आरोग्य

सतत उडत असेल भडका, तर राग शांत करण्यासाठी वापरा जायफळ

Leenal Gawade  |  Sep 1, 2021
राग शांत करण्यासाठी जायफळ

 रागावर नियंत्रण ठेवणे हे आरोग्यासाठी फारच गरजेचे असते. ज्याचे रागावर नियंत्रण राहात नाही. अशांसाठी काही गोष्टी या कठीण होऊन बसतात. कारण सतत रागावण्याचा नातेसंबंधावर परिणाम होत राहतो. चिडणारी व्यक्ती ही कधीच कोणाच्या जवळ असावी असे वाटत नाही. अगदी कोणताही प्रश्न विचारला तरी देखील त्या व्यक्तीला राग येऊ लागतो. तुमच्या किंवा तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीचा राग शांत करण्याचे हरएक प्रयत्न तुम्ही करुन झाला असाल तर जायफळचा इलाज करुन पाहा. शांत करण्यासाठी जायफळ हे फारच उत्तम आहे.  जाणून घेऊया राग शांत करण्यासाठी जायफळ कसे वापरावे

सतत होणारी चिडचिड सांगते तुमच्या शरीरातील कमतरता

जायफळाचे फायदे

Instagram

जायफळ हे अनेक रेसिपीमध्ये वापरले जाते. जायफळाचा वापर हा चव वाढवण्यासाठी केला जात असला तरी त्याचे अन्य काही फायदे आहेत. 

  1. जायफळाचा समावेश आहारात केल्यामुळे भूक लागते. 
  2. पोट साफ होण्यासाठीही जायफळ फार फायदेशीर ठरते. 
  3. त्वचेच्या समस्या करते दूर 
  4. निद्रानाशाचा त्रास करते दूर 
  5. डोकेदुखी थांबवते

असा करा जायफळाचा वापर

 जर तुमची सतत चिडचिड होत असेल तर जायफळाचा आहारात समावेश करणे आणि त्याचा वापर कसा करायचा ते जाणून घेऊया. 

  1. जायफळाची पूड करुन ती अगदी चिमूटभर जरी दुधात घातली आणि अशा दूधाचे सेवन केले तर  झोप चांगली लागते. अनेकदा अपुऱ्या झोपेमुळेच राग अनावर होण्याचा त्रास होत असतो. जर तुम्हालाही असे जाणवत असेल तर तुम्ही दररोज रात्री शांत झोपेसाठी जायफळाची पूड करुन ठेवा किंवा जायफळ किसून ते थोडेसे दुधात घाला. रात्री झोपताना कपभर जायफळ दूध प्यायल्यास नक्कीच तुम्हाला तुमच्यामध्ये फऱक झालेला जाणवेल. 
  2. जायफळाचे दूध प्यायची इच्छा नसेल तर तुम्ही जायफळाचे गंधक दोन भुवयांच्या मध्ये लावू शकता. जायफळ उगाळून त्याचा गंधक करुन तुम्हाला तो लावायला आहे. असे केल्यमुळे तुमचे डोके शांत राहील आणि तुम्हाला नक्कीच डोकं शांत होण्यास मदत मिळेल. 

अशी घ्या काळजी

तुम्हाला हा प्रयोग दररोज करायचा आहे. तरच तुम्हाला हा फरक जाणवेल. काही उपाय हे नियमित आणि मनापासून करायला हवे. तरच तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. 

त्यामुळे तुम्ही नियमित आणि मनापासून अतिरेक न करता हे उपाय करा. 

आता राग शांत करणाऱ्यांसाठी असा करा जायफळाचा वापर

नाकातून पाणी येणे घरगुती उपाय (Nakatun Pani Yene Upay)

Read More From आरोग्य