DIY लाईफ हॅक्स

स्वयंपाकघरात असायलाच हव्यात या इलेक्ट्रॉनिक वस्तू

Leenal Gawade  |  Apr 11, 2021
स्वयंपाकघरात असायलाच हव्यात या इलेक्ट्रॉनिक वस्तू

आधुनिक सुख-सोयींनी समृद्ध असं स्वयंपाकघर असावं असं प्रत्येकीला वाटत. किचनशी निगडीत सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आपल्याकडे असाव्यात असा प्रत्येकीचा हट्ट असतो. त्यामुळेच बरेचदा किचनसाठी काही नवे गॅजेट आले की, ते घेण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. त्यातील काही जणं या वस्तू घेतातही पण कालांतराने किचनमधील अडगळीच्या कप्प्यात जाऊन त्या पडतात. टोस्टर, रोटी मेकर, ग्रीलर, पाणी गरम करण्याचे भांडे, मायक्रोव्हेव,फुड प्रोसेसर असा काही इलेक्ट्रॉनिक वस्तू बरेच जण घेतात. पण किचनमध्ये तुम्हाला खरंच त्याची गरज आहे का? याचा कधीतरी तुम्ही विचार केला आहे का? नसेल तर आज स्वयंपाकघरात अगदी असायलाच हव्यात अशा काही इलेक्ट्रॉनिक वस्तू जाणून घेऊया.

भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये जास्त काळ टिकवण्यासाठी सोप्या टिप्स

मिक्सर

सगळ्यात महत्वाचा आणि रोजच्या कामासाठी वापरता येईल असा मिक्सर हा सगळ्यांकडे असायला हवा. चटणी, मसाला, वाटप, स्मुदी असे वेगवेगळे पदार्थ यामध्ये करता येतात. त्यामुळेच हे मिक्सर फार गरजेचे असतात. पण आता मिक्सरमध्ये इतक्या व्हरायटी असतात की, त्यामध्ये वेगवेगळ्या अटॅजमेन्ट आणि बरंच काही येतं. या गोष्टी पहिल्यांदा फार बऱ्या वाटतात. पण नंतर त्याचा कंटाळा येऊ लागतो. कमीत कमी अटॅजमेंट आणि कमीत कमी जागा अडवणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू या नेहमी वापरल्या जातात. हे लक्षात घेऊन तुम्ही मिक्सरची निवड करा. 

घरासाठी रंग निवडताना या गोष्टी घ्या विचारात

मायक्रोव्हेव

एखादे नवे किचन म्हटले की, त्यामध्ये मायक्रोव्हेव हा अगदी हवाच. जेवण गरम करण्यासाठी, केक किंवा अस काही पदार्थ करण्यासाठी मायक्रोव्हेव हा फार उत्तम आहे. जर तुमच्या किचनमध्ये योग्य जागा असेल तर तुम्ही एखादा मायक्रोव्हेव घेण्यास काहीच हरकत नाही. मायक्रोव्हेवमुळे बरीच काम पटकन होतात. त्यामुळे तुमच्या किचनच्या आकारानुसार आणि तुमच्या वापरानुसार तुम्ही एखादा चांगला मायकक्रोव्हेव निवडावा. 

वॉटर प्युरीफायर

शुद्ध आणि स्वच्छ प्यायचे पाणी हवे असेल तर हल्ली किचन सिंकच्यावर वॉटर प्युरीफायर लावून दिले जाते. त्यामुळे तुम्ही थेट नळातून आलेले आरो वॉटर पिऊ शकता. जर तुमच्याकडे वॉटर प्युरीफायर नसेल तर तुम्ही तो लावून घ्या. तकधीही आणि कोणत्याही वेळी तुम्हाला हा प्युरीफायर कामी येतो. त्यामुळे तुम्हाला पाणी सतत गरम करुन पिण्याची गरज भासत नाही. जर तुम्हाला पाणी सतत गरम करुन प्यायचे नसेल तर तुम्ही अशाप्रकारे वॉटर प्युरीफायर नक्कीच घेऊ शकता.  

पाणी गरम करण्याचे भांडे

पाणी गरम प्यायची जर तुम्हाला सवय असेल तर तुम्ही पाणी गरम करण्याचे भांडे देखील घेऊ शकता. ज्यांना मायक्रोव्हेव घेणे शक्य नाही अशांनी गरम पाण्याचे भांडे फक्त गरम पाण्यासाठीचे हे भांडे घेण्यास काहीच हरकत नाही. असे पाणी गरम करण्याचे भांडे तुम्हाला किचनमध्येच नाही तर सगळीकडे वापरता येते. त्यामुळे जर तुम्हाला वॉटर प्युरीफायर आणि मायक्रोव्हेव असे दोन्ही घ्यायचे नसेल तर तुम्ही पाणी गरम करण्याचे भांडे अगदी हमखास घेऊ शकता.

या अशा काही इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी आहेत ज्या तुम्हाला रोजच्या वापरासाठी खूप गरजेच्या आहेत. या वस्तूचा तुमच्या रोजच्या कामांसाठी उपयोग  होतो. पण किचनमधील काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू या तुम्ही टाळणेच बरे कारण त्यामुळे किचनमध्ये नुसती अडगळ होते. त्याचा उपयोग काहीही होत नाही.

मिक्सर अथवा फूड प्रोसेसर वापरताना या गोष्टी ठेवा लक्षात, लवकर नाही होणार खराब

Read More From DIY लाईफ हॅक्स