Age Care

पुदीना आणि तुळशीच्या आईस क्यूबने बनवा अधिक तजेलदार त्वचा

Dipali Naphade  |  Jul 2, 2020
पुदीना आणि तुळशीच्या आईस क्यूबने बनवा अधिक तजेलदार त्वचा

मुंबईत अशीही कधी थंडी जास्त जाणवत नाही. बारा महिन्यांपैकी जवळपास दहा महिने तर आपल्याकडे उन्हाळाच जाणवतो. मग अशा वातावरणात त्वचेची काळजी घेणं नेहमीच कठीण होऊन जातं. ज्यांची त्वचा अधिक संवेदनशील आहे त्यांना तर अधिकच समस्यांना सामोरं जावं लागतं. त्वचेवर येणारी मुरूमं, त्वचेवर होणारी जळजळ, चेहऱ्यावर येणारा लालपणा, रॅश आणि लहान लहान पुळ्या या सगळ्या समस्या उद्भवतात. अशावेळी त्वचेची काळजी घेणं खूपच कठीण होतं आणि प्रत्येक जण सांगेल तसे वेगवेगळे उपाय आपण आपल्या त्वचेवर करत राहातो. पण यावर उत्तम उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्वचेची काळजी घेणयासाठी तुम्ही घरच्या घरीच एक उत्तम आणि चांगला उपाय करू शकता. पुदीना आणि तुळशीच्या आईस क्यूबचा वापर तुम्ही तुमच्या त्वचेसाठी करू शकता. ज्यांची  त्वचा तेलकट आहे त्यांना पुदीन्याचा फायदा तर होतोच पण तुळशीचा अधिक फायदा होतो. तसंच पुदीना आणि तुळशीच्या वापराने चेहऱ्यावरील चमक अधिक वाढते. नक्की पुदीना आणि तुळशीचे आईस क्यूब बनवून त्याचा कसा वापर करायचा ते पाहूया. 

पुदीना आणि तुळशीचे आईस क्यूब बनविण्याची पद्धत

Instagram

हे बनविण्यासाठी आपल्याला 6-7 तुळशीची पाने, 6-7 पुदिन्याच्या पाने, 3 चमचे गुलाबपाणी आणि पाण्याची आवश्यकता लागेल. सर्वात पहिल्यांदा तुम्ही 1 कप पाणी घ्या आणि त्या पाण्यात तुळस आणि पुदिन्याची पाने भिजवून ठेवा. ही पानं काही वेळाने नीट स्वच्छ धुवा आणि मग पाने वाटून घ्या. त्यानंतर 1 कप पाण्यात वाटलेली पाने घाला आणि ते पाणी उकळा. पाणी उकळून झाल्यावर ते पाणी थंड होऊ द्या. थंड झाल्यावर त्यात गुलाबपाणी मिक्स करा. गुलाबपाणी हे एखाद्या टोनरप्रमाणे काम करते. या मिश्रणामध्ये तुम्ही विटामिन ई च्या कॅप्सुलही मिक्स करू शकता. मिश्रण तयार झाल्यानंतर आईस ट्रे मध्ये हे मिश्रण घाला आणि फ्रिजरमध्ये ठेवा. आईस क्यूब तयार झाल्यावर तुम्ही चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमच्या चेहऱ्याला थंडपणा तर मिळेलच पण त्याचबरोबर त्वचेवरील बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शनदेखील दूर होईल. 

हिरव्यागार पुदीनाचे आश्चर्यकारक फायदे – Mint (Pudina) Benefits In Marathi

आईस क्यूब लावण्याची पद्धत

Shutterstock

तुमची त्वचा जर संवेदनशील असेल तर तुम्ही त्याचा वापर प्रत्यक्षपणे चेहऱ्यावर करू नका. आईस क्यूब एखाद्या कॉटन कपड्यात घ्या आणि मगच चेहऱ्याला लावा. आईस क्यूब लाऊन चेहरा ओला होतो. पण चेहरा सुकू द्यावा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. पुदीना आणि तुळशीचा आईस क्यूब बनविल्यानंतर तो 5 दिवसांच्या  आत वापरला जायला हवा हे लक्षात ठेवा. आईस क्यूब रोज चेहऱ्यावर लाऊ नका. सर्वात महत्त्वाचं  म्हणजे चेहरा धुताना गरम पाण्याचा वापर करू नका. 

उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेवर चमक राहण्यासाठी वापरा पुदीन्याचे 5 फेसपॅक

पुदीना आणि तुळशीचे चेहऱ्यासाठी फायदे

Instagram

पुदीना आणि तुळशी या दोन्ही वनस्पती चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरतात. पुदीना आणि तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल तत्व असतात,  जे चेहऱ्याला होणारा त्रास कमी करतात. तेलकट त्वचेसाठी पुदीना आणि तुळशीचे आईस क्यूब हे खूपच फायदेशीर ठरतात.  तुळशीच्या पानांचा फेसमास्क चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स निघून जाण्यास मदत होते. त्याचा फायदा सर्वात जास्त तुमची त्वचा अधिक तजेलदार बनविण्यासाठी तुम्हाला करून घेता येतो. तसंच याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही त्यामुळे तुम्ही घरच्या घरीदेखील याचा वापर व्यवस्थित करून घेऊ शकता. 

तांदूळ पीठ वापरा आणि त्वचा बनवा अधिक उजळ

Read More From Age Care