DIY लाईफ हॅक्स

आजारांपासून वाचण्यासाठी वाढतोय ‘नो डेकोरेशन ट्रेंड’, काय आहे नक्की हे

Dipali Naphade  |  Apr 10, 2020
आजारांपासून वाचण्यासाठी वाढतोय ‘नो डेकोरेशन ट्रेंड’, काय आहे नक्की हे

घरात जास्त सामान ठेवणे आणि जास्त सजावट करण्यासाठी वस्तूचा वापर भिंतीवर करणे हे आता जुने  झाले आहे. कारण आता बदलता ट्रेंड आणि आपल्या वेळेनुसार तसंच आपल्या धावपळीच्या आयुष्यातून आजारापासून वाचण्यासाठीही  आता या सगळ्या गोष्टींपासून फारकत घेणे अनेकांनी सुरू केले आहे. याचा परिणाम आता घरातील डेकोरेशनवरही झाला आहे. आता बऱ्याच घरांमध्ये घर डेकोरेट करताना आपल्याला गरज आहे तितक्यात वस्तू घरात ठेवणे हे गरज लक्षात घेतली जात आहे.  इंटिरिअर डिझाईनर्सच्या म्हणण्यानुसार घरात जितक्या जास्त गोष्टी तितका बॅक्टेरिया आणि व्हायरसाचा तुमच्या घरात भरणा होऊ शकतो. तसंच घरात धूळ आणि माती येण्यापासून वाचायचं असेल तर घरात कमीत कमी गोष्टी ठेऊन ‘नो डेकोरेशन ट्रेंड’ फॉलो करणं सध्या जास्त महत्त्वाचे आहे. पण ‘नो डेकोरेशन ट्रेंड’ म्हणजे नक्की काय असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. तर याची माहिती आम्ही तुम्हाला सांगतो. पूर्वी घराचे डेकोरेशन म्हणजे आपल्या डोक्यात कितीतरी गोष्टी असायच्या.  पण आता ‘नो डेकोरेशन ट्रेंड’ मध्ये तुम्ही घर जितकं सुटसुटीत ठेवाल तितकं ते सुंदर आणि आजारापणांपासून दूर राहणारे ठरते. 

आजारांपासून सुरक्षा आणि डोळ्यालाही दिलासा

Shutterstock

आता इंटिरिअरमध्ये ‘नो डेकोरेशन ट्रेंड’ हा अतिशय लोकप्रिय ठरत आहे. कारण लोकांना आता जास्तीत जास्त आपल्या घरात सुटसुटीतपणा आणि शांतता हवी असते. घरात जितकं जास्त सामान आणि डेकोरेशन असेल तर मनालाही शांतता मिळत नाही.  आपल्याकडे ही मिनिमल इंटिरिअर डेकोरेशनची संकल्पना जपानच्या डेकोरेशनवरून प्रेरित होऊन घेण्यात आली आहे. आपल्या आवश्यक आहे तितकेच सामान घरात ठेवायचे अन्यथा उगीच पसारा करून घरात कचरा करून ठेवायची गरज नाही असंही आता म्हटलं जात  आहे. जपानमध्ये तर बऱ्याचदा बेडही नसतात. पण आपल्याकडे तसं करून चालणार नाही. पण ‘नो डेकोरेशन ट्रेंड’ मध्ये आपण कमीत कमी डेकोरेशनचा वापर करून घराला एक सुंदर लुक देऊ शकतो. जेणेकरून घरात जास्त पसारा, कचरा, धूळ आणि माती यापैकी कशाला जागा उरणार नाही आणि आजारांपासूनही सुरक्षा मिळेल. त्याशिवाय घरात आल्यानंतर डोळ्यांना आणि अगदी मनालाही एक शांतता आणि दिलासा मिळेल. 

#HouseInterior : तुमचे घर किती हरित आहे?

कसे असते हे डेकोरेशन

Shutterstock

आपल्याकडेही आता व्हायरस आणि संक्रमण या गोष्टींचा शिरकाव होतोय आणि त्याचा धोकाही वाढू लागला आहे. सध्या आपण कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासूनही वाचण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे अशा वेळी घरात अशा  तऱ्हेचे इंटिरिअर असणे उत्तम. अशा घरांना सॅनिटाईज करणेही सोपे असते. या इंटिरिअरची क्रेझ सध्या बाजारात वाढत आहे. त्यामुळे डेकोरेटिव्ह गोष्टींची विक्रीही वाढू लागली आहे. अनावश्यक सामानाऐवजी अथवा भारीभक्कम फर्निचरच्या जागी अगदी बेताची जागा व्यापणारे असे फर्निचर आता लोकांना आवडू लागले आहेत.  कारण त्यामुळे घराची साफसफाई करणेही सोपे होते. भिंतींनाही अगदी सफेद अथवा ऑफव्हाईट रंग देण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे. 

डोहाळे जेवणाला करा अशी सुंदर सजावट (Dohale Jevan Decoration Ideas In Marathi)

जास्त जागा मिळावी म्हणून कमी डेकोरेशन

Shutterstock

घरात सर्वात जास्त सामानाने जागा व्यापते. डेकोरेशनच्या नावाखाली बऱ्याच गोष्टी भरल्या जातात. या सगळ्या डेकोरेशनने एक नकारात्मक ऊर्जा भरली जाते आणि त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावरही होत असतो. तसंच घरात जितकं सामान अधिक तितकी धूळ आणि माती जमण्याचा धोका अधिक असून आजारी पडण्याचा धोकाही अधिक असतो.  त्यामुळेच घरात जास्तीत जास्त जागा मिळावी आणि आजारांपासूनही दूर राहता यावं यासाठी कमी डेकोरेशन अथवा ‘नो डेकोरेशन ट्रेंड’ सध्या दिसून येत आहे. तुम्हाला तुमचं घर डेकोरेट करायचं असेल तर नक्कीच तुम्ही ‘नो डेकोरेशन ट्रेंड’चा विचार करावा. 

टॉप 10 आयडियाजमुळे तुमचं बेडरूम दिसेल अधिक सुंदर!

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा  

 

Read More From DIY लाईफ हॅक्स