आरोग्य

सांधेदुखीचा त्रास दूर करण्यासाठी करा हा सोपा उपाय

Trupti Paradkar  |  Apr 14, 2020
सांधेदुखीचा त्रास दूर करण्यासाठी करा हा सोपा उपाय

सांधेदुखीमुळे तुम्हाला जीवन जगणं अक्षरशः असह्य होऊ शकतं. कारण या दुखण्याचे तुमच्या संपूर्ण जीवनशैलीवर परिणाम होतात. साधं उठणं आणि बसणं या दोन क्रियाही व्यवस्थित करता येत नाहीत. सहाजिकच सांधेदुखी हे जगातील सर्वात मोठं दुखणं आहे असं तुम्हाला वाटू लागतं. बऱ्याचदा वैद्यकीय उपचार आणि औषधांचाही यावर काहीच परिणाम होत नाही. मात्र दररोजच्या या दुखण्यावर तुम्ही घरातील काही गोष्टी वापरून तुम्ही उपचार करू शकता. घरगुती उपचारांनी तुमची सांधेदुखी पूर्ण बरी नाही झाली तरी काही काळ तुम्हाला त्यापासून आराम नक्कीच मिळू शकतो. या घरगुती उपचारांचा तुमच्या आरोग्यावर कोणताच दुष्परिणाम होत नाही.  शिवाय सध्या लॉकडाऊनमुळे वैद्यकीय उपचार घेणं शक्य नाही अशा वेळी थोडावेळ सांधेदुखीतून आराम मिळण्यासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. कारण त्यासाठी तुम्हाला घराबाहेर जाण्याची मुळीच गरज नाही. 

दुखण्याच्या मुळावरच करा उपाय –

आयुर्वेदानुसार आपल्या घरातच अशा अनेक नैसर्गिक गोष्टी असतात ज्यांचा वापर आपण दुखणे कमी करण्यासाठी करू शकतो. कोणत्याही दुखण्याचं मुख्य कारण असतं ते म्हणजे दुखऱ्या भागाच्या आत होणारा दाह. जर तुम्ही हा दाह कमी करू शकला तर तुमचे दुखणे हळूहळू कमी होते. वैद्यकीय उपचारांनीदेखील हा दाहच कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. सांधेदुखीवर केलेल्या उपचारांमुळे सांध्यांमधील दाह कमी झाल्यामुळे जखडलेले सांधे मोकळे होतात आणि तुम्हाला तुमची दैनंदिन कामे करणं सोपं जातं. आहारात फळं, ताज्या भाज्या आणि भरपूर पाणी याचा समावेश करून तुम्ही नैसर्गिक पद्धतीने शरीरातील उष्णता अथवा दाह नियंत्रणात आणू शकता. पण तेवढंच पुरेसं नाही कारण तुम्हाला यातून लवकर आराम मिळायला हवा. काही स्वयंपाकातील काही नैसर्गिक घटक शरीराचा दाह कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. नैसर्गिक घटकांपासून तयार तेलाने मसाज केल्यास तुमच्या दुखऱ्या भागातील उष्णता कमी होऊ शकते. यासाठीच आम्ही तुम्हाला हा मसाज कसा करायचा आणि त्यासाठी कोणते पदार्थ वापरायचे ते शअर करत आहोत. 

Shutterstock

मीठ आणि ऑलिव्ह ऑईलचा मसाज –

मसाज ऑईलसाठी लागणारे साहित्य –

एक कप पाणी, वीस चमचे ऑलिव्ह ऑईल, दहा चमचे जाडे मीठ

कसे तयार कराल मसाज ऑईल –

सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि मीठ पूर्ण विरघळेपर्यंत ढवळत राहा. मीठ विरघळल्यावर ते मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून साठवून ठेवा. ज्यामुळे मसाज करताना तुम्ही याचा वापर करू शकता. 

मसाज कसा करावा –

प्रत्येकवेळी वापर करण्यापूर्वी स्प्रे बॉटल चांगली ढवळून घ्या. दुखऱ्या भागावर हे मिश्रण स्प्रे करा. काही मिनीटे हलक्या हाताने त्यावर मसाज करा. फार रगडून मसाज करू नका. दिवसभरात तुम्ही फक्त पंधरा मिनीटे हा मसाज करू शकता. चांगल्या परिणामासाठी मसाज करण्यापूर्वी गरम पाण्याच्या पिशवीने तो भाग शेकवा. ज्यामुळे त्या भागावरील त्वचेतील रोमछिद्रे मोकळी होतील आणि ते मिश्रण त्वचेमध्ये चांगले मुरेल. अशा पद्धतीने दररोज हा उपाय करून तुम्ही तुमची सांधेदुखी कमी करू शकता. ऑलिव्ह ऑईलमध्ये अॅंटिऑक्सिडंट असतात. ज्यामुळे तुमच्या सांधेदुखीतून तुम्हाला आराम मिळू शकतो. शिवाय मीठ हे निर्जंतूक असते त्यात सोडीयम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, झिंक, तांबे, कॅल्शियम असे अनेक खनिज पदार्थ असतात. ज्यामुळे दुखऱ्या भागावरील दाह नक्कीच कमी होऊ शकतो.

मात्र लक्षात ठेवा हा फक्त एक नैसर्गिक उपाय आहे. यामुळे तुमच्या सांधेदुखीतून तुम्हाला तात्पुरता आराम मिळेल. त्यामुळे सांधेदुखी पूर्ण बरी करण्यासाठी तुम्हाला या उपायासोबतच वैद्यकीय उपचार आणि औषधे घेणं गरजेचं आहे. वैद्यकीय उपचार न घेता हा उपाय करू नका.

Shutterstock

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

 

अधिक वाचा –

वजन कमी करण्यासाठी जमिनीवर बसून जेवणे ठरेल फायदेशीर

तुम्हाला पोटावर झोपायची सवय असल्यास, त्वरीत बदला ही सवय

नृत्य केल्याने शरीरात होतात ‘हे’ आश्चर्यकारक बदल

 

Read More From आरोग्य