गाण्याचा आणि भावनांचा फार जवळचा संबंध आहे. दिवसाच्या प्रत्येक प्रहराला एक विशेष स्थान असते. पहाटेचा काळ हा रामप्रहर म्हणून ओळखला जातो. रामप्रहर म्हणजे काय? तर या प्रहराची सुरूवात नेहमीच देवाची भक्ती आणि उपासनेने केली जाते. आजकालच्या धावपळीच्या काळात जरी देवपूजा अथवा पूजाअर्चना करण्यास फार वेळ मिळत नसला तरी या प्रहराची सुरूवात तुम्ही पहाटेची मराठी भक्ती गीते ऐकत नक्कीच करू शकता. मराठीत अशी अनेक पहाटेची भक्ती गीते (devotional morning marathi songs) आहेत. यासाठीच दिवसाची सुरूवात सकारात्मक करण्यासाठी ऐका ही पहाटेची भक्ती गीते (marathi morning song).
Table of Contents
गजानना श्री गणराया
गणपती हा सर्वांचाच आवडता देव आहे. म्हणूनच सर्वजण त्याला लाडाने बाप्पा असं म्हणतात. शिवाय कोणत्याही कामाची सुरूवात श्री गणेशाच्या आशीर्वादानेच केली जाते. त्यामुळे गणेशाची आराधना करणारे हे भक्तीगीत सर्वजण आवर्जून ऐकतात. “ गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया ” हे गाणं ऐकताना नकळत तुमच्या मनातील भक्तीत वाढ होत जाते.
- गीतकार – शांता शेळके
- गायक – लता मंगेशकर
- संगीतकार – पं. ह्रदयनाथ मंगेशकर
वाचा – अध्यात्म म्हणजे काय
तुझे रूप चित्ती राहो
गणपती बाप्पाप्रमाणेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे विठ्ठल. विठ्ठलाची उपासना आणि पुजा महाराष्ट्रातील घराघरात केली जाते. पंढरपूरला आषाढी आणि कार्तिक एकादशीला खास वारीसाठी जाणारा एक मोठा वारकरी समाज आहे. विठ्ठलाची काळी सावळी मुर्ती म्हणजे विश्वरूपी परमेश्वराचे साक्षात रूप. अशा या सावळ्याची आराधना करण्यासाठी “तुझे रूप चित्ती राहो” गाणं अगदी परफेक्ट आहे.
- गीतकार – ग. दि. गाडगुळकर
- गायक – सुधीर फडके
- संगीतकार – सुधीर फडके
- चित्रपट – संत गोरा कुंभार
वाचा – Lata Mangeshkar Marathi Songs
केशवा माधवा
पहाटेच्या वेळी भक्ती गीते ऐकण्यामुळे तुमच्या मनात सकारात्मक आणि आल्हाददायक भावना निर्माण होतात. केशवा माधवा हे भक्ती गीत तुम्हाला नक्कीच आवडत असेल. केशव अथवा माधव म्हणजे हाकेसरशी भक्ताच्या मदतीला धावून येणारा कृष्ण. अशा कृष्णाची लाडीवाळपणे भक्ती करणारे हे गीत पहाटेच्या वेळी नक्तीच मनाला आधार देते.
- गीतकार – रमेश अणावकर
- गायक – सुमन कल्याणपूर
- संगीतकार – दशरथ पुजारी
वाचा – आषाढी एकादशी माहिती मराठी
सार्थ हरिपाठ
हरिपाठ म्हणजे लाडीकपणे केलेले हरिचे अथवा ईश्वराचे स्मरण. ज्ञानेश्वर महाराजांचे गुरू त्यांचे मोठे बंधू निवृत्ती महाराज हे होते. सार्थ हरिपाठ या ग्रंथात ज्ञानेश्वर महाराजांनी ईश्वराचे नामस्मरण करण्याबाबत बोध केलेला आहे. नामाचे वर्णन आणि महत्त्व त्यांनी हरिपाठातून व्यक्त केलं आहे. हा हरिपाठाचे पहाटेच्या वेळी श्रवण, वाचन आणि मनन केल्यास अनेक दुःखाचा नाश होतो असं म्हणतात.
सूचना – अनेक गीतकार आणि संगीतकारांनी हरिपाठ संगीतबद्ध केलेला आहे. त्यामुळे तो निरनिराळ्या चालींमध्ये उपलब्ध आहे.
पसायदान
ज्ञानेश्वर महाराजांनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली. या ज्ञानेश्वरीचा सारांश सांगण्यासाठी त्यांनी पसायदान लिहीले. पसायदान ही एक सकारात्मक प्रार्थना आहे. विश्वात्मक ईश्वराकडे सर्वांच्या कल्याण्यासाठी मागितलेली प्रार्थना म्हणजे पसायदान. म्हणूनच पहाटेच्यावेळी पसायदान ऐकण्यामुळे मनात चांगले विचार निर्माण होतात. तसंच कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा देण्याघेण्याच्या निमित्ताने ही तुम्ही हे ऐकू किंवा शेअर करू शकता.
सूचना – अनेक गीतकार आणि संगीतकारांनी पसायदान संगीतबद्ध केलेलं आहे. त्यामुळे ते निरनिराळ्या चालींमध्ये उपलब्ध आहे.
देहाची तिजोरी
काही गाणीच अशी असतात जी मनाचा ठाव घेतात आणि मनात खोलवर कुठेतरी गुंजत राहतात. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा हे गाणंही अशाच पैकी एक आहे. या गाण्यातून संपूर्ण जीवन आणि जीवनाचा भक्तीशी असलेला संबध जाणवत राहतो. म्हणूनच पहाटेच्या वेळी अथवा एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात हे गाणं आवर्जून ऐकलं जातं.
- गीतकार – जगदीश खेबुडकर
- गायक – सुधीर फडके
- संगीतकार – सुधीर फडके
- चित्रपट – आम्ही जातो आमच्या गावा
आकाशी झेप घे रे
चित्रपट आणि चित्रपटातील भक्ती गीते यांचा प्रभाव नेहमीच प्रेक्षकांवर होत असतो. काही गाणी मनाच्या गाभाऱ्यात अशी रूंजी घालत राहतात. आकाशी झेप घे रे पाखरा हे असंच एक लोकप्रिय गाणं हे आजही रसिकप्रेक्षकांच्या मनात रुजून राहीलं आहे. या गाण्यात माणसाचं आयुष्य आणि परमार्थांचा सुरेख संगम दर्शवण्यात आला आहे.
- गीतकार – जगदीश खेबूडकर
- संगीतकार – सुधीर फडके
- गायक – सुधीर फडके
- चित्रपट – आराम हराम आहे
विठ्ठला तु वेडा कुंभार
विठ्ठलावर लिहीलेली अनेक भक्ती गीते आहेत. मात्र त्यापैकी काही भक्तीगीते रसिकांच्या नेहमीच लक्षात राहतात. त्यापैकीच एक गाणं म्हणजे विठ्ठला तू वेडा कुंभार हे भक्तीगीत. या भक्तीगीतातून विश्वाची निर्मिती आणि त्यामागे असलेली सुंदर अंतर्गत व्यवस्था मांडण्यात आलेली आहे.
- गीतकार – ग. दि. माडगूळकर
- संगीतकार – सुधीर फडके
- गायक – सुधीर फडके
- चित्रपट – प्रंपच
कानडा राजा पंढरीचा
विठ्ठलाच्या भक्तीवर आधारित हे एक आणखी एक भक्तीगीत जे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमीच गायलं जातं. हे गाणं ईश्वरभक्तीचं अप्रतिम प्रतिक आहे.
- गीतकार – ग. दि. माडगूळकर
- संगीतकार – सुधीर फडके
- स्वर – पं. वसंतराव देशपांडे, सुधीर फडके
- चित्रपट – झाला महार पंढरीनाथ
शोधीसी मानवा
भक्तीगीतांच्या मैफिलीत शोधीसी मानवा राऊळी मंदिरी हे भक्तीगीत आवर्जून गायलं जातं. या गाण्यातून देवाचा शोध बाहेर न शोधता त्याचा शोध स्वतःच्या मनात कसा घ्यायचा हे मांडण्यात आलेलं आहे. ज्यामधून खऱ्या भक्तीचा मार्ग भक्तांना दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
- गीतकार – वंदना विटणकर
- गायक – मोहम्मद रफी
- संगीतकार – श्रीकांत ठाकरे
घनःश्याम सुंदरा
पहाट म्हणजे सुरूवात. नव्या दिवसाची, नव्या आकांक्षांची नवी सुरूवात करण्यासाठी पहाटेचा काळ हा अप्रतिम काळ असतो. या वेळी जर अशी उत्साह वाढवारी गाणी ऐकली तर मन आणि प्रसन्न आणि आनंदी होतं. यासाठीच सुर्योदयाचं स्वागत करणारं हे गाणं पहाटेला नक्कीच ऐकायला हवं.
- गीतकार – शाहीर होनाजी बाळा
- गायक – पंडितराव नगरकर आणि लता मंगेशकर
- संगीतकार – वसंत देसाई
- चित्रपट – अमरभूपाळी
वाचा – संगीतप्रेमींसाठी मेजवानी, लता मंगेशकर मराठी गाणी
रामा रघुनंदना
भगवान राम यांची आराधना करणारं हे भक्तीगीतही फारच लोकप्रिय आहे. हे भावगीत पहाटेच्या वेळी ऐकण्यासाठी अथवा एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी अगदी बेस्ट आहे.
- गीतकार – ग. दि. माडगूळकर
- संगीतकार – दत्ता डावजेकर
- गायक – आशा भोसले
- चित्रपट – सुखाची सावली
अधिक वाचा –
जीवन जगताना मानसिक समाधान देतील हे ‘50′ आध्यात्मिक सुविचार
या सवयींमुळे तुमच्यात होतील सकारात्मक बदल
Vaastu Tips : घरातील दिशेनुसार करा या रोपं आणि झाडांची लागवड
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade