श्रावणातील पंचमीला नागपंचमी माहिती आहे. या दिवशी नागाची पूजा करून त्याची कृतज्ञता व्यक्त केली जाते. भारतीय सणसमारंभ हे निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश देत असतात. असं म्हणतात नागपंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्याय पात्रातून सुखरूप आले होते. त्या दिवसापासून श्रावण शुद्ध पंचमीला नागपूजा केली जाते. या दिवशी भारतात नाग अथवा सापाला दूध, फळं, गोडाचे पदार्थ, फुले अर्पण केली जातात. नागपूजा करण्यासाठी नाागाची मातीची प्रतिमा घरात स्थापन केली जाते. सुवासिनी या दिवशी नागाला भावाप्रमाणे मानून त्या दिवशी त्याच्यासाठी उपवास करतात. भगवान शंकराच्या गळात नागाला स्थान असल्यामुळे शंकराच्या मंदिराबाहेर नागपंचमीसाठी भाविक गर्दी करतात. नागपंचमीच्या दिवशी नातेवाईक आणि मित्रमंडळींना पाठवा नागपंचमी शुभेच्छा (Nag Panchami Wishes In Marathi), नागपंचमी कोट्स (Nag Panchami Quotes In Marathi), नागपंचमी एसएमएस (Nag Panchami Marathi SMS), नागपंचमी स्टेटस (Nag Panchami Status In Marathi) आणि नागपंचमी मेसेजेस (Nag Panchami Messages In Marathi).
Table of Contents
- Nag Panchami Wishes In Marathi | नागपंचमी शुभेच्छा
- Nag Panchami Quotes In Marathi | नागपंचमी कोट्स
- Nag Panchami Messages In Marathi | नागपंचमी शुभेच्छा संदेश
- Nag Panchami Message In Marathi | नागपंचमी शुभेच्छा मेसेज
- Nag Panchami Shubhechha In Marathi | नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा
- Nag Panchami Funny Quotes In Marathi | नाग पंचमी मजेदार कोट्स
Nag Panchami Wishes In Marathi | नागपंचमी शुभेच्छा
श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी… या सणाला सर्व जवळच्या लोकांना पाठवा नागपंचमीच्या शुभेच्छा (Nag Panchami Wishes In Marathi).
1. मान ठेवूया नाग राजाचा, पूजा करून शिवशंकर भोले नाथाचा… नागपंचमीच्या शुभेच्छा
2. रक्षण करूया नागराजाचे, जतन करूया निसर्गदेवतेचे नागपंचमीच्या शुभेच्छा
3. वारूळाला जाऊया, नागोबाला पुजूया… नागपंचमीच्या शुभेच्छा
4. हे नाग देवता, सप्र देवता सर्वांनां सुख, समृद्धी आणि आरोग्य दे… नागपंचमीच्या शुभेच्छा
5. वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळ गाई गोड गाणी
नागपंचमीच्या शुभदिनी, सुख-समृद्धी मिळो सर्वांना जीवनी
6. श्रावण महिन्याचा पहिला सण म्हणजे नागपंचमी, कालिया नागाचा पराभव करून, यमुना नदीच्या पात्रातून, भगवान श्रीकृष्ण सुखरूप परत आले तो दिवस म्हणजे नागपंचमी…. नागपंचमीच्या शुभेच्छा
7. नागपंचमी निमित्त आपणास व आपल्या परिवारास मनपूर्वक शुभेच्छा
8. बळीराजाचा हा कैवारी, नागराजाची मुर्ती पुजूया घरोघरी… नागपंचमीच्या शुभेच्छा
9. नागपंचमीच्या दिवशी तुमच्यावर ईश्वराची सदा कृपा असावी आणि तुमचे आयुष्य मंगलदायी असावे… नागपंचमीच्या शुभेच्छा
10. हर हर महादेव… नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
11. नागपंचमीच्या सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा…
जाणून घ्या निसर्गावर कविता आणि सुविचार
Nag Panchami Quotes In Marathi | नागपंचमी कोट्स
श्रावण महिना म्हणजे सणांचा राजा… या महिन्यात नागपंचमीपासून सणांना सुरूवात होते. शेतकऱ्याचा मित्र नागाची पूजा करत त्याची कृतज्ञता व्यक्त केली जाते. यासाठी खास हॅपी नागपंचमी कोट्स आणि शुभेच्छा (Nag Panchami Quotes In Marathi).
1. सण नागपंचमी सया निघाल्या वारूळाला पूजाया नागोबाला मनोभावे… नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
2. रुसला पर्जन्यराजा, मदत ना मिळे कोणाची,
परी तूच खरा मित्र, पाठ राखीतो बळीराजाची… हॅपी नागपंचमी
3. देवांचा देव महादेवाला जो प्रिय, भगवान विष्णूचे जो आहे सिंहासन, ज्याने पृथ्वीला उंच केले अशा नागदेवाला
माझा त्रिवार नमस्कार… नागपंचमीच्या शुभेच्छा
4. महादेवाला नाग आहे प्रिय, मनोभावे पूजा केल्यास सर्व समस्या होतील दूर… नागपंचमीच्या शुभेच्छा
5. नागदेवताची मनोभावे पूजा करा तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि आरोग्याची बरसात होईल…. नागपंचमीच्या शुभेच्छा
6. भगवान शंकराच्या गळ्यात सापाचा हार आहे… नागपंचमी शिवभक्तांसाठी खास उत्सव आहे. नागपंचमीच्या शुभेच्छा
7. मुखाने ओम नम: शिवाय म्हणा आणि नागदेवताची पूजा करा… हॅपी नागपंचमी
8. नागदेवतेच्या शुभार्शिवादाने तुमच्या घरात सुख, समृद्धीची बरसात कायम होत राहो… नागपंचमीच्या शुभेच्छा
9. नागपंममीचा सण आला, पर्जन्यराजाला आनंद झाला
न्हाहून निघाली वसुधंरा, घेतला हाती हिरवा शेला… नागपंचमीच्या शुभेच्छा
10. भगवान शंकराची कृपा झाली, सखेसवे मी नागपूजनाला निघाली… नागपंचमीच्या शुभेच्छा
जगाचा पोशिंदा बळीराजासाठी खास शेतकरी स्टेटस मराठीतून
Nag Panchami Messages In Marathi | नागपंचमी शुभेच्छा संदेश
नागपंचमी म्हणजे एक अस्सल ग्रामीण आणि मराठमोळा सण. लहान गावामध्ये या सणाचा उत्साह खूपच मोठा असतो. यासाठी हा सण साजरा करण्यासाठी सर्वांना द्या या नागपंचमीच्या शुभेच्छा (Nag Panchami Best Messages In Marathi).
1. भगवान शिव शंकर सर्वांना शक्ती आणि सामर्थ्य देवो…आपणांस आणि आपल्या परिवारास नागपंचमीच्या शुभेच्छा
2. नागपंचमीच्या शुभदिनी नागोबाची मनोभावे पूजा केल्यास तुम्हाला सर्व शक्तिमान शिवाचा आर्शिवाद आणि संरक्षण प्राप्त होईल… नागपंचमीच्या शुभेच्छा
3. नागपंचमीचा दिवस तुमच्या आयुष्यात यश आणि आरोग्य प्राप्त करो… आजचा दिवस शिवाला अर्पण करा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील… नागपंचमीच्या शुभेच्छा
4. शेतकऱ्याचा मित्र नागदेवताची पूजा करण्याचा आज दिवस… नागपंचमीच्या सर्वांना मनोभावे शुभेच्छा
5. पवित्र महिन्यातील पहिला सण नागपंचमी… नागदेवतेची कृपा तुमच्यावर सदैव राहो… नागपंचमीच्या शुभेच्छा
6. भगवान बुद्धाचा पवित्र संदेश ज्या नागलोकांनी संपूर्ण भारतभर पसरवला त्या सर्व नागलोकांचा आज सण! नाग लोक हे भगवान बुद्धाचे उपासक होते… आजच्या पवित्र दिवशी सर्वांना नागपंचमीच्या शुभेच्छा…
7. दूध लाह्या वाहू नागोबाला, चल गं सखे जाऊ वारूळाला… नागपंचमीच्या भक्तिमय शुभेच्छा
8. नागोबाचे रक्षण करू. हीच खरी नागपंचमी… श्रावणातील या पहिल्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा
9. उत्सवांची झुंबड, घेऊन आला श्रावण
10. श्रावणातील पहिला सण नागपंचमी करू आनंदात करू साजरी करू आपण… नागपंचमीच्या शुभेच्छा
11. सण आला नागपंचमीचा, मनापासून शुभेच्छा तुम्हाला
सदैव सुखी, आनंदी राहा, हिच आमची सदिच्छा
वाचा – हरतालिकेच्या शुभेच्छा
Nag Panchami Message In Marathi | नागपंचमी शुभेच्छा मेसेज
नागपंचमीवर आधारित अनेक गाणी आणि कविता आहेत. नागपंचमीला माहेरवासिणीला घरी बोलावण्याची पद्धत आहे. यातून अनेक जुन्या चालीरिती आणि पद्धत उलगडत जातात. यासाठीच माहेरवाशिणीला पाठवा पंचमीचे हे खास संदेश (Nag Panchami Marathi SMS).
1. मान ठेवू नागराजाचा, पूजा करू शिवशंकराची… नागपंचमीच्या शुभेच्छा
2. नागदेवता आपल्या घराचे, घरातील सर्व सदस्यांचे रक्षण करो… नागपंचमीच्या शुभेच्छा
पावसाच्या लपंडाव खेळण्याऱ्या सरी,
सोन पिवळ्या उन्हाच्या मधूनच लकाकणाऱ्या लडी आणि हिरवे गालिचे लपेटलेली धरती,
अशा वातावरणाची परसात घेऊन
आला आला श्रावण महिना
या महिन्याच्या पहिल्याच पंचमीला पूजू या नागदेवतेला
नागपंचमीच्या शुभेच्छा…
3. चल गं सखे वारूळाला, वारूळाला, वारूळाला, नागोबा पूजायाला, पूजायाला, पूजायाला… नागपंचमीच्या शुभेच्छा
4. कधी भेटशील तेव्हा, व्हतील तरे भेटी गाठी,
येत्या नागपंचमीला आणीन तुला दुधाची वाटी… नागपंचमीच्या शुभेच्छा
5. फाद्यांवरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे,
पंचमीचा सण आला माहेरच्या आठवणीने डोळे झाले ओले
6. पंचमीचा सण आला पंचमीचा सण आला
प्रिय भाऊ राया मला माहेरी न्यायला आहे आला
7. शिवशंभूचा हार गळ्यातील तू भूमीचा स्वामी,
आज तुझा सण आला आहे नागपंचमी
8. सर श्रावणाची सांगे, गोज गुपित कानात
झुला फांदीवरचा गं, श्रावणाचे गातो गीत
9. निसर्गाच्या बांधीलकीतून नागपंचमीचा सण निर्माण झाला,
शेतकऱ्याचा मित्र तो सच्चा, शिवाच्या गळ्यातील हार झाला
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
10. जपायला हवं नागाच्या अस्तित्वाला
नको केवळ आंधळी पूजा
नाग दूध पित नाही कधीच
देऊ नका त्याला नाहक सजा
नागपंचमीच्या मनापासून शुभेच्छा
वाचा – जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
Nag Panchami Shubhechha In Marathi | नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा
आजकाल सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्याची पद्धत आहे. त्यामुळे नागपंचमीच्या सणानिमित्त व्हॉटसअप, फेसबूकवर स्टेटस (Nag Panchami Status In Marathi) ठेवण्यासाठी हे शुभेच्छा संदेश तुम्ही नक्कीच वापरू शकता.
1. मातीच्या नागाची पूजा करा
जिवंत नागाचा नको अट्टाहास
तुमच्या अंधश्रद्धेमुळे होतो
नागाचा अन्नवयीत छळ आणि र्हास
नागपंचमीच्या शुभेच्छा
2. नागपंचमीचा दिवस तुमच्यासाठी मंगलमय असावा हिच परमेश्वरचरणी प्रार्थना… या नागपंचमी साजरी करू या ईश्वररूपी नागाचे रक्षण आणि निसर्गाचे जतन करूया… नागपंचमीच्या शुभेच्छा
3. निसर्गाच्या बांधीलकीतून निर्माण झाला नागपंचमीचा सण,
शेतकरी आपल्या मित्राचे उतरवतो त्या निमित्ताने ऋण… नागपंचमीच्या शुभेच्छा
4. दुसऱ्याच्या आयुष्यात उत्तमपणे विष प्रयोग करून स्वतः सुरक्षित जागी जाऊन बसणाऱ्या विषारी लोकांना पण नागपंचमीच्या शुभेच्छा
5. समुद्र मंथनाने कळली जगास ज्यांची महती
अशा नागदेवांना सारे जग वंदती…नागपंचमीच्या शुभेच्छा
6. नागपंचमीच्या अमृततुल्य शुभेच्छा
पुंगीने नागाची आज मुलाखत घ्यावी,
जनतेच्या वाट्याची खावी दूध मलाई,
फणा अंहकाराचा डसता बाधा होई,
पुंगीच्या अंगागाची होई लाही लाही
नागपंमीच्या शुभेच्छा
7. डूख धरून बसणाऱ्या सर्व मानवरूपी नागांना नागपंचमीच्या शुभेच्छा
8. आपल्या मध्येच राहीन आपल्याला फणा दाखवून फुस करणाऱ्या नागांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
9. नाग दूध पिता यापेक्षा मोठी गजाल कधी होऊची नाय… नागपंचमीच्या शुभेच्छा
10. लग्नामध्ये रस्त्यावर लोळ, रस्त्याची साफसफाई करत नागीण जान्स करणाऱ्या सर्व विषारी, बिनविषारी मित्रांना नागपंचमीच्या शुभेच्छा
आम्ही तुमच्यासोबत नागपंचमीच्या काही खास शुभेच्छा शेअर केल्या आहेत. या शुभेच्छा तुम्ही तुमचे प्रियजन नातेवाईकांसोबत नक्कीच करू शेअर करू शकता आणि नागपंचमीच्या सणाचा खऱ्या अर्थाने आनंद घेऊ शकता.
पावसात चिंब करतील हे मस्त पावसाळी कोट्स
Nag Panchami Funny Quotes In Marathi | नाग पंचमी मजेदार कोट्स
नागपंचमीसाठी मजेदार कोट्स – Nag Panchami Funny Quotes In Marathi पाठवा तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांना….
- त्या सर्व नागिणींना, नागपंचमीच्या शुभेच्छा ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांच्या आयुष्यात विष कालवलं आहे.
- मनुष्यप्राणी इतका मुर्ख नागपंचमीला खोट्या नागाला पूजतो, पण घरातील त्या नागिणीची पूजा करत नाही जी त्याच्यावर दररोज फणा काढते.
- प्रत्येक गोष्टीत विष पेरणाऱ्या माणूसरूपी नागांनापण नागपंचमीच्या शुभेच्छा!
- फ्रेंडशिप दिनाच्या शुभेच्छा देऊन झाल्या असतील तर नागनागिणीसारख्या मित्रमैत्रिणींना नागपंचमीच्या शुभेच्छा देऊ या!!!
- आज नागपंचमी आहे घरातील सर्व विवाहित पुरूषांनी पत्नीला दूध आणि जिलेभीचा नैवेद्य द्यावा.
- बायकोच्या नुसत्या डोळ्यांच्या इशाऱ्यावर डुलणाऱ्या सर्व नागोबांना नागपंचमीच्या शुभेच्छा
- माझ्यावर डूख धरून बसलेल्या सर्व मानवरूपी नागांना नागपंचमीच्या शुभेच्छा!!!
- प्रत्येकाच्या आयुष्यात एक नागिणरूपी बहीण असते, जी घरी आल्यावर आईवडिलांसमोर तुमच्याबद्दल विष ओकते.
- दुसऱ्यांच्या आयुष्यात विषप्रयोग करून स्वतः सुरक्षित जागी जाऊन बसलेल्या माणूसरूपी नागांना नागपंचमीच्या शुभेच्छा…
- सकाळपासून फक्त दूधच पित बसणार की आज ऑफिसचं काम पण करणार… नागपंचमीच्या शुभेच्छा!!!
You Might Like These:
कोजागिरी पौर्णिमा कोट्स (Kojagiri Purnima Quotes In Marathi)
कोजागिरी पौर्णिमा माहिती मराठी (Importance Of Kojagiri Purnima In Marathi)
Read More From भविष्य
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje