मनोरंजन

National Farmers Day: प्रिटी झिंटाची शेती

Dipali Naphade  |  Dec 23, 2021
national-farmers-day

आपला शेतकरी हा आपल्यासाठी सर्व काही आहे. आज राष्ट्रीय शेतकरी दिवस (National Farmer’s Day) आहे. आपला बळीराजा आपल्यासाठी खास आहे. शेतकरी स्टेटस अथवा शेतकरी शुभेच्छा आपण द्यायलाच हव्यात. पण आपल्याकडे अशा अनेक अभिनेत्रीही आहेत ज्यांना शेतीमध्ये अधिक स्वारस्य आहे आणि त्यांनी आपल्या घराच्या अंगणात असो अथवा फार्म हाऊस असो बागेमध्ये स्वतः काम करत त्यामध्ये अनेक फळं आणि फुलं उगवली आहेत. शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty), जुही चावला (Juhi Chawala), अश्विनी भावे (Ashwini Bhave), माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि प्रिंटी झिंटा अशी अनेक नावं घेता येतील. यापैकी प्रिटी झिंटा (Preity Zinta) नेहमीच आपल्या बागेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतीच प्रिटी जुळ्या मुलांची आईदेखील झाली आहे. 

प्रिटी झिंटाने फुलवली केळ्यांची बाग 

प्रिटी झिंटा गेल्या काही वर्षांपासून भारताबाहेर आपल्या नवऱ्याबरोबर राहात आहे. बॉलीवूड एके काळी गाजवणारी अशी ही अभिनेत्री सोशल मीडियावर मात्र सक्रिय असते. सध्या प्रिटी कोणत्याही चित्रपटातून दिसून येत नसली तरीही आपल्या चाहत्यांसाठी मात्र ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. मूळची हिमाचलमधील असणारी प्रिटी ही 2019 पासून आपल्या घरीच शेती करत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी तिने घरातील भोपळी मिरची असो अथवा काही फुलं असोत अनेक व्हिडिओदेखील शेअर केले होते. आता तर चक्क ‘घर की खेती’ असे कॅप्शन पोस्ट करत तिने केळ्यांचा घड दाखवत एक व्हिडिओ शेअर केला आहे. तीन वर्षांपूर्वी तिने केलेली लागवड आणि आता तिला मिळालेल्या या फळाबाबत ती खूपच आनंदी आहे. तिच्या या व्हिडिओवरून तिचा आनंददेखील स्पष्ट दिसून येत आहे.  प्रिटीने अगदी भरभरून आणि मनापासून आपल्या या शेतीबाबतचा आनंद व्यक्त केला आहे. शेतीतील ऑर्गनिक केळी पाहून प्रिटीला खूपच आनंद झाला आहे. यावर हृतिक रोशननेदेखील तिच्या शेतीतील केळी आपल्याला हवी आहेत अशी कमेंट केली आहे. 

अधिक वाचा – रणवीर-शाहिदनंतर आता कार्तिक झाला क्रिकेटर

प्रिटीसाठी झाडं ही आपल्या मुलांसारखी 

प्रिटीने हा व्हिडिओ शेअर करताना शेती आणि झाडांविषयी आत्मीयता व्यक्त केली आहे. ‘घरची शेती. गेल्या काही महिन्यांपासून आम्ही आमच्या मुलांसोबत घरीच आहोत. आमचे सर्व प्लॅन्स, प्रवास आणि कार्यक्रम आम्ही पुढे ढकलले. या वर्षामध्ये (IPL बायो बबल प्रवास, क्वारंटाईन राहणे इत्यादी) जगणे खरं तर कठीणच होते. पण आम्ही 2019 मध्ये घरच्या अंगणात फळझाडांची लागवड करायला सुरूवात केली. तेव्हापासूनच झाडांना वाढताना पाहणं, त्यांनी वाढ होताना पाहणं यासारखा दुसरा आनंद मिळत नाहीये. मी खूपच आनंदी आहे आणि मला हे तुमच्या सर्वांसोबत वाटून घेता आलं यातच आनंद आहे. संयमाचे फळ हे खरंच खूप गोड असते, तुम्हालाही हे दिसेल. तुम्ही कोणतेही रोप लावले आणि प्रेमाने त्याची काळजी घेतली तर ते तुम्हाला नक्कीच फळ देतं’ असे म्हणत तिने आपला आनंद व्यक्त केला. प्रिटी सध्या चित्रपटात दिसत नसली तरीही ती एक उत्तम व्यावसायिक म्हणून आयपीएलमध्ये व्यस्त आहे. त्याशिवाय घर, संसार आणि मुले यामध्येही ती सध्या व्यग्र असल्याचे दिसून येत आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन