मनोरंजन

खारी बिस्कीटच्या गोड जोडीला चांगला प्रतिसाद

Aaditi Datar  |  Nov 6, 2019
खारी बिस्कीटच्या गोड जोडीला चांगला प्रतिसाद

मराठी चित्रपटातील प्रसिद्ध नावांमध्ये दिग्दर्शक संजय जाधव यांचं नाव घेतलं जातं. नुकतीच त्यांची  50 वी कलाकृती खारी बिस्कीट हा चित्रपट रिलीज झाला. संजय जाधव यांचा 2019 सालातला हा दुसरा सिनेमा आहे. या आधी फर्स्ट हाफमध्ये त्यांचा लकी हा सिनेमा आला होता. लकी हा टिपीकल संजय जाधव यांच्या स्टाईलचा कॉमेडी सिनेमा होता तर खारी बिस्कीट हा सिनेमा हा त्यांच्या नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळा आहे. मुख्य म्हणजे जाधव यांनी पहिल्यांदाच लहान मुलं लीड रोलमध्ये असलेला सिनेमा केला असून त्यांच्या आत्तापर्यंत आलेल्या सर्व सिनेमांपेक्षा याची कथा वेगळी आहे.

झी स्टुडियोज आणि दिपक पांडुरंग राणे निर्मित खारी बिस्कीट हा सिनेमा सध्या सगळीकडे हाऊसफुल होताना दिसत आहे. त्यातच दुग्धशर्करा योग म्हणजे या चित्रपटाला 8.9 रेटिंग्स मिळाली आहेत. गेल्या काही महिन्यात सिनेमागृहांमध्ये झळकलेल्या मराठी सिनेमांपैकी ‘खारी बिस्कीट’ हा एकमेव सिनेमा आहे, ज्याला हाऊसफुल सिनेमा हॉल्ससोबतच आयएमडीबीकडून अशाप्रकारे कौतुकाची थापही मिळाली आहे.

सूत्रांनुसार, खारी आणि बिस्कीट या बहिण-भावाच्या जोडगोळीची कथा प्रेक्षकांना अगदी आपलीशी वाटतेय. ‘तुला जपणारं आहे’ आणि ‘खारी’ या दोन्ही गाण्यांना मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच सोशल मीडियावर ट्रेंडिंग असलेली ही गाणी आता अनेकांच्या कॉलर ट्यून्सवर सेट झाली आहेत. गेल्या कित्येक महिन्यात मराठी सिनेसृष्टीला एका सुपरहिट सिनेमाची गरज होती. त्यामुळे हिरकणी पाठोपाठ खारी बिस्कीटच्या निरागस भाऊ-बहिणीच्या कथेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. दुनियादारी, प्यारवाली लव्हस्टोरी, तूही रे या संजय जाधव यांच्या सुपरहिट सिनेमांपेक्षाही ‘खारी-बिस्कीट’ला जास्त आयएमडीबी रेटिंग्स मिळाली आहेत.

खारीबिस्कीटची कथा 

ही कथा आहे खारी म्हणजे वेदश्री खाडीलकर आणि तिचा भाऊ बिस्कीट आदर्श कदम यांची. त्यांची नावंच इतकी हटके असल्याने चित्रपटाची कथा ही मजेशीर आहे. आपल्या आईसोबत रस्त्याच्या कडेला राहणारी ही भाऊ-बहीणीची जोडी. ज्यांची आई बिस्कीट्स विकून गुजराण करत असते. त्यांच्या आईच्या अपघाती मृत्यूनंतर बिस्कीटवर खारीची जबाबदारी येते. कारण खारी ही डोळ्यांनी अधू असते. तो आपलं असं एक वेगळं जग निर्माण करतो आणि खारीला त्या जगाची राजकन्या बनवतो. कमी पैसे असूनही तो तिला प्रत्येक वेळी स्पेशल फील करून देतो. पण किती दिवस हे चालतं? 

या चित्रपटाची कथा 2011 मधली दाखवण्यात आली आहे. ज्या वर्षी 28 वर्षांनंतर भारताने वर्ल्ड कप जिंकला होता. खारी बिस्कीटच्या कथाही या भोवतीच फिरते. जेव्हा खारी वर्ल्ड कप मॅच बघण्याची इच्छा व्यक्त करते. मग बिस्कीट तिची इच्छा पूर्ण करतो की नाही. या चित्रपटात सहाय्यक भूमिकेत नंदिता पाटकर आणि सुशांत शेलार असून त्यांनीही उत्तम अभिनय केला आहे. खारी बिस्कीट हा चांगला सिनेमा असून भावाबहीणीचं नातं अगदी छान दाखवण्यात आलं आहे. दोन्ही मुलांचा अभिनय नक्कीच बघण्यासारखा आहे. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

हेही वाचा –

दिग्दर्शक संजय जाधव यांचं ‘लकी’ फॅक्टरबाबतचं ‘एक्स्क्लुझिव्ह’ कन्फेशन

‘या’ चित्रपटामध्ये दुनियादारी फेम संजय जाधव साकारणार नकारात्मक भूमिका

अभिनेत्री दीप्ती सतीचा फॅशन आणि फिटनेस मंत्रा

Read More From मनोरंजन