लाईफस्टाईल

#StrengthOfAWoman : ‘या’ आहेत बॉलीवूडच्या सुपरवुमन ज्यांनी स्वबळावर केले चित्रपट सुपरहिट

Trupti Paradkar  |  Mar 6, 2019
#StrengthOfAWoman : ‘या’ आहेत बॉलीवूडच्या सुपरवुमन ज्यांनी स्वबळावर केले चित्रपट सुपरहिट

आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या महिला दिनानिमित्त आम्ही तुम्हाला बॉलीवूडमधील अशा सुपरवुमन बाबत सांगणार आहोत. ज्यांनी सिनेसृष्टीला आपल्या सक्षम अभिनयाने सुपरहिट चित्रपट दिले आहेत. चित्रपटसृष्टीत एक काळ असाही होता जेव्हा चित्रपट फक्त अभिनेत्यांच्या नावामुळे सुपरहिट होत असत. राजेंद्रकुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन पासून ते अगदी शाहरुख खान, अमिर खान आणि सलमान खान, अक्षय कुमार पर्यंत असे अभिनेते आहेत ज्यांच्यासाठी खास भूमिका लिहील्या जात असत. अशा चित्रपटांमध्ये अभिनेत्री नेहमीच प्रमुख भूमिका असूनही सपोर्टिंग कलाकाराप्रमाणे वावरत असत. अभिनेत्यांपेक्षा अभिनेत्रींना मिळणारे  मानधनही नेहमीच कमी असे. मात्र बदलत्या काळानुरुप चित्रपटाच्या निर्मितीत बदल झाला आहे. माहिलाप्रधान चित्रपटांना देखील तितकाच दर्जा चाहत्यांकडून मिळू लागला आहे. त्यामुळे अनेक महिला बायोपिकदेखील बॉलीवूडमध्ये निर्माण होत आहेत. बॉलीवूडमध्ये अशा अनेक हिरॉईन्स आहेत ज्यांनी आपल्या कतृत्व आणि अभिनयाच्या बळावर अनेक चित्रपट हीट केले आहेत.चित्रपटात कोणताही सूपर हिरो नसताना अथवा चित्रपटातील त्यांच्या भूमिका अगदी सामान्य असतानाही त्यांनी केवळ अभिनयाच्या जोरावर या चित्रपटांना लोकप्रिय केलं आहे. त्यामुळे या अभिनेत्रींचे मानधन देखील एखाद्या सूपर हिरोपेक्षा कमी नाही. यासाठी जाणून घेऊया बॉलीवूडमधील या सुपरवुमन्स

दीपिका पदुकोन

आज बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत अभिनेत्री म्हणून दीपिकाची ओळख निर्माण झाली आहे. दीपिकाने तिच्या अभिनयकौशल्याने आतापर्यंत अनेक सूपर हिट चित्रपट दिले आहेत. कॉकटेल, पीकू पासून ते  अगदी पद्मावतपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये तिच्या भुमिकांना चाहत्यांनी पसंत केलं आहे. तिच्या आगामी छपाक चित्रपटाची चाहते आता प्रतिक्षा करत आहेत. त्यामुळे महिलाप्रधान चित्रपटांसाठी दीपिकाला प्रथम प्राधान्य मिळतं. शिवाय तिच्या चित्रपटाचे मानधनदेखील 14 ते 15 कोटींच्या वर असते.

प्रियंका चोप्रा

एके काळच्या मिस वर्ल्ड प्रियंका चोप्राने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. फॅशन, 7 खून माफ आणि मेरीकॉम हे तिचे महिलाप्रधान चित्रपट आहेत. या चित्रपटांमधून तिच्या अभिनय कौशल्याचे दाखले मिळू शकतात. तिच्या अभिनयासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. शिवाय चित्रपटासाठी प्रियंका मानधनही 13 कोटींच्या वरच घेते.

कंगना रणौत

बॉलीवूड सध्याच्या घडीला अभिनेत्री कंगना रणौत ही सतत चर्रेत असणारी अभिनेत्री आहे. तिच्या सडेतोड वक्तव्य  आणि सोशल मीडियावरील पोस्ट यामुळे ती सतत चर्चेत असते. तनु वेड्स मनु, तनु वेड्स मनु रिर्टन, क्वीन आणि मनिकर्णिका अशा महिलाप्रधान चित्रपटातून तिने स्वतःची एक निराळी छाप प्रेक्षकांच्या मनात निर्माण केली आहे. कंगनालाही तिच्या करियरमध्ये दमदार अभिनयासाठी दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. कंगना तिच्या चित्रपटांसाठी 9 ते 11 कोटी मानधन स्विकारते.

आलिया भट

आलिया भटला बॉलीवूडमध्ये पदार्पण करून काहीच वर्ष झाली आहेत. मात्र तरीही तिने तिच्या अभिनयाने अनेक चित्रपट सूपरहिट केले आहेत. हायवे, उडता पंजाब, राझी या चित्रपटातील तिच्या अभिनयकौशल्याचे अनेकांनी कौतुक केले. आलीयाचे अनेक चित्रपट केवळ तिच्या निरनिराळ्या अभिनय छटांमुळे बॉक्स ऑफिस गाजवू शकले. आलिया देखील तिच्या चित्रपटांसाठी 8 कोटींच्या घरात मानधन घेते.

विद्या बालन

पद्मश्री आणि नॅशनल पुरस्कार विजेती बिद्या बालन बॉलीवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. विद्या बालनचे अनेक चित्रपट महिलाप्रधा आहेत. डर्टी, कहानी, तुम्हारी सुलू अशा अनेक चित्रपटात तिने वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. विद्या बालनचेदेखील चित्रपटातील मानधन 8 कोटींहून जास्त आहे.

 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

Read More From लाईफस्टाईल