पालकत्व

लहान मुलांना अजिबात शिकवू नका असे चुकीचे शब्द

Leenal Gawade  |  Dec 8, 2021
लहान मुलांना अजिबात शिकवू नका हे शब्द

 लहान मुलं एखादा शब्द किंवा वाक्य पटकन उचलतात. कोणत्याही शब्दाचा अर्थ जाणून घेत त्यांना बोलण्याची अनाहूतणे सवय लागते. पण मोठ्यांनी शिकवलेले चांगले शब्द त्यांना पटकन लक्षात राहात नाहीत. पण वाईट शब्द मात्र ते पटकन उचलतात. घरात लहान मुलं असणे जितके आनंदाचे असते तितकेच ते जबाबदारीचे असते. कारण मुलांवर संस्कार होताना ते नेमकं काय शिकत आहेत याकडे लक्ष देणे पालकांनी जबाबदारी आहे. हल्ली पालक किंवा घरातील मोठी मंडळीच नुकत्याच बोलू लागलेल्या लहान मुलांना नको ते शब्द शिकवतात. परिणामी ते शब्द त्यांच्यावरच कधी उलटतात ते त्यांना देखील कळत नाही. अशावेळी तुम्ही नेमकी काय काळजी घ्यायला हवी ते आज आपण जाणून घेऊया.

अप, चूप, शटअप

खूप जणांना लहान मुलांना दुसऱ्यांना गप्प बसण्याचा शब्द शिकवण्याची सवय असते. मुलांना ते इप, चूप,शट अप असे खूप जण आपल्या मुलांना शिकवतात. पण मुलं जेव्हा बोलायला शिकवताना असे चुकीचे शब्द शिकवल्यामुळे ते कधी उद्धट होतात हे कळत नाही.  लहान असल्यामुळे त्यांना कोणाला हे कधी बोलावे हे कळण्याइतके त्यांचे वय नसते. खूप जणांना लहान मुलांनी असे म्हटले की, काही काळासाठी मजा वाटते. पण ही मजा मोठी झाल्यानंतर अजिबात येत नाही. कारण ते शब्द ही मुलं कुठेही वापरतात. आपल्याच लोकांसमोर ते असा शब्द वापरल्यामुळे कधी कधी लाज जाण्याची शक्यता असते.

लहान मुलांसमोर असं कधीच वागू अथवा बोलू नका, होईल चुकीचा परिणाम

वेडी, वेडा

 लहान मुलांना खूप जण वेडी, वेडा असे देखील म्हणायला शिकवतात. ते असं मुलांना गंमत म्हणून शिकवायला जातात. पण हा शब्द  मुलांना अजिबात शिकवू नका. कारण यामुळे आपल्या मुलांवरील झालेले वाईट संस्कार दिसतात. अजून काही नाही. हा शब्द आपण मोठी इतर वेळी वापरतो. त्याचा वापर कुठे करायचा आपल्याला कळते. कधी कधी आपण मस्करीमध्ये याचा वापर करतो. पण लहान मुलं आपल्या तोंडून हा शब्द शिकल्यानंतर तो कधी वापरतील हे देखील अजिबात कळणार नाही. त्यामुळे या गोष्टीचे भान ठेवा.

मुलांना आवड असले तरी हे स्नॅक्स अजिबात देऊ नका

शिव्या देणे

शिव्या देणे

काही जणांच्या तोंडून शिव्या अगदी सहजच देतात. पण वर म्हटल्याप्रमाणे एखाद्याला पटकन शिव्या द्यायची सवय असते. पटकन अशा काही शिव्या दिल्यामुळे लहान मुलांच्या कानावर जातात. अनेकदा थोडी मोठी मुलं याचा अर्थ तुम्हाला विचारतात. त्यावेळी तुमचा गोंधळ होतो. त्यामुळे लहान मुलांसमोर तुम्ही हे शब्द उच्चारताना थोडी काळजी घ्या. मुलं खूप पटकन काही गोष्टी कॅप्चर करतात. त्यांना शिव्या शिकवणे म्हणजे हातात आयतं कोलीत देण्यासारखं आहे. त्यामुळे तुम्ही थोडा जपूनच काही गोष्टींचा निर्णय द्या.

जाणून घ्या मोबाईलचे दुष्परिणाम

चुकीचे इंग्रजी शब्द देणे

 खूप पालकांना आपल्या मुलांना इंग्रजी शिकवायची सवय असते. पण आता इंग्रजी शिकवणे म्हणजे चांगले शिकवण्यापेक्षा खूप जण काहीतरी चुकीचं आणि असबद्ध असं मुलांना शिकवतात ज्याची खरंच काही गरज नसते. मुलांना नकारात्मक शब्द शिकवण्यापेक्षा तुम्ही थँक्यू, सॉरी असे काही शब्द शिकवले तर चालू शकते. पण काही जण खूपच चुकीचे आणि नकारात्मक शब्द मुलांना शिकवतात. असे करत असाल तर तुम्ही आताच हे थांबवा. 

आता लहान मुलांना तुम्ही अजिबात हे शब्द शिकवू नका. तर चांगले शब्द शिकवा.

बाळाच्या जन्मानंतर ‘या’ गोष्टींमुळे येऊ शकतो पतीपत्नीमध्ये दुरावा

Read More From पालकत्व