Diet

उन्हाळ्यात अंडे खाण्याबाबत असलेले समज – गैरसमज

Trupti Paradkar  |  Apr 23, 2019
उन्हाळ्यात अंडे खाण्याबाबत असलेले समज – गैरसमज

खाण्या-पिण्याबाबत अनेकांचे काही समज-गैरसमज असतात. काही लोकं तर त्यांच्या मूडनुसार काहिही खातात. एखाद्याने एखादी गोष्ट खावी सांगितली की खाण्यास सुरूवात करतात आणि नको सांगितली की खाणे बंद करून टाकतात. त्यामागची शास्त्रीय कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. ऋतूनुसार आहारात बदल केला जातो. त्यामुळे कधी कधी काही पदार्थ काही विशिष्ट ऋतूंमध्ये न खाण्याचा सल्ला दिला जातो.उन्हाळा सुरू झाला की उन्हाळ्यात देखील काही पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यापैकी  एक प्रमुख पदार्थ म्हणजे अंडे. उन्हाळ्यात अंडे खाण्याबाबत देखील अनेकांची विविध मते आहेत.मात्र मांसाहारी आणि शाकाहारी अशा दोन्ही प्रकारच्या लोकांना डॉक्टर चांगल्या शरीरप्रकृतीसाठी अंडं खाण्याचा सल्ला देतात. शिवाय सकाळी नाश्ता करताना उकडेलं अंडे अथवा ब्रेड ऑम्लेट हे झटपट होणारे पदार्थ असतात. त्यामुळे सहाजिकच उन्हाळ्यात अंडं खाणं आरोग्यासाठी हितकारक नसेल तर उन्हाळयात काही दिवस अंडं खाणं बंद करावं का असा प्रश्न मनात निर्माण होतो. यासाठीच उन्हाळ्यात अंडं खाण्याबाबत नेमके काय समज आणि गैरसमज आहेत हे जाणून घेऊयात.


उन्हाळ्यात अंडं खावे की खाऊ नये-

मुळातच अंडे खाण्याबाबत अनेकांची विविध मते आहे. गावठी अंडे खावे की ब्रायलर अंडे खावे? अंडं रात्री खावं की सकाळी  खावं? अंडं कच्चे खावं की उकडून अथवा फ्राय करून खावं? अंडं उन्हाळ्यात खावं की खाऊ नये? काही जणांच्या मते अंडे उष्ण असल्यामुळे ते उन्हाळ्यात खाऊ नये. मात्र आतापर्यंत उन्हाळ्यात अंडे खावं की खाऊ नये याबाबत कोणतेही संशोधन समोर आलेले नाही. काहींच्या मते उन्हाळ्यात अंडे खाऊ नये हा एक गैरसमज आहे. कारण अंडे उष्ण गुणधर्माचे असले तरी त्यात भरपूर पोषकमुल्ये असतात. अंड्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस  असे शरीराला आवश्यक घटक असतात. त्यामुळे उन्हाळ्यात अंडं खाण्याने उष्णता वाढते अथवा अपचन होतं हा एक गैसमज आहे. उलट उन्हाळ्यात गर्मीमुळे थकवा अथवा अशक्तपणा जाणवत असेल तर आवर्जून दररोज एक अंडे अवश्य खा. कारण त्यामुळे तुमच्या शरीराला पोषकमुल्ये आणि उर्जा मिळेल. मात्र अंडे शरीराला कितीही पोषक असले तरी दिवसभरात एक ते दोन अंड्यापेक्षा अधिक अंडी मुळीच खाऊ नका. वर्क आऊट करणाऱ्या लोकांना तर दिवसभरात चार ते पाच अंडी दररोज खाण्याची गरज असते. मात्र सर्वांनीच जास्त प्रमाणात अंडी खाऊ नयेत. कारण त्यामुळे शरीरातील उष्णता नक्कीच वाढू शकते. शिवाय कोणताही पदार्थ अतीप्रमाणात खाणं शरीरासाठी हितकारक असू शकत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात कोणताच आहार अती प्रमाणात खाऊ नका.

दररोज एक उकडलेले अंडे खा-

अंडी कच्ची खावी की उकडून, फ्राय करून खावी याबाबतदेखील अनेक समज-गैरसमज आहेत. मात्र अंडं नेहमी उकडून खावी. कारण कच्चे अंड खाणं तुमच्या शरीराला मानवेलच असे नाही. शिवाय अंड्याची भाजी, ऑम्लेट  अथवा फ्राय करून खाण्याने अंड्यामधील पोषकमुल्ये शरीराला मिळत नाहीत. यासाठी नेहमी अंडं उकडूनच खावे.

पदार्थांचे असे ‘कॉम्बिनेशन’ आरोग्यासाठी ठरु शकते घातक

केस आणि त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी ‘अंडे का फंडा’

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

 

Read More From Diet