मनोरंजन

आयुष्यात प्रेमाचे रंग उधळणार ‘मेरी गो राऊंड’

Dipali NaphadeDipali Naphade  |  Jan 31, 2022
merry-go-round-song-released-from-lochya-zala-re-in-marathi

प्रेक्षक ज्यासाठी उत्सुक आहेत असा बहुचर्चित तुफान विनोदी चित्रपट ‘लोच्या झाला रे’ (Lochya Zala re) या चित्रपटातील ‘मेरी गो राउंड’ हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे.  काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे आणि त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतानाच आता ‘लोच्या झाला रे’मधील ‘मेरी गो राऊंड’ (Merry Go Round) हे मजेदार गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यात सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav), अंकुश चौधरी (Ankush Choudhury) आणि वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) तुफान मस्ती करताना दिसत आहेत. या   गाण्यात सिद्धार्थ, अंकुश,वैदेही लंडनमधील निसर्गरम्य ठिकाणी आनंद लुटताना दिसत आहेत तर एका बाजूला प्रेमाचे रंगही उधळताना दिसत आहेत. तिघेही लंडनची सैर करतानाच स्थानिक लोकांची मजा घेतानाही पाहायला मिळत आहेत . ‘मेरी गो राऊंड’ हे गाणे उत्साहाने, आनंदाने भरलेले आहे. सकारात्मक दृष्टीकोन आयुष्यात किती महत्वाचा हे अधोरेखित करणारे हे गाणे आहे. तरूणांना भुरळ घालणारे हे गाणे मंदार चोळकर यांनी लिहले असून चिनार महेश या गाण्याचे संगीतकार आहेत तर अपेक्षा दांडेकर, हर्षवर्धन वावरे यांचा या गाण्याला  आवाज लाभला आहे . 4 फेब्रुवारी रोजी ‘लोच्या झाला रे’ चित्रपटगृहात प्रदर्शित  होणार आहे. ‘लोच्या झाला रे’ चित्रपटातील गाणे प्रदर्शित झाले असून तुफान प्रतिसाद मिळत आहे. 

अधिक वाचा – दाक्षिणात्य कलाकारांना बॉलिवूडमध्ये मिळते चुकीची वागणूक, अभिनेत्रीने केला खुलासा

लंडनमध्ये झाला चित्रपट चित्रीत 

‘लोच्या झाला रे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन पारितोष पेंटर आणि रवी अधिकारी यांनी  केले असून संजय मेमाणे यांनी छायाचित्रणाची धुरा सांभाळली आहे. नवीन चंद्रा, नितीन केणी, पारितोष पेंटर आणि शांताराम मनवे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे तर मंगेश रामचंद्र जगताप कार्यकारी निर्माता आहेत . लंडनमध्ये चित्रित झालेला हा चित्रपट मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत आयडिया दि एंटरटेनमेंट कंपनी आणि अभिनय मुंबई प्रोडक्शन अंतर्गत बनवण्यात आला असून वितरणाचे काम यूएफओ मुव्हीझने पाहिले आहे.  मराठी चित्रपटांच्या यादीत आणखी एका नव्या चित्रपटाचे नाव जोडले जाणार आहे. कारण खास प्रेमाच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये एक नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा ‘लोच्या झाला रे’ हा चित्रपट लवकरच म्हणजेच 4 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि सयाजी शिंदे हे नवीन वर्षात लोच्या करायला पूर्णपणे सज्ज झाले आहेत.या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज झाले असून हा चित्रपट तुफान कॉमेडी असल्याचे दिसत आहे. तुम्हालाही मराठी चित्रपट पाहायला आवडत असेल तर तुम्ही थोडा वेळ कळ सोसा कारण हा चित्रपट तुम्हाला बिग स्क्रिनवर पाहता येणार आहे.

अधिक वाचा – ब्रा साईज’ वक्तव्याप्रकरणी श्वेता तिवारीविरोधात गु्न्हा दाखल

दर्जेदार चित्रपटांची निर्मिती

पारितोष पेंटर आणि रवी अधिकारी यांनी ‘लोच्या झाला रे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून यापूर्वी पारितोष पेंटर यांनी ‘धमाल’, ‘टोटल धमाल’ अशा बॉलिवूडच्या चित्रपटांचे लेखन केले आहे. संजय मेमाणे यांनी ‘लोच्या झाला रे’चे छायाचित्रण केले असून त्यांनी याआधी  ‘झिम्मा’, ‘हिरकणी’, ‘हाफ तिकीट’ अशा सुपरहिट चित्रपटांच्या छायाचित्रणाची धुरा सांभाळली होती. नवीन चंद्रा, नितीन केणी, पारितोष पेंटर आणि शांताराम मनवे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर मंगेश रामचंद्र जगताप कार्यकारी निर्माता आहेत . लंडनमध्ये चित्रित झालेला हा चित्रपट मुंबई मुव्ही स्टुडिओ प्रस्तुत आयडिया दि एंटरटेनमेंट कंपनी आणि अभिनय मुंबई प्रोडक्शन अंतर्गत बनवण्यात आला असून वितरणाचे काम यूएफओ मुव्हीझने पाहिले आहे. या चित्रपटात विजय पाटकर, प्रसाद खांडेकर आणि रेशम टीपणीस यांच्याही प्रमुख भूमिका आहेत .

अधिक वाचा – नागिन 6 मध्ये तेजस्वी प्रकाशची एन्ट्री, बिग बॉस विनर झाल्यामुळे लागली लॉटरी

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन