स्टार किड्सने बॉलीवूडमध्ये प्रवेश करणं आता काही नवं राहिलेले नाहीये. पण त्यापैकी काहीच स्टार किड्स असे आहेत ज्यांनी लवकरात लवकर बॉलीवूडमध्ये यावं असं प्रेक्षकांनाही वाटत आहे आणि त्यापैकीच एक स्टारपुत्र आहे इब्राहिम अली खान. इब्राहिम बॉलीवूडमध्ये येण्याआधीपासूनच प्रसिद्ध आहे आणि ही प्रसिद्धीच त्याला बॉलीवूडमध्ये येण्यासाठी कामी येईल असं वाटत आहे. इब्राहिम दिसायला तर सुंदर आहेच त्याशिवाय त्याचे अनेक व्हिडिओदेखील व्हायरल होत असतात. इतकंच नाही आता पुन्हा एकदा इब्राहिम चर्चेत आला आहे तो त्याने शेअर केलेल्या एका फोटोमुळे. या फोटोला दिलेली कॅप्शनही त्याच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असून आता इब्राहिमही बॉलीवूडमध्ये येणार अशा चर्चा होऊ लागल्या आहेत. इब्राहिमेच आतापर्यंत आपली बहीण साराबरोबर अनेक व्हिडिओदेखील व्हायरल झाले आहेत. मात्र या फोटोनंतर मात्र इब्राहिम लवकरच बॉलीवूडमध्ये पाऊल टाकणार अशा चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई पोलिसांनीही घेतली बबड्याची दखल, ‘बबड्या चांगला की वाईट…’
इब्राहिम करतोय प्रचंड मेहनत
इब्राहिमचा चाहता वर्ग खूपच मोठा आहे. त्यातही मुली त्याच्या जास्त चाहत्या आहेत. इब्राहिमचा लुक आणि त्याची त्याने कमावलेली शरीरयष्टी हा सध्या चर्चेचा विषय ठरतोय. इब्राहिमने नुकताच एक फोटो शेअर केला असून हा फोटो खूपच व्हायरल होतो आहे. या फोटोला इब्राहिमने ‘प्रक्रियेवर विश्वास ठेवा’ असं कॅप्शन देऊन चाहत्यांनाही विचार करायला भाग पाडले आहे. इब्राहिमने बॉलीवूडमध्ये यावं असं अनेक जणांना वाटत आहे. पण सध्या नेपोटिझमचा वाद बघता इब्राहिम आता नक्की कधी बॉलीवूडमध्ये प्रवेश करणार अथवा करणार की नाही अशा अनेक प्रश्नांची चर्चाही सुरू झाली आहे. मात्र त्याने शेअर केलेल्या फोटोनंतर आता इब्राहिम बॉलीवूड येण्यासाठी नक्कीच तयार झाला असल्याचंही दिसून येत आहे. इब्राहिमचा लुक पाहता तो एक अत्यंत सुंदर अभिनेत्यांमध्ये गणला जाईल असंही अनेकांचं म्हणणं आहे. या फोटोमध्ये इब्राहिम आपले सिक्स पॅक्स अॅब्स दाखवत असून कमालीचा फिटनेस दिसून येत आहे. मुळात इब्राहिम हा एक खेळाडू असल्यानेही तो आपल्या फिटनेसकडे लक्ष देत असतो. त्यामुळे आता इब्राहिम नक्की कोणतं करिअर निवडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
सोशल मीडियावर ‘छा गये छोटे नबाव’, पाहा फोटो
इब्राहिमला लहान वयातच आहे प्रचंड फॅन फॉलोईंग
सैफ आणि अमृताचा मुलगा इब्राहिम हा केवळ 19 वर्षांचा आहे. सर्वात प्रसिद्ध स्टारकिड्सपैकी एक त्याला म्हटले जाते. त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच त्याचा जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. त्यामुळे त्याने जर बॉलीवूडमध्ये पदार्पण केले तर त्याला नक्कीच चांगले भविष्य असेल असे त्याच्या चाहत्यांना वाटत आहे. इतकंच नाही तर इब्राहिमचे अनेक व्हिडिओ त्याने शेअर केले नसले तरीही अनेक फॅनपेजवरूनही शेअर होत असतात. यापूर्वीही इब्राहिमने काही मजेशीर व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले होते. ज्याला युजर्सने खूपच चांगला प्रतिसाद दिला होता. तसंच बहीण साराबरोबरही त्याचे अनेक व्हिडिओ असतात ज्यामध्ये इब्राहिमसाठीही त्याचे चाहते कमेंट्स देत असतात. दरम्यान इब्राहिम गेले कित्येक वर्ष क्रिकेट खेळत आहे आणि त्याचा सरावही करत आहे. त्यामुळे आता येणारा काळच ठरवेल की इब्राहिम नक्की क्रिकेट की अभिनय यापैकी कशाची निवड करतो.
जेव्हा या कलाकारांना भूमिका साकारण्यासाठी करावे लागले स्वतःमध्ये अफलातून बदल
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje