मुंबई पोलीस हे केवळ आपली रक्षाच करत आहेत असं नाही तर त्यांच्या ट्विटर हँडलवरून केवळ सामान्य जनतेलाच नाही तर सेलिब्रिटींनाही ‘अफलातून’ उत्तरे देऊन सर्वांचे मन जिंकून घेत आहेत. सोशल मीडिया हा सध्याचा सर्वात मोठा आपल्या आयुष्याचा भाग बनला आहे. ट्विटरवरून तर अनेकांना ट्विट केल्यामुळे आपल्या कामात मदतही झाली आहे. सध्या कोरोनामुळे पोलीस आपले कर्तव्य अहोरात्र आपल्या जनतेसाठी बजावत आहेत. आपल्या जिवाची पर्वा न करता पोलीस दिवसरात्र राबत आहेत. असे असताना बरेच सेलिब्रिटी पोलिसांना ट्विट करूनही धन्यवाद देत आहे. या धन्यवादाचा स्वीकार करताना मात्र पोलिसांच्या ट्विटर हँडलवरून अशी ‘अफलातून’ उत्तरे मिळत आहेत की, सामान्य जनताही त्यामध्ये सामील होऊन आता मजेशीर प्रतिसाद देऊ लागली आहे. सोशल मीडियाद्वारेही पोलीस आपली मने जिंकून घेत आहेत.
आलिया भटला प्रतिसाद द्यायला झाले ‘राझी’
आलिया भटने आपल्या पोलिसाना टॅग करून सतत दिवसरात्र राबत सर्वांची काळजी करत असल्याबद्दल धन्यवाद दिले. तसेच त्यांच्यासाठी तरी किमान घरात राहा अशी विनवणीही लोकांना केली. यावर मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवरून लोकांची मनं जिंकणारा प्रतिसाद मिळाला. मुंबई पोलींना दिलेल्या रिप्लायमध्ये म्हटले, ‘मुंबईकरांनो, आम्ही आशा करतो की, मिस आलिया भटने दिलेल्या या सल्ल्याबद्दल तुम्ही नक्कीच ‘राझी’ असाल आणि कोणत्याही ‘गल्ली’मध्ये उगीचच फिरणार नाही आणि सर्व जण आपल्या ‘डिअर जिंदगी’ची नक्की काळजी घ्याल.’ यानंतर ट्विटरवर एक मजेशीर उत्तरांची आणि मुंबई पोलिसांना टॅग करत ट्विटरवर लोकांनीही प्रतिसाद द्यायला सुरूवात केली. त्यामुळे सध्या मुंबई पोलिसांचे सोशल मीडिया अकाऊंटही भरभरून प्रतिसाद मिळवत आहे.
तडजोड’ करण्यासाठी तिप्पट पैशाची ऑफर, ‘शुभमंगल ज्यादा सावधान’च्या अभिनेत्रीचा खुलासा
अजय देवगणने केलेल्या स्तुतीलाही दिला प्रतिसाद
लॉकडाऊनदरम्यान न थकता आपली ड्युटी करत असलेल्या मुंबई पोलिसांची अजय देवगणनेही स्तुती केली. ‘मुंबई पोलीस, तुम्ही जगातील उत्कृष्ट पोलिसांपैकी एक मानले जाता. COVID – 19 मध्ये तुम्ही दिलेल्या योगदानाची तुलना होऊच शकत नाही. तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा हा सिंघम त्याची खाकी घालून तुमच्यासह तयार असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र’. अजय देवगणच्या या भावनात्मक ट्विटनंतर मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवरूनही तितकाच भावनिक प्रतिसाद मिळाला. मुंबई पोलिसांनी लिहिले, ‘डिअर ‘सिंघम’ सध्या ‘खाकी’ ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ अशी करण्यासाठी जे काम करता येणं शक्य आहे ते आपलं कर्तव्य करतच आहे.’
शाहरुख खानची मुलगी होतेय इंटरनेट सेन्सेशन,पाहा तिचा हॉट अंदाज
अभिषेक बच्चनच्या ट्विटवरही केली ‘धूम’
दरम्यान अभिषेक बच्चनलाही मुंबई पोलिसांनी दिलेल्या उत्तराची चर्चा आहे. अभिषेक बच्चननेही पोलिसांचे धन्यवाद मानले. ‘कायम त्यांचे ऋणी राहू आणि मुंबई पोलीस अतिशय चांगले काम करत आहेत.’ यावर पोलिसांनी प्रतिसाद दिला, ‘आम्ही ‘एसीपी जय दीक्षित’च्या मार्गावर चालत असून शहर पुन्हा एकदा पूर्ववत होईल या प्रयत्नात आहोत, तेही अगदी ‘धूम’शान’, सर्व मुंबईकरांनी केवळ बाहेर जाण्याचे ‘दस बहाने’ करू नयेत ही एकच अपेक्षा आहे.’
महाभारत मालिकेबाबतच्या या गोष्टी वाचून व्हाल अवाक
सुनील शेट्टीला करून दिली ‘धडकन’ची आठवण
सुनील शेट्टीने मुंबई पोलिसांना टॅग करत लिहिले, ‘हिरोज – ज्यांच्यावर आमचे खूप प्रेम आहे.’ सुनील शेट्टीला रिप्लाय देताना पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी सामान्य जनतेचं मन जिंकून घेतलं. ट्विटला रिप्लाय देताना मुंबई पोलिसांनी लिहिले, ‘आमची प्रत्येक ‘धडकन’ ही केवळ शहरासाठीच आहे’
बॉलीवूडमधील प्रत्येक कलाकार नेहमीच पोलिसांना पाठिंबा देत आला आहे. त्याशिवाय बॉलीवूडमधील कितीतरी कलाकारांनी या दरम्यान पैशाची मदतही केली आहे. पीएम फंड तसेच गरीबांची मदत अशी अनेक जणांनी मदत केली आहे. पुन्हा एकदा बॉलीवूडदेखील या संकटात सर्वांच्या पाठिशी उभे राहिले आहे. त्याचप्रमाणे घरात बसून पोलिसांची मदत करण्याचे आवाहनही वेळोवेळी सगळेच करत आहेत.
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje