Diet

थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी हे पोषक घटक खाल्लेच पाहिजेत

Vaidehi Raje  |  May 19, 2022
diet for thyroid

आपल्या शरीराची सर्व कार्ये सुरळीत चालण्यासाठी शरीरात अनेक प्रकारच्या ग्रंथी काम करतात आणि त्यापैकी एक म्हणजे थायरॉईड ग्रंथी होय. गळा व मानेच्या भागात असलेली ही फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे. थायरॉईड ग्रंथी हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. या ग्रंथीतून थायरॉईड संप्रेरक तयार होते व ते रक्तप्रवाहातून शरीरात सगळीकडे पोचते. जेव्हा थायरॉईड ग्रंथी नीट काम करत नाही, तेव्हा ती थायरॉईड संप्रेरक योग्य प्रकारे तयार करत नाही आणि लोकांना वजन वाढण्यापासून ते केस गळण्यापर्यंत व मेटाबॉलिजमवर परिणाम होण्यासारख्या इतर अनेक समस्या भेडसावतात.थायरॉईड ही एक अतिशय महत्त्वाची ग्रंथी आहे जिच्यातून आपल्या चयापचय क्रिया नियंत्रित करणारे हार्मोन्स स्त्रवतात.थायरॉईड ग्रंथी योग्य रीतीने कार्य करत राहावी यासाठी शरीराला काही पोषक तत्वांची आवश्यकता असते, ज्याबद्दल लोकांना फारशी माहिती नसते. थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुरळीत चालण्यासाठी कुठली पोषक तत्वे आवश्यक आहेत तसेच त्या पोषक घटकांचे स्रोत कुठले आहेत हे जाणून घ्या.

आयोडीन

Diet For Thyroid

थायरॉईड ग्रंथीला थायरॉईड संप्रेरक तयार करण्यासाठी आयोडीनची आवश्यकता असते. आयोडीन मिळवण्यासाठी तुम्ही आहारात काही गोष्टींचा समावेश करू शकता. आयोडीनयुक्त मीठ, लोहयुक्त पदार्थ जसे की केळी, गाजर, सीफूड, अंडी, स्ट्रॉबेरी, संपूर्ण धान्य यातून तुम्हाला आयोडीन मिळू शकते. 

व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स

Diet For Thyroid

व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स हे थायरॉईड ग्रंथीसाठी आवश्यक असलेले पोषकतत्व आहे . बी-कॉम्प्लेक्स मिळवण्यासाठी संपूर्ण धान्य, कडधान्ये, शेंगा, दूध, अंडी, चीज, सीफूड, हिरव्या पालेभाज्या, नट्स, लिंबूवर्गीय फळे, केळी, कलिंगड, सोया या पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. 

व्हिटॅमिन डी

सामान्यतः, असे मानले जाते की व्हिटॅमिन डी हे शरीरात कॅल्शियम शोषले जाण्यासाठी आवश्यक आहे. परंतु व्हिटॅमिन डी हे शरीराच्या इतर अनेक महत्वाच्या क्रियांसाठी देखील महत्त्वाचे आहे. हे थायरॉईड ग्रंथीचे कार्य देखील सुरळीत ठेवते. व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्त्रोत हा सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश आहे. परंतु त्याशिवाय, अंड्यातील पिवळा बलक, फॅटी मासे आणि मांस या अन्नपदार्थांतून देखील आपण व्हिटॅमिन डी मिळवू शकतो. 

लोह

Diet For Thyroid

शरीरात लोहाची कमतरता असेल तर अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. लोहाच्या कमतरतेमुळे थायरॉईड ग्रंथीच्या कार्यातही अडथळा येतो. सीफूड, ऑर्गन मीट, अंडी, हिरव्या पालेभाज्या, शेंगा, भोपळ्याच्या बिया, क्विनोआ, ब्रोकोली, बीटरूट आणि टोफू या सर्वांमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. त्यामुळे हे पदार्थ नियमितपणे खाल्ले पाहिजेत. 

व्हिटॅमिन सी

Diet For Thyroid

आपल्या सर्वांना माहितच आहे की व्हिटॅमिन सी शरीरासाठी अत्यंत महत्वाचे आहे. हे केवळ शरीराची प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करत नाही तर थायरॉईड ग्रंथीसाठी देखील आवश्यक जीवनसत्व आहे. आवळा, पेरू, स्ट्रॉबेरी, ब्रोकोली, टोमॅटो, लिंबू आणि इतर लिंबूवर्गीय फळांत भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी आपल्या त्वचेसाठीही अत्यंत आवश्यक असते. 

टायरोसिन

Diet For Thyroid

टायरोसिन हे थायरॉईड ग्रंथीला आवश्यक असलेले अमिनो ऍसिड ऍसिड आहे. अंडी,पनीर, दूध, दही, समुद्री मीठ, सोया, शेंगदाणे, बदाम, कडधान्ये आणि इतर चांगल्या दर्जाची प्रथिने यांपासून तुम्हाला टायरोसिन मिळू शकते.

सेलेनियम व मँगनीज 

सेलेनियम हे एक प्रकारचे खनिज आहे. सीफूड, ऑर्गन मीट, नट, चिकन, चीज, अंडी, तपकिरी तांदूळ, सूर्यफूल बिया, बीन्स, मशरूम, ओट्स आणि पालक यातून तुम्हाला सेलेनियम मिळू शकेल. तर नट्स, कडधान्ये , टोफू, रताळी, अननस, हातसडीचे तांदूळ, ऑयस्टर आणि शेंगा या पदार्थांमध्ये मॅंगनीजचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. 

थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुरळीत चालण्यासाठी या सर्व गोष्टी आहारात असायलाच हव्या. 

Photo Credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From Diet