Dating

#MyStory: आणि आम्ही Lovers न राहता पुन्हा एकमेकांसाठी….

Aaditi Datar  |  Oct 20, 2019
#MyStory: आणि आम्ही Lovers न राहता पुन्हा एकमेकांसाठी….

ते सर्व माझ्यासोबत कॉलेजच्या पहिल्या दिवशी सुरू झालं. माझं कॉलेज मुंबईतील सर्वात जुन्या कॉलेजेसपैकी एक होतं आणि त्या कॉलेजचं सुंदर architecture जगभरात प्रसिद्ध होतं. कॉलेजच्या क्लासरूम्ससुद्धा मोठ्या होत्या आणि कॉरिडोर्ससुद्धा लांब आणि तुम्ही कन्फ्यूज व्हाल असे होते. मला तर इथे फिरताना असं वाटायचं की, मी हरवूनच जाईन. कॉलेजच्या पहिल्या दिवशी माझी क्लासरूम शोधायलाच मला जवळपास 45 मिनिटं लागली. क्लासरूमध्ये उशिराने पोचल्याने मला सगळीकडे नवे चेहरे दिसत होते. त्यामुळे मला खूपच विचित्र वाटत होतं. क्लासरूमच्या आत जाताच मला जी पहिली रिकामी सीट दिसली तिथे मी बसले. जसं लेक्चर संपलं तसं स्टुडंट्स एकमेंकाशी बोलू लागले. माझ्याजवळही काही जण आले आणि खूप लवकर आमच्यामध्ये चांगल्या गप्पा रंगल्या. आता मला एक ग्रुप मिळाला होता.

आमच्या ग्रुपसारखाच क्लासमध्ये अजून एक ग्रुप होता. पण त्याला जास्त लोक पसंत करत नसत. कारण ते दुसऱ्या स्टुडंट्सना bully करत असत. दुसऱ्यांवर कमेंट पास करणं, त्यांच्यावर फालतू जोक्स मारणं, त्यांचे pranks आणि याच सगळ्या गोष्टींमुळे क्लासमध्ये सगळे हैराण झाले होते. माझ्या ग्रुपला तर त्यांचा रागच येत असे. पण त्या ग्रुपमध्ये एक मुलगा होता जो नेहमी मला पाहात राहायचा आणि क्लासमध्ये आल्यावर पण त्याची नजर सतत माझ्यावर असायची. पहिल्या लेक्चरपासूनच हे सर्व मी नोटीस करत होते. त्याने कधी माझ्याशी बोलायचा प्रयत्न केला नाही. पण तो फक्त मला पाहात राहायचा आणि यामुळे मला uneasy वाटत होतं. 

मला त्याला जाऊन काहीही विचारायचं नव्हतं कारण मला उगाच कोणत्याही वादात पडायचं नव्हतं. जसं जसे दिवस जाऊ लागेल तसं तो माझ्याशी काही ना काही कारण काढून बोलायचा प्रयत्न करू लागला. पण मी त्याला काही यशस्वी होऊ दिलं नाही. मी सतत त्याला ignore करत होते. या गोष्टीमुळे तो इतका नाराज झाला की, एक दिवस त्याने विनाकारण माझ्या ग्रुपमधल्या मुलांशी भांडण केलं. अखेर माझे patience संपले. मी सरळ त्याच्याकडे गेले आणि त्याला विचारलं की, नक्की तुझा problem काय आहे? त्याने माझ्याशी थोडी वादावादी केली पण लगेच माफीही मागितली. तो मला म्हणाला की, त्याला फक्त माझ्याशी मैत्री करायची आहे. पण त्याची पद्धत मात्र चुकीची होती. मी त्याला म्हटलं की, मला त्याच्याशी मैत्री करायची नाही आणि जर त्याला माझा खरा मित्र बनायचं असेल तर त्याला नीट वागावं लागेल. त्याने माझं म्हणणं जास्तच मनावर घेतलं. त्या घटनेनंतर त्याच्यामध्ये खूपच बदल झालेला दिसून आला. त्याने क्लासमधील दुसऱ्या स्टूडंट्ससोबत बसायला सुरूवात केली. कॉलेजमधल्या एक्टीव्हिटीजमध्ये तो भाग घेऊ लागला. अभ्यास करू लागला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो सगळ्यांशी नीट वागू लागला. मला असं वाटू लागलं होतं की, तो पूर्णपणे बदलला आहे. त्यामुळे मी विचार केला की, त्याला एक संधी नक्कीच दिली पाहिजे. कदाचित मी विचार केला होता तेवढाही तो वाईट नाही.

प्रेमाची एबीसीडी…

आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये भेटत असू तेव्हा तासंतास बोलत बसायचो. कँटीनमध्ये तर आमचं टेबलही फिक्स झालं होतं. हळूहळू मी त्याच्याकडे ओढले जात होते आणि मला माहीत होतं की, त्यालाही माझ्याबद्दल फिलींग्ज्स आहेत. माझ्या आणि त्याच्या ग्रुपमधले मात्र आमच्या मैत्रीला समजून घेत नव्हते की, इतक्या कमी वेळात आमच्यामध्ये असं काय झालं. पण आम्हा दोघांनाच ते कळत होतं. अखेर आम्ही आमच्या नात्याला नाव दिलं. संपूर्ण कॉलेजला कळलं होतं की आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. अगदी आमच्या प्रोफेर्ससनाही कळलं होतं. सुरूवातीला आम्हाला हे सर्व थोडं विचित्र वाटत होतं पण नंतर आम्हालाही सवय झाली.

https://marathi.popxo.com/article/my-story-i-had-one-night-stand-and-it-was-like-in-marathi

दुराव्याच्या वाटेवर…

सर्व काही व्यवस्थित चालू होतं पण कॉलेजच्या फायनल ईयरमध्ये आल्यावर मात्र आमच्यात भांडण होऊ लागली. याचं कारण आमच्या स्टडीज नाहीतर आमच्या क्लासमध्ये आलेली एक नवीन मुलगी होती. जी आमच्यातील भांडणाचं कारण बनली होती. ती दिसायला सुंदर होती पण मला काही तिची intentions योग्य वाटत नव्हती. मी कधीही possessive नव्हेत पण मी स्वतः नोटीस केलं की, माझा बॉयफ्रेंड आणि ती मुलगी एकमेकांकडे जरा जास्त लक्ष देत आहेत. एक दिवस आमच्यामध्ये जबरदस्त भांडण झालं. असं वाटलं की, आमचं रिलेशनशिप संपलंच. आमच्या मित्रमैत्रिणींना आणि प्रोफरर्सनाही हे कळलं होतं की, काहीतरी गडबड सुरू आहे. पुढचे काही दिवस माझ्या boyfriend ने एकही लेक्चर अटेंड केलं नाही. यामुळे मी चितिंत झाले. मला काहीच माहीत नव्हतं की, तो कुठे आहे आणि काय करतोय. ती नवीन मुलगीही क्लासमध्ये येत नव्हती आणि यामुळे माझी बैचेनी जास्तच वाढली. तेव्हा माझ्या एका क्लासमेटने मला सांगितलं की, माझा बॉयफ्रेंड आणि ती नवीन मुलगी हिलस्टेशनला फिरायला गेले आहेत. मी पूर्णतः shocked झाले. मला काहीच कळत नव्हतं की काय होतंय. त्या दोघांनी बोलणं कधी सुरू केलं आणि हे सर्व काय होतं आहे. माझ्या डोक्यात अनेक प्रश्नांचं काहूर माजलं. दोन दिवसानंतर जेव्हा मी क्लासमध्ये उशिरा पोचले. तेव्हा मी नोटीस केलं की, सर्वजण माझ्याकडेच पाहत आहेत. मला विचित्र वाटलं. पण तेव्हाच माझी नजर माझ्या boyfriend आणि त्या नव्या मुलीकडे गेली. जे एकत्र बसले होते आणि show off करत होते की, ते नवीन  ‘couple’ आहेत. आता मला कळलं की, हे सर्व खूपच पुढे गेलं आहे आणि त्याला नवीन गर्लफ्रेंड मिळाली आहे. मला इतका राग आला की, मी सरळ त्याच्याकडे गेले आणि त्याला जाब विचारला की, तो माझ्यासोबत असं कसं करू शकतो. आम्ही इतकी वर्ष एकत्र होतो. पण त्याने एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. याउलट तो तडक क्लासमधून बाहेर निघून गेला. आमच्यातलं जे काही होतं ते सर्व संपलं होतं. मी तर ही अपेक्षाही केली नाही की, तो मला या सगळ्याचं कारण सांगेल. मी निर्णय घेतला की, मी माझ्या आयुष्याला योग्य वळणावर आणायचा प्रयत्न करेन. मला काहीच जाणवत नव्हतं. मी कॉलेजला जात होते, क्लास अटेंड करत होते आणि घर परत येत होते. मी माझ्या फ्रेंड्ससोबतही बाहेर जाणं सोडून दिलं होतं. मला असं वाटायचं की, प्रत्येकजण मला काहीतरी प्रश्न विचारेल की, असं का झालं. 

ज्या मुलावर मी इतकं प्रेम केलं होतं. त्या मुलाला रोज दुसऱ्या मुलीसोबत बघताना मला त्रास होत होता. हो…प्रत्येक दिवशी. पण मी पूर्ण प्रयत्न करत होते की, माझ्या चेहऱ्यावर हे दिसू नये. मला कळून चुकलं होतं की, या नात्याला मी जितका वेळ आणि जितकं प्रेम दिलं होतं. त्याचा काहीच उपयोग नव्हता. आम्ही दोघं आता कपलऐवजी पुन्हा एकमेकांसाठी अनोळखी झालो होतो. जसं आम्ही कॉलेजच्या पहिल्या दिवशी भेटलो होतो. जर मला माहीत असतं की, हे नातं अशा पद्धतीने संपणार आहे तर मी याची सुरूवातच होऊ दिली नसती. पण या संपूर्ण घटनेने मला शिकवलं की, मला त्या लोकांना कधीही विसरू नका ज्यांनी तुमची कठीण काळात साथ दिली. माझ्या मित्रांनी आणि माझ्या प्रोफरर्सनी या दरम्यान मला खूप साथ दिली आणि मला हा वाईट काळ विसरून पुढे जाण्याचा मार्ग दाखवला. ते सर्वजण आजही माझ्या क्लोज सर्कलमध्ये सामील आहेत आणि सदैव असतील.

https://marathi.popxo.com/article/mystory-my-real-life-love-at-first-sight-story-in-marathi

हेही वाचा –

#Mystory: त्यानंतर मला पुन्हा कधीही प्रेम झालं नाही

#MyStory : माझं पहिलं प्रेम जे कधीच….

#Mystory:मैत्री आणि प्रेम यापैकी एकाची निवड करायला त्याने मला भाग पाडलं

Read More From Dating