा

हिच्या संगाने जागल्या, दर्‍याखोर्‍यांतील शिळा

हिच्या कुशीत जन्मले, काळे कणखर हात

ज्यांच्या दुर्दम धीराने, केली मृत्यूवरी मात

नाही पसरला कर, कधी मागायास दान

स्वर्णसिंहासनापुढे, कधी लवली ना मान

हिच्या गगनांत घुमे, आद्य स्वातंत्र्याची द्वाही

हिच्या पुत्रांच्या बाहूंत, आहे समतेची ग्वाही

माझ्या मराठी मातीला, नका म्हणू हीन दीन

स्वर्गलोकाहून थोर, मला हिचे महिमान

रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी

चारी वर्णांतुनी फिरे, सरस्वतीची पालखी

रसरंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वर

येथे अहंता द्रवली, झाले वसुधेचे घर

माझ्या मराठी मातीचा, नका करू अवमान

हिच्या दारिद्य्रात आहे, भविष्याचे वरदान

माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा

हिच्या संगे जागतील, मायदेशांतील शिळा

गीतकार : कुसुमाग्रज

Marathi Bhasha Din Kavita No.6

मराठी राजभाषा आमची, महाराष्ट्राची शान,
भजन कीर्तन ऐकताना हरपते भान !

काना, मात्रा, वेलांटीचे, मिळाले वाण,
साहित्य अन इतिहास मराठीचा महान !

मराठी मायबोली आमची, बोल रसाळ !
भाषा सहज सुंदर, प्रेमळ लडिवाळ !

मराठी भाषेचा आम्हा, सदा गर्व,
मराठी भाषा दिन साजरा करूया सर्व !

जय महाराष्ट्र ! जय मराठी ! जय भारत !

हे हि वाचा,

मराठी भाषिकांना वाटतेय का मराठीची लाज…

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमांची रेलचेल, बघा गर्जतो मराठी हा विशेष कार्यक्रम

Read More From लाईफस्टाईल