Fitness

मराठी सेलेब्सना क्वारंटाइनमध्येही फिट ठेवणारी जोडी

Aaditi Datar  |  Apr 27, 2020
मराठी सेलेब्सना क्वारंटाइनमध्येही फिट ठेवणारी जोडी

लॉकडाऊन जाहीर होताच सिनेसृष्टीने आपली सर्व शुटिंग्स, कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने गेला एक महिना सेलिब्रिटी घरी आहेत. सेलिब्रिटींच्या आयुष्यातला अविभाज्य भाग असतो, तो म्हणजे फिटनेस. पण क्वारटाइंनच्या काळात सर्व जीम आणि फिटनेस स्टुडियोज बंद असल्याने सेलेब्स त्यांच्या इन्स्ट्रक्टरसोबत वर्कआऊट करू शकत नाहीत. मग यावर उपाय काय, असा प्रश्न पडण्याआधीच एका सेलिब्रिटी फिटनेस इन्स्ट्रक्टरने तोडगा शोधून काढला आहे.

मराठी सेलेब्सचे फिटनेस इन्स्ट्रक्टर्स

सेलिब्रिटी फिटनेस इन्स्ट्रक्टर कपल रीमा वेंगुर्लेकर आणि ब्रायन डिसुझा हे लॉकडाऊनच्या काळातही सेलिब्रिटींच्या फिटनेसची योग्य काळजी घेत आहेत. त्यांनी यावर तोडगा काढला आहे तो व्हर्च्युअल क्लासेसचा. हे सेलिब्रिटी फिटनेस इन्स्ट्रक्टर कपल सध्या व्हर्च्युअल क्लासेसव्दारे आपल्या विद्यार्थ्यांना फिट ठेवण्याचा प्रयत्न करतायत. रीमा-ब्रायन ही जोडी मराठी फिल्म इंडस्ट्रीतल्या अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडित, स्पृहा जोशी, प्राजक्ता माळी, सखी गोखले, सुव्रत जोशी, सिध्दार्थ मेनन अशा जवळ जवळ 25 ते 30 सेलिब्रिटींची फिटनेस इन्स्ट्रक्टर आहे.

लॉकडाउन झाल्यापासून रीमा आणि ब्रायन आपल्या फिटनेस फ्रिक विद्यार्थ्यांसाठी व्हिडीओ कॉलव्दारे रोज क्लासेस घेतात. यात अर्थातच स्नेहलता वसईकर, ऋता दुर्गुळे, प्राजक्ता माळी, स्पृहा जोशी अशा सेलिब्रिटींचा समावेश आहे. आपल्या ‘वर्कआउट ऑफ दि डे’ (वॉड) या फिटनेस स्टुडिओव्दारे रीमा वेंगुर्लेकर अष्टांग योगाचं ट्रेनिंग देते. तर ब्रायन डिसुझा फंक्शनल ट्रेनिंग शिकवतो.

‘वर्कआउट ऑफ दि डे’ (वॉड)ची संस्थापक आणि फिटनेस इन्स्ट्रक्टर रीमा वेंगुर्लेकर सांगते की, “सध्या देशभरात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन आहे. त्यामुळे जसं आपण आजारी पडू नये म्हणून वर्क फॉर्म होम करणं किंवा घरीच राहणं गरजेच आहे. तसंच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही तंदरूस्त राहणंही गरजेच आहे. त्यामुळेच आम्ही काही व्हर्च्युअल ग्रुप क्लासेस घ्यायला सुरूवात केली. यात जे आमच्याकडे पहिल्यापासून फिटनेससाठी येतात, त्यांनाच नाही तर नव्या स्टुडंट्सचाही समावेश आहे. क्वारंटाइनमध्ये थोडा वेळ मिळालाय, तर आता काही दिवस स्वत:कडे पाहण्याचा संकल्प सोडलेल्या नवोदितांनाही आम्ही काही फ्री क्लासेसव्दारे प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतोय. या फिटनेस फ्रिक स्टुडंट्समध्ये काही मराठी सेलिब्रिटीजही आहेत. त्यांच्यासाठी आम्ही व्हिडीओ कॉलव्दारे वैयक्तिक क्लास घेतो. आणि मला आनंद आहे की, लॉकडाउननंतर त्यांच्यात झालेला बदल त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल.”

फिटनेस आणि सेलिब्रिटीबाबत ब्रायन डिसुझाने सांगितलं की, “सततच्या धावपळीच्या आयुष्यात मग ते सेलिब्रिटी असो की, सामान्य माणूस आपल्याला स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. त्यामुळे या लॉकडाउनमध्ये फिटनेसव्दारे स्वत:वर सकारात्मक बदल घडवून आणण्याची हीच वेळ आहे आणि मला आनंद आहे, की स्पृहा जोशी, ऋता दुर्गुळे, दिप्ती केतकर, स्नेहलता वसईकर या माझ्या सेलिब्रिटी स्टुडंट्सनी स्वत:ला फिट ठेवण्याचा विडा उचललाय.”

मग तुम्हाला आता कळलं असेलच की, मराठी सेलिब्रिटीजपैकी अनेकांच्या फिटनेस मागे रीमा आणि ब्रायन हे फिटनेस इन्स्ट्रक्टर कपल. तुम्हालाही तुमच्या आवडत्या सेलेब्सप्रमाणे फिट राहायचं असेल तर त्यांच्याप्रमाणे घरच्याघरी वर्कआऊट करायला सुरूवात करा आणि लॉकडाउनचा पूरेपूर वापर करा. 

शिल्पा शेट्टीने केलं सासूचं वर्कआऊट पाहून कौतुक

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा. आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

2019 मधील सर्वात फिट ठरल्या या अभिनेत्री

पद्मा लक्ष्मीनं सांगितलं फिटनेसचं रहस्य, 49व्या वर्षातही असं ठेवा स्वतःला हॉट

Read More From Fitness