प्रसिद्ध गायिका नेहा कक्कड आणि रोहनप्रीत सिंह यांचा विवाहसोहळा दिल्लीत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत, शाही थाटमाटात पार पडला. लग्नानंतर नेहा तिचा पती रोहनप्रीतसोबत सासरी पंजाबमध्ये गेली. सासरीदेखील नेहाचे अगदी धूमधडाक्यात स्वागत करण्यात आलं. सासरी पारंपरिक पंजाबी पद्धतीने म्हणजेच ढोल- ताशामध्ये अगदी वाजत गाजत नेहाचा गृहप्रवेश करण्यात आला. यावेळी नेहाने गुलाबी रंगाचा सूट तर रोहनप्रीतने काळ्या रंगाचे जॅकेट घातले होते. सासरच्या घरी करण्यात आलेल्या या प्रेमळ स्वागतामुळे नेहा पुरती भारावून गेली होती. ज्यामुळे तिचा नववधूचा लुकन नक्कीच खुलून आला होता.
असा रंगला रिसेप्शन सोहळा –
सोमवारी नेहा आणि रोहनप्रीतचा रिसेप्शनसोहळा पंजाबमध्ये पार पडला. ज्या कार्यक्रमात पंजाबमधील जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि खास पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. कोरोनामुळे रिसेप्शनसाठीदेखील अगदी मोजक्या लोकांनाच आमंत्रित करण्यात आलं होतं. नेहाने रिसेप्शनसाठी पांढऱ्या रंगाचा लेंगा परिधान केला होता तर रोहनप्रीतने निळ्या रंगाचा सूट घातला होता. नेहा आणि रोहनप्रीतचे लग्न अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत मात्र शाही पार पडले.
22 ऑक्टोबरला दोघांनी एकमेकांना आयु्ष्यभर एकत्र राहण्याच्या पवित्र बंधनात बांधून घेतलं. लग्नातील लाल पेहरावात नेहा फारच सुंदर दिसत होती. नेहाचा हा वेडिंग लुक फारच आकर्षक दिसत आहे. पाहा नेहाच्या विवाह सोहळ्यातील काही क्षण
लग्न सोहळ्या दरम्यान मेंदी, हळद आणि साखरपुडा असे अनेक विधी पारंपरिक पद्धतीने पार पडले. या सर्व विधींसाठी नेहा आणि रोहनप्रीतने खास लुक केला होता. लग्नानंतरही नेहाचे काही खास लुक व्हायरल झाले. ज्यामध्ये ती ग्रीन रंगाच्या लेंगा, काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसली होती. या लुक्समध्ये नेहाचे सौंदर्य अधिकच खुलून आलं आहे.
लग्नासाठी हे सेलिब्रेटी होते उपस्थित
कोरोना काळात अनेक लोक लग्न करत आहेत. कारण कोरोनाचा काळ नेमका कधी संपेल हे कुणीच सांगू शकत नाही. शिवाय या काळात अनेक ठरलेले विवाह रखडलेले होते. नेहा आणि रोहनप्रीतनेदेखील कोरोनाच्या काळात लग्न केल्यामुळे लग्नासाठी पाहुण्यांची उपस्थिती नक्कीच कमी होती. लग्नाआधी कोरोना काळातील लग्न या विषयावर नेहाची अनेक गाणीदेखील प्रसिद्ध झाली होती. मात्र हा तिचा प्रसिद्धी स्टंट आहे असं लोकांना वाटत होतं. कारण यापूर्वी नेहाने असे अनेक प्रसिद्धी स्टंट केले होते. मात्र तिचे हा अल्बम म्हणजे तिच्या या खऱ्याखुऱ्या लग्नाची हिंट आहे हे सर्वांना फार उशीरा लक्षात आलं. कोरोनामुळे सर्व मित्र मंडळी आणि सेलिब्रेटीजनां लग्नासाठी आमंत्रित करणं नक्कीच शक्य नव्हतं. त्यामुळे अगदी जवळच्या सेलिब्रेटी फ्रेंड्सनी नेहाच्या लग्नात उपस्थिती दाखवली. ज्यामध्ये मनीश पॉल, उर्वशी रौतेला, उर्वशी ढोलकिया, अवनीत कौर, जस्सी लोखा, अखिल आणि बानी सांधू नेहा हे मित्रमंडळी होते. जर हे लग्न कोरोना काळात झालं नसतं तर हा लग्नसोहळा बॉलीवूडमधला एक जंगी लग्नसोहळा ठरला असता. ज्यामध्ये मोठमोठे सेलिब्रेटी सहभागी झाले असते.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
अभिनेत्री मंदिरा बेदी पुन्हा बनली आई, फोटो व्हायरल
मराठी चित्रपटसृष्टीतल्या ‘10’ हॉट (Hot) आणि बोल्ड अभिनेत्री
अक्षय कुमारने ‘या’ चित्रपटांमध्ये साकारला आहे अफलातून खलनायक