बॉलीवूड

हिंदी रियालिटी शो वर मराठी स्पर्धकांंचा डंका

Dipali Naphade  |  Feb 24, 2020
हिंदी रियालिटी शो वर मराठी स्पर्धकांंचा डंका

हिंदी रियालिटी शो म्हटला की, त्यामध्ये फारच मराठी स्पर्धक दिसतात असा बऱ्याचदा समज असतो. पण असे काहीही नाही. सध्या कोणताही हिंदी रियालिटी शो बघितला तर त्यातील स्पर्धक, विजेता, पहिल्या पाचातील स्थान यामध्ये मराठी स्पर्धकांचाच डंका आहे. डान्स प्लस (Dance+), इंडियन आयडॉल(India Idol 11), खतरों के खिलाडी (Khatro ke Khiladi 10 – Fear Factor) यासारखे सर्व रियालिटी शो पाहिल्यांनतर याचे प्रत्यंतर येते. नुकताच डान्स प्लसचा पाचवा हंगाम संपला असून यामध्ये डोंबिवलीकर रूपेश बनेने विजेतेपदाचे स्पप्न बाळगले आणि विजेतेपद पटकावलेही. तर दुसऱ्या बाजूला इंडियन आयडॉलमध्ये मराठमोळ्या रोहित श्याम राऊतनेही झेंडे गाडले. पहिल्या पाचात आपले स्थान त्याने भक्कम करत विजेता सनी हिंदुस्तानीला तगडी टक्कर दिली. तर नुकतेच खतरों के खिलाडी हा सेलिब्रिटींचा स्टंट रियालिटी शो सुरू झाला आहे आणि यात एक नाही, दोन नाही तर तब्बल तीन मराठमोळे स्पर्धक आहे. अमृता खानविलकर, तेजस्वी प्रकाश आणि सर्वांचा लाडका धर्मेश येलांडे या तिघांनीही पहिल्याच आठवड्यात आपण इथे टिकायला आलो आहोत याची चुणूक दाखवून दिली आहे.

रूपेशने मेहनतीने मिळविले डान्स प्लसचे विजेतेपद

मुळचा डोंबिवलीचा असणारा रूपेश बने डान्स प्लसमध्ये आला आणि या टीशर्ट बॉयने सर्वांच्या मनावर एक छाप सोडली. स्वप्न बघितलं तर ते मेहनतीने पूर्ण करता येतं ही जिद्द त्याने बाळगली आणि यावर्षीच्या डान्स प्लसचे विजेतेपद त्याने खिशात घातलं. इतकंच नाही तर गेल्यावर्षीचा चेतन साळुंखे हादेखील मराठीच होता. धर्मेश येलांडे हा मराठी मेन्टर असताना रूपेशने आपल्या नृत्यातही त्याची  झलक दाखवून दिली. रूपेशचा प्रवास हा थक्क करणारा होता. मराठी माणसं असो वा स्पर्धक नेहमी मागे राहतात हा समज सध्या बरीच मराठी माणसं मोडीत काढीत आहेत आणि माधुरी दीक्षित, रितेश देशमुख यासारख्या कलाकारांनी जसा हिंदीमध्ये जसा मराठीचा डंका वाजवला तसाच पुढची पिढीही मराठीचा डंका वाजवत आहेत याला वाद नाही. 

करण जोहरच्या ‘तख्त’ चित्रपटाच्या लेखकाला हिंदू विरोधात ट्विट करणे पडले भारी

रोहित राऊतने जिंकली मने 

इंडियन आयडॉलचा विजेता भलेही सनी हिंदुस्तानी झाला आहे. पण मराठमोळ्या रोहित राऊतने आपल्या आवाजाने आणि वेगवेगळी गाणी गाऊन केवळ परीक्षकांचीच नाही तर प्रेक्षकांचीही मने जिंकली. त्याशिवाय स्पर्धेत येणाऱ्या  प्रत्येक पाहुण्यानेही रोहितच्या गाण्याचे कौतुक केले. रोहित राऊत हे खरं तर मराठी चित्रपटसृष्टीत बऱ्यापैकी नावाजलेले नाव होते. पण इंडियन आयडॉलच्या माध्यमातून त्याने देशभरात आपली ओळख निर्माण केली असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. अनेक जणांना हरवून पहिल्या पाच स्पर्धकांमध्ये रोहित राऊतने बाजी मारत आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. 

बॉलीवूडमध्ये ठरले अपयशी पण दुसरे करिअर निवडून झाले स्टार सेलिब्रिटी

धर्मेश, अमृता आणि तेजस्वीचा अनोखा अंदाज

Instagram

रोहित शेट्टी होस्ट असलेला खतरों के खिलाडी हा शो नेहमीच चर्चेत असतो. यावर्षी या स्पर्धेत तब्बल तीन मराठी चेहरे आहेत. हा शो नुकताच सुरू झाला आहे आणि पहिल्याच आठवड्यात धर्मेश येलांडे, अमृता खानविलकर आणि तेजस्वी प्रकाश या तिन्ही मराठमोठ्या कलाकारांनी आपली छाप सोडली आहे. त्यातही धर्मेश सर्वात पुढे आहे. तेजस्वीचा निर्मळपणा, क्यूटनेस तर अफलातून आहे. धर्मेशचा बिनधास्तपणा त्याच्या स्टंटमधूनही दिसून येतो. तर अमृता खानविलकरही मागे नाही. आपल्या बिनधास्तपणाने तिनेही सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत. आता हा शो जसजसा पुढे जाईल तसतसे हे मराठी चेहरे काय कमाल दाखवणार याकडे नक्कीच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

‘मिस्टर इंडिया’ मधलं प्रसिद्ध गाणं होणार ‘या’ अभिनेत्रीवर चित्रित

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

Read More From बॉलीवूड