Mythology

या दिवशी नखं कापल्याने होईल भरभराट

Leenal Gawade  |  May 30, 2021
या दिवशी नखं कापल्याने होईल भरभराट

नखं कापणे हे प्रत्येकाचे आठवड्यातून एकदा तरी काम असते. नखांची स्वच्छता ही आरोग्यासाठी फारच गरजेची असते. शाळेत असताना नखं कापणं हा किती महत्वाचा विषय होता हे आपण सगळेच जाणतो. पण नखं कापण्यासाठी ठराविक वार फार शुभ मानले जातात. सगळ्यांना शक्यतो रविवारी नखं कापण्यास वेळ मिळत असल्यामुळे नखांचा वार रविवार असे होते. शनिवारी किंवा तिन्ही सांजेला नखं कापली जात नाही. पण असेही काही दिवस आहेत ज्या दिवशी नखं कापली की, भरभराट होते असे मानतात. तुम्हालाही भरभराट करुन घ्यायची असेल तर तुम्ही नेमकी कोणत्या वारी नखं कापायला हवी ते जाणून घेऊया.

या राशींच्या लोकांनी कधीही घालू नये कासवाची अंगठी

सोमवार 

आरोग्य उत्तम राहावे हे प्रत्येकालाच वाटते. ‘आरोग्य धन संपदा’ असे म्हणत ज्यांना उत्तम आरोग्यासाठी तुम्ही सोमवारी नखं कापायला हवीत. सोमवारी नखं कापण्याचा विचार करत असाल तर उत्तम आरोग्यासाठी कापा. 

मंगळवार 

मंगळवार हा देखील नखं कापण्यासाठी शुभ मानला जातो. जर या दिवशी जर तुम्ही नखं कापलीत तर तुमच्या डोक्यावर कोणतेही कर्ज राहात नाही. या दिवशी नखं कापल्यामुळे पैसा टिकून राहतो. पैशांच्या कोणत्याही समस्या, चणचण तुम्हाला या दिवशी मुळीच जाणवत नाही. त्यामुळे आर्थिक लाभासाठी तुम्ही नखं कापायला हवीत.

बुधवार  

बुध हा वैश्य वर्णाचा बौद्धिक ग्रह आहे. या दिवशी नखं कापल्यामुळे बौद्धिक प्रगती होण्यास मदत मिळते.  या शिवाय सन्मार्गाने धनप्राप्ती होण्यासाठीही हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. जर तुम्हाला ज्ञानात भर घालायची असेल तर तुम्ही बुधवारी नखं कापायला हवी.

कडक मंगळ आणि सौम्य मंगळ, फायदे आणि तोटे

Instagram

गुरुवार
घरात होणाऱ्या अशुभ गोष्टींवर आळा घालायचा असेल तर गुरुवारी नखं कापणे नक्कीच चांगले. नखं कापून तुम्ही ती अशुभ गोष्ट दूर करता.  शिवाय गुरु हा अध्यात्मक ग्रह असून या दिवशी तुम्ही नखं कापली तर तुमच्यातील सत्वगुण वाढण्यास मदत मिळते. 

शु्क्रवार
शुक्रवार अथवा शुक्र हा ग्रह कलेचा कारक मानला जातो. जर तुम्ही या दिवशी नखं कापली तर तुमच्या आवडीच्या व्यक्तीची भेट होण्यास मदत मिळते. त्यामुळे जर तुम्हाला तुम्हाला कोणाच्या भेटीची ओढ असेल तर शुक्रवारी नखे कापावीत.

शनिवार
शनिवार हा दिवस नखं कापण्यासाठी अजिबात चांगला नाही. कारण  शनिवारी नखं कापल्यामुळे आसशक्ती वाढते. वाईट गोष्टींमध्ये मन अधिक गुंतते. त्यामुळे तुम्ही शनिवारी नखं मुळीच कापू नका. 

रविवार
रविवारी खूप जण नखं कापतात. कारण हा एकच दिवस सगळ्यांना सुट्टीचा असतो. त्यामुळे ही काम सुट्टीच्या दिवशी केली जातात. पण या दिवशी तुम्ही नखं कापू नका कारण या दिवशी नखं कापल्यामुळे कामात अडथळे निर्माण होतात. 


आता प्रत्येक दिवसाचे महत्व जाणून कोणत्या दिवशी नखं कापायची ते ठरवा. 

कशा असतात धनू राशीच्या व्यक्ती, जाणून घ्या

 

Read More From Mythology