बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आपल्या परदेसी नवरा निक जोनस (Nick Jonas)सोबत जंगी आणि शाहीरित्या विवाहबद्ध झाली. त्यांच्या लग्नाचे सर्व विधी जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये पार पडले. या लग्न सोहळ्यात या दोघांकडील निकटवर्तीय सामील झाले होते. नुकत्याच त्यांच्या ख्रिश्चन पद्धतीने झालेल्या लग्नाचे भरपूर फोटोज व्हायरल झाले. त्यातले काही खास फोटोजच आम्ही इकडे एकत्र केलेत. पाहा –
प्रियांकाचा रॉयल वेडींग गाऊन
प्रियांकाचा हा वेडींग गाऊन खूपच चर्चेत आहे. #NickYanka 1 डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीने विवाहबद्ध झाले होते. ख्रिश्चन लग्नात प्रियांकाने चोप्राने घातलेला वेडींग गाऊन हा प्रसिद्ध डिझायनर रॉल्फ लॉरेन याने डिझाईन केला होता. या पांढऱ्या गाऊनवर हाताने फ्लोरल एम्ब्रॉयडरी करण्यात आली होती. या गाऊनमध्ये प्रियांका अगदी ‘ती परी अस्मानीची’ भासत होती.
या खास वेडींग गाऊनवर फक्त एम्ब्रॉयडरी करण्यासाठी तब्बल 1826 तास लागल्याची चर्चा आहे. त्यांच्या लग्नाचे सर्व फोटोज पीपल (People) मॅगझीनने शेअर केले.
प्रियांकाच्या वेडींग गाऊनचा व्हेल (veil) 75 फीट लांब होता. जो सांभाळण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली.
#NickYanka मधले काही खास क्षण
प्रियांका चोप्रा आणि निक जोनसने आपल्या लग्नातील सर्व विधी खूप छानरित्या पार पाडले. एका क्षणी तर प्रियांकाला वेडींग व्हेन्यूकडे येताना पाहून निकच्या ही डोळ्यात पाणी आले.
प्रियांका आणि तिची आई
आपल्याकडे जसा लग्नाच्या वेळी वधूला तिचा मामा स्टेजवर घेऊन येतो. तसंच ख्रिश्चन लग्नामध्ये मुलीचे बाबा तिला घेऊन येत असतात. पण प्रियांकाने आपल्या आई मधू चोप्रा यांना हा मान दिला. या वेळी निळा रंगाचा ड्रेस घातलेली प्रियांकाची आई ही खूप छान दिसत होती. हा क्षण खूपच भावनिक होता. प्रियांकाच्या वडिलांच्या निधनानंतर मधू चोप्रा यांनी मुलीच्या लग्नात कोणतीही कमतरता जाणवू दिली नाही. जोधपूरला होणाऱ्या लग्नाची तयारीमध्ये त्यांनी जातीने लक्ष घातलं होतं.
रॉयल वेडींगचा रॉयल केक
हे लग्न अविस्मरणीय व्हावं म्हणून प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी सर्व प्रयत्न केल्याचं प्रत्यय त्यांच्या लग्नाचा केक बघून आला. पाहूण्यांसाठी खास मेन्यूसोबतच लग्नाचा केक ही खूप रॉयल होता. खरंतर, प्रियांका आणि निकने त्यांचं ख्रिश्चन लग्न होताच तब्बल 5 फूटाचा केक कापला होता.हा केक सामान्य वेडींग केक्सच्या तुलनेत अगदी वेगळा होता आणि दिसायला ही एखाद्या महालासारखा होता. या केकवरील नक्षी आणि खिडक्यांची कारागिरी अगदी बघण्यासारखी आहे. हा केक बघताच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल.
4 डिसेंबरला दिल्लीत झालेल्या शाही रिसेप्शननंतर #NickYanka चं दुसरं रिसेप्शन मुंबईला होणार आहे. अधिक अपडेट्ससाठी वाचत राहा POPxo Marathi.
फोटो सौजन्य : People Magzine