लॉकडाऊननंतर चित्रपटगृहे सुरु झाली आणि अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाची रांग लागली. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित झाले. या स्पर्धेत मराठी चित्रपट ‘झिम्मा’ही प्रदर्शित झाला आणि दोन आठवडे या चित्रपटाचे शोज ‘हाऊसफुल्ल’ गेले. ‘झिम्मा’चे पहिल्या आठवड्यात 325 शोज लागले, त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात 700 पेक्षा जास्त म्हणजेच दुपटीहून अधिक शोज लागले होते. विशेष म्हणजे 50 टक्के सीट्सची परवानगी असतानाही पहिल्या दोन आठवड्यांमध्ये ‘झिम्मा’ने 5.83 करोडचा टप्पा पार केला. लॉकडाऊननंतर सुपरहिट ठरलेला ‘झिम्मा’ हा पहिला मराठी चित्रपट आहे. चित्रपटाचे छायाचित्रण, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय या सगळ्याच गोष्टी उत्तम जमून आल्याने प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंती दिली. ‘चलचित्र कंपनी’ प्रस्तुत ‘अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट’ आणि ‘क्रेझी फ्यू फिल्म्स’ निर्मित ‘झिम्मा’ चित्रपटाचे प्रेक्षकांबरोबरच पत्रकार, सिनेसृष्टी या सगळ्यांकडून प्रचंड कौतुक होत आहे.
अधिक वाचा – Bigg Boss Marathi: वाईल्ड कार्ड एंट्रीने पुन्हा आले हे स्पर्धक घरात
झिम्माचे यश आहे बहारदार
सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar), निर्मिती सावंत (Nirmiti Sawant), सुहास जोशी (Suhas Joshi), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), क्षिती जोग (Kshiti Jog), सोनाली, सायली संजीव (Sayli Sanjeev), मृण्मयी गोडबोले (Mrunmayee Godbole) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘झिम्मा’ (Zimma) चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटाचे छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह हे या चित्रपटाचे निर्माता आहेत. ‘झिम्मा’च्या या यशाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमेने (Hemant Dhome) सांगितले की, ” सर्वप्रथम ‘झिम्मा’ सुपरहिट ठरवल्याबद्दल मी सर्व मराठी प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो. प्रेक्षक, मित्र मंडळी, मराठीतील दिग्गज सोशल मीडियाद्वारे, फोनवरून, मेसेजकरून ‘झिम्मा’बद्दल भरभरून बोलत आहेत. मराठी प्रेक्षक नेहमीच मराठी चित्रपटांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. कोरोनाबद्दलची आपली भीती बाजूला सारून चित्रपटगृहांमध्ये येऊन तो सिनेमा पाहात आहे. ‘झिम्मा’चे यश हे माझे एकट्याचे नसून अनेक मजबूत खांदे कशाचीही पर्वा न करता खंबीरपणे उभे होते, म्हणूनच हा ‘झिम्मा’चा खेळ मांडता आला. ” निर्मिती सावंतचे या चित्रपटात खास कौतुक होत आहे. आपल्या सहज अभिनयाने निर्मितीने सर्वांनाच खिळवून ठेवली असल्याची दादही प्रेक्षक देत आहेत.
अधिक वाचा – कतरिना आणि विकीच्या लग्नात कोणाकोणाला आहे खास आमंत्रण
प्रेक्षकच नाही तर समीक्षकांचेही जिंकले मन
या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्याचे सर्व शोज हाऊसफुल्ल जात आहेत. विकएंडला संपूर्ण महाराष्ट्रात सर्व चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागले होते तर ‘झिम्मा’चे प्री बुकिंगही (pre booking) जोरदार सुरु आहे. विशेष म्हणजे विकएंडला ठाण्यातील एका मल्टिप्लेक्समध्ये या चित्रपटाचे 18 शोज (18 Shows) लागले होते आणि तेसुद्धा सगळे हाऊसफुल्ल. प्रेक्षकांबरोबरच पत्रकारांकडूनही या चित्रपटाचे प्रचंड कौतुक होत असून वर्तमानपत्रे, न्यूज चॅनेल्स, सिनेसृष्टीकडूनही ‘झिम्मा’ला सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. सोशल मीडियावरही (social media) या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. तसंच या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांचेच नाही तर अगदी समीक्षकांचेही मन जिंकले आहे. बऱ्याच वर्षांनी असा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे अशा प्रतिक्रियादेखील सध्या येत आहेत.
अधिक वाचा – एका दिवसात एका चित्रपटगृहात झिम्माचे 18 खेळ हाऊसफुल्ल
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade