स्लिम फिगरची हल्ली इतकी क्रेझ आहे की, मुलगी जरा गुटगुटीत असली तरी लोकं तिला जाडी म्हणून मोकळे होतात. एखादी वेगळी फॅशन करायची इच्छा झाली तरी ते केवळ थोडे शरीराने जास्त असल्यामुळे लोकं त्यांना फॅशन करु देत नाही. सतत त्यांना त्यांच्या गुटगुटीतपणावरुन लोकं चिडवत राहतात. तुम्ही एकदा त्यांना ही गोष्ट बोलता पण ती त्यांना आयुष्यभराचे दु:ख देऊन जाते. शरीर कमी करण्यासाठी नको नको ते प्रयोग ते करत राहतात. याचा विपरित परिणाम त्यांच्या शरीरावर होत राहतात. अनुसयाला ही बॉडीशेमिंगवरुन अनेकदा ट्रोल केले गेले. आज जाणून घेऊया अनुसयाची गोष्ट
#Mystory: लग्नाआधीच त्याच्याबद्दल कळलं म्हणून बरं झालं
shutterstock
हुशार, मेहनती अशी अनुसयाची ओळख सगळीकडे असली तरी जाडी हे तिच्यासाठी ठरलेले विशेषण होतं. दिसायला सुंदर असली तरी तिच्या स्थुल शरीरावरुन तिला कायम बोलले जायचे. आधी आधी तिने या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. पण नंतर तिलाही उगाचच मनात मी जाडी असल्याची भावना निर्माण झाली. अनुसया इतर बारीक मुलींना पाहून दिवसेंदिवस खचू लागली. ऑफिसमध्ये फोटो काढताना मागे उभे राहणे… किंवा फोटोसाठी नाही म्हणत राहणे… तिच्यामधील न्यूनगंड दिवसेंदिवस वाढत होता. ती कोणासोबतही बाहेर जाणे ती टाळत होती. घरी लग्नाचा विषय काढल्यावर तिला तिच्या साईजप्रमाणेच स्थळ आणली जायची.
सगळ्यांचे टोमणे ऐकून जाड असण्याचे फायदे तोटे ऐकून अनुसयाने बारीक व्हायचं ठरवलं. तिने लागलीच जीम जॉईन केली. डाएटही सुरु केलं. डाएट अगदी नित्यनेमाने ती फॉलो करत होती. पण जीम आणि डाएट यांचा परिणाम तुमच्या शरीरावर अगदी हळूहळू होत असतो. पण अनुसयाला आता पटकन बारीक व्हायचे होते. त्यामुळे तिने अनेकांचे सल्ले घेऊन उपवास करुन डाएट करायला घेतले. एरव्ही छान हसत मजा मस्ती करणारी अनुसया आता अधिकच अलिप्त होऊ लागली. काहीच न खाता दिवसभर ऑफिसमध्ये बसणे. कोणी आपल्याकडे पाहून हसत असेल तरी त्याचा चुकीचा अर्थ काढणे असे तिच्याबाबतीत होऊ लागले होते. तिला आता सगळीकडे तिचे स्थुल शरीरच दिसत होते. तिचा आत्मविश्वास दिवसेंदिवस कमी होत चालला होता. कामात तिचे लक्ष लागत नव्हते. सततच्या डाएटमुळे ती कोमजलेली दिसू लागली होती.
जीम करुन भागत नाही म्हणून सकाळी उठून तिने धावायला सुरुवात केली. मेहनत सुरु केली.पण त्याचाही परिणाम तिच्यावर फारसा होत नव्हता. तिला आता जलदगतीने बारीक व्हायचे होते. त्यासाठी ती अगदी काहीही टोटके करायला तयार होती. अगदी हातगाडीवरील औषधांपासून ते बाबांपर्यंत…. ऑनलाईन डाएटपासून ते सर्जरी पर्यंत तिने सगळं काही ट्राय केलं.
#MyStory: अखेर मी त्याला होकार दिला
shutterstock
तिच्या आई वडिलांना तिच्या या गोष्टीचे फारच टेन्शन येऊ लागले होते. त्यांची मुलगी त्यांच्यापासून दूर होऊ लागली होती. तिला आता फक्त बारीक व्हायचे होते हे त्यांनाही लक्षात आले होते. घरी न जेवणं उरलेल्या वेळात केवळं व्यायाम करणे असे तिचे रुटीन ठरलेले होते.
ऑफिसमध्ये लोकांशी बोलणे ती टाळत होती. तिच्या आजूबाजूच्या लोकांनाही ही गोष्ट लक्षात आली होती. आता तिला मानसिक आधाराची गरज होती. डाएट करुन, जीम करुन, व्यायाम करुन तिने स्वत:ला मरणासन्न बारीक करुन घेतलं होतं खरं पण आता तिच्यात त्राण उरले नव्हते. एक दिवस असा आला की, तिची अवस्था अत्यंत बिकट झाली. ती
ऑफिसमध्येच चक्कर येऊन पडली. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तिच्या किडनीवर परिणाम झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.तिच्या आई-वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली केवळ एका फॅडपायी मुलीने आपले आयुष्य खराब करुन घेतले होते. ऐन तरुणपणात तिला आजारपण आले होते.
त्यामुळे तुमचे शरीर तुमचे आहे हे लक्षात ठेवा इतरांना दाखवण्यासाठी नको ते प्रयोग करु नका. स्वत:वर प्रेम करायला शिका. तुम्ही कायम सुंदरच दिसाल
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
Read More From Love
(70+ Best) Birthday Wishes For Girlfriend In Marathi | तुमच्या प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
Dipali Naphade
120+ Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
Trupti Paradkar