Natural Care
संत्र्याच्या सालीचे फायदे असा उपयोग करुन मिळवा सुंदर त्वचा (Orange Peel Powder Uses In Marathi)
सुंदर त्वचेसाठी आपण काय काय करतो नाही का?.. तुम्हीही चांगल्या त्वचेसाठी वेगवेगळे प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी आणखी एक ऑरगॅनिक पर्याय आम्ही आज सुचवणार आहोत. हा पर्याय आहे orange peel powder अर्थात बहुगुणी संत्र्याच्या सालीच्या पावडरचा. तुमच्या त्वचेला तजेला आणण्याचे काम संत्र करत असते. पण संत्र्याचा सीझन गेला म्हणून काय झाले तुम्ही संत्र्याच्या सालीची पावडर करुन त्याचे फायदे वर्षभर घेऊ शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला संत्र्याच्या सालीचे फायदे आणि त्याचा योग्य वापर याविषयी तुम्हाला सांगणार आहोत. मग करायची का सुरुवात?
Table of Contents
- संत्र्याचे फायदे आहेत अफाट फायदे (Beauty Benefits Of Orange In Marathi)
- घरच्या घरी अशी बनवता येईल संत्र्याची पावडर (How To Make Orange Peel Powder At Home In Marathi)
- संत्र्याच्या सालीचा उपयोग करुन तयार करा हे झटपट फेसपॅक ( Face Pack You Can Make Out Of Orange Peel Powder )
- संत्र्याच्या पावडरचा असाही करु शकता तुम्ही वापर (Other Homemade Tips Of Orange Peel Powder)
- FAQ’s
संत्र्याचे फायदे आहेत अफाट फायदे (Beauty Benefits Of Orange In Marathi)
संत्र्याच्या सालीचा उपयोग
संत्र हे चवीला छान आंबट- गोड असे असले तरी त्यापासून होणारे फायदे अफाट आहेत. म्हणूनच व्हिटॅमिन C ने युक्त असलेले संत्र खाण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. आता नेमक्या कोणत्या कारणांसाठी संत्री खायला हवीत, असा विचार तुम्ही करत असाल तर संत्र खाण्याचे हे आहेत फायदे.संत्र्याचा गरच नाही तर संत्र्याच्या सालीचा उपयोग ही वेगळ्या पद्धतीने केला जातो.
1. त्वचा उजळवते (Lighten Skin Tone)
अनेकदा प्रदुषण आणि वातावरणातील बदल यामुळे त्वचा काळवंडते. त्वचेवरील तजेला निघून जातो. संत्र्याच्या सेवनामुळे तुमच्या त्वचेचा रंग उजळतो. तुमच्या त्वचेला आवश्यक अशा गोष्टी मिळाल्यामुळे तुमची त्वचा अधिक चांगली दिसू लागते.
2. कोलॅजन वाढीला देते चालना (Boost Collagen)
संत्र तुम्ही अगदी कोणत्याही स्वरुपात तुमच्या आहारात आणा तुम्हाला त्याचा फायदा अगदी हमखास होणारच. जर तुम्ही कोलॅजन हा शब्द ऐकला असेल तर तुमच्या आरोग्यासाठी हेल्दी कोलॅजन असणे आवश्यक असते. तुमच्या त्वचेसोबतच तुमच्या हाडांच्या बळकटीसाठी गरजेचे असते. शरीरातील पेशींचे कार्य योग्य करण्याचे काम कोलॅजनमध्ये असते. संत्र्याच्या सेवनामुळे कोलॅजनला चालना मिळते. तुमच्या त्वचेमधील इलास्टिसिटी वाढते.
3. पिंपल्स आणि त्यांचे डाग करते कमी (Reduce Acne And Scars)
संत्री खाल्यामुळे तुमच्या शरीरात भरपूर पाणी जाते. शरीरात जितके पाणी जाईल तितके तुमच्यासाठी चांगले असते. संत्र्याच्या सेवनामुळे तुम्हाला असलेला पिंपल्सचा त्रास कमी होईल. शिवाय संत्र्याचा वापर चेहऱ्याला केल्यामुळे तुमचे चेहऱ्यावरील पिंपल्सचे डागही कमी होतील.
4. चिरतरुण चेहरा (Anti Aging)
जर तुमची त्वचा तुम्हाला चिरतरुण ठेवायची असेल तर तुम्ही संत्र्याचा वापर तुमच्या त्वचेसाठी नक्कीच करायला हवा. संत्र्यांमधील आवश्यक घटकांमुळे त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या कमी होतात. त्यामुळे तुमची त्वचा चिरतरुण राहते.
5. ओपन पोअर्सचा त्रास होतो कमी (Unclog Skin Pores)
जर तुम्हाला ओपन पोअर्सचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यांसाठी संत्र्याच्या सालीचे सिरम वापरु शकता. त्यामुळे तुमचे ओपन पोअर्स कमी होतील. तुमचे पोअर्स कमी झाल्यामुळे तुम्हाला होणारा पिंपल्सचा त्रासही कमी होईल.
6. त्वचा चमकवते (Help To Glow Skin)
जर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने त्वचेवर ग्लो आणायचा असेल तर तुम्ही संत्र्याच्या ब्युटी प्रोडक्टसचा वापर करु शकता. तुमच्या त्वचेला नैसर्गिक पद्धतीने ग्लो आणण्याचे काम करते. त्यामुळे संत्री असलेल्या ब्युटी प्रोडक्टचा वापर नक्की करुन पाहा. याशिवाय तुम्ही कोणत्याही फेशियल ट्रिटमेंट निवडताना त्यामध्येही संत्र्याच्या फ्लेवररची निवड करु शकता.
घरच्या घरी अशी बनवता येईल संत्र्याची पावडर (How To Make Orange Peel Powder At Home In Marathi)
संत्र्याच्या सालीचे फायदे
- किमान 10 ते 12 मध्यम आकाराची संत्री आणा
- संत्र्याची सालं काढून घ्या.
- संत्र्याच्या सालांना जर संत्र्याचा गर लागला असेल तर तो काढून टाका.
- एका परातीत संत्र्याची सालं पसरवून ठेवा.
- संत्र्याच्या सालीत घाण जाऊ नये म्हणून पातळ कपड्याने सालं झाकून ठेवा.
- साधारण 5 ते 6 दिवस ही साल उन्हात वाळत ठेवा.
- सालं कडकडीत वाळल्यानंतर वाळलेली सालं एका मिक्सरमधून वाटून घ्या.
- साल तुम्ही अगदी पूड स्वरुपात वाटली तरी चालतील.
- तयार पूड काचेच्या अथवा प्लास्टिकच्या एअरटाईट भांड्यात ठेवून द्या.
- ओला चमचा शक्यतो या पूडमध्ये घालू नका.
- अधे-मध्ये या पावडरला उन दाखवायला विसरु नका.
संत्र्याच्या सालीचा उपयोग करुन तयार करा हे झटपट फेसपॅक ( Face Pack You Can Make Out Of Orange Peel Powder )
1. संंत्र्याची साल-मध आणि लिंबू पॅक (Orange Peel- Honey Lemon Pack)
जर तुमची त्वचा टॅन आणि रुक्ष झाली असेल तर तुम्ही हा फेसपॅक वापरु शकता. संत्र्याच्या सालीचा उपयोग करुन तुम्हाला त्याचे फायदे मिळवता येतील.
- एका भांड्यात साधारण दोन चमचे संत्र्याच्या सालीची पावडर घ्या.
- साधारण अर्ध्याहून कमी लिंबूचा रस घेऊन तो त्यात घाला.
- एक चमचा मध घेऊन मिश्रण एकजीव करा.
- फेसपॅकसारखे थपथपीत मिश्रण करण्यासाठी त्यात योग्य प्रमाणात पाणी घाला.
- तयार फेसपॅक चेहरा आणि मानेवर लावा.
- साधारण 15 ते 20 मिनिटे ठेवून थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.
- तुम्हाला फेसपॅक काढल्यावर नक्कीच फ्रेश वाटेल. चेहरा कोरडा करुन तुमचे आवडते मॉश्चरायझर लावा.
संत्र्याच्या सालीचा उपयोग
2. संत्र्याची साल-हळद फेसपॅक (Orange Peel- Turmeric Face Pack)
संत्र्याच्या सालीच्या पावडरसोबत तुम्हाला हळदीचाही उपयोग करता येऊ शकतो.
- एक मोठा चमचा संत्र्याच्या सालीची पावडर घेऊन त्यामध्ये साधारण पाव चमचा हळद घाला.
- एकत्र करुन तुम्ही यामध्ये दूध किंवा पाणी असे काहीही घालू शकता जर तुम्ही त्वचा तेलकट असेल तर दूध घालू नका.
- तयार फेसपॅक चेहऱ्याला लावून साधारण 15 ते 20 मिनिटे ठेवा.
- काढताना चेहरा थोडा स्क्रब करा.
- थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.
3. संत्र्याची साल आणि मुलतानी माती फेसपॅक (Orange Peel- Multani Mitti Face Pack)
जर तुमची त्वचा अगदीच तेलकट असेल तर तुम्ही या फेसपॅकचा नक्कीच वापर करु शकता.
- एक चमचा मुलतानी माती आणि एक चमचा संत्र्याच्या सालीची पावडर घ्या.
- त्यामध्ये पाणी घालून फेसपॅक तयार करा.
- तयार फेसपॅक 10 ते 15 मिनिटे ठेवा.
- कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या.
4. संत्र्याची साल आणि ओट्स पॅक (Orange Peel- Oats Face Pack )
जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही हा फेसपॅक नक्कीच वापरु शकता. यामुळे तुमच्या त्वचेला ओलावा येईल.शिवाय तुमची त्वचा चांगलीही दिसेल. संत्र्याच्या सालीचा उपयोग लक्षात घेता हा एक उत्तम पॅक आहे.
- संत्र्याची साल आणि साधे ओट्स एका भांड्यात घेऊन त्याची थपथपीत पेस्ट करा.
- जर तुम्हाला यात मध घालायचे असेल तर तुम्ही यामध्ये मधही घालू शकता.
- तयार फेसपॅक चेहऱ्याला लावून 10 मिनिटे ठेवा.
- फेसपॅक काढताना तुम्ही तुमच्या चेहऱ्याला थोडावेळ स्क्रब करा.
5. संत्र्याची साल- टोमॅटो-मध फेसपॅक (Orange Peel-Tomato-Honey-Face Pack)
जर तुम्हाला तुमच्या पिंपल्सचे डाग घालवायचे असतील तर तुम्ही हा फेसपॅक नक्कीच वापरु शकता. संत्र्याच्या सालीचा फायदा पाहता हा पॅक करुन पाहा.
- एका भांड्यात संत्र्याच्या सालीची पावडर साधारण एक चमचाभर घ्या.
- एका टोमॅटोचा रस घालून त्यात अर्धा चमचा मध घाला.
- मिश्रण एकजीव करुन तयार फेस पॅक चेहऱ्याला लावा.
- चेहरा धुतल्यानंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर तजेला जाणवेल.
6. संत्र्याची साल- अॅलोवेरा फेस पॅक (Orange Peel Aloe Vera Face Pack)
जर तुम्हाला पिंपल्स आणि चेहऱ्याच्या इतर समस्या कमी करायच्या असतील तर तुम्ही संत्र्याच्या सालीच्या पावडरसोबत अॅलोवेरादेखील वापरु शकता.
- संत्र्याच्या सालीची पावडर आणि चमचाभर अॅलोवेरा जेल घालून घट्टसर पॅक तयार करुन घ्या.
- आवश्यक असल्यास पाणी घाला
- तयार फेसपॅक चेहऱ्याला आणि मानेला लावा.
- फेसपॅक सुकल्यावर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. चेहरा वाळवून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मॉश्चरायझर लावून घ्या.
7. संत्र्याची साल आणि कडुनिंब फेसपॅक (Orange Peel- Neem Face Pack)
जर तुमच्या चेहऱ्यावर बारीक बारीक पुटकुळ्या असतील तर तुम्ही संत्र्याच्या पावडरसोबत कडुनिंब वापरु शकता.
- बाजारात कडुनिंबाची पावडर मिळते. ती अथवा घरी तयार केलेली कडुनिंबाची साधारण एक चमचाभर पावडर घ्या.
- मिश्रण पाणी किंवा दुधात कालवून त्याचा फेसपॅक तयार करा.
- चेहऱ्याला लावून वाळल्यानंतर चेहरा धुवून टाका.
8. संत्र्याची साल फेसपॅक (Orange Peel Virgin Facepack)
आता जर तुम्हाला संत्र्याच्या सालीचा पुरेपूर फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही हा फेसपॅक तयार करु शकता.
- संत्र्याच्या सालीची पावडर घेऊन त्यात तुम्हाला पाणी किंवा रोझ वॉटर घालायचे आहे.
- मिश्रण थोड्यावेळासाठी ठेवून तयार फेसपॅक तुम्हाला चेहऱ्याला लावायचा आहे.
- फेसपॅक चेहऱ्यावर साधारण 10 मिनिटे ठेवून चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे.
9. संत्र्याची साल- टी ट्री ऑईल फेसपॅक (Orange Peel- Tea Tree Oil Face Pack)
जर तुमची त्वचा फारच शुष्क असतील तर तुम्ही हा पर्याय अवलंबू शकता. तुम्हाला हा फेसपॅक अगदी झटपट करता येईल.
- संत्र्याच्या सालीची पावडर घेऊन तुम्हाला त्यात एक ते दोन थेंब टी ट्री ऑईल टाकायचे आहे.
- आवश्यकतेनुसार पाणी घालून फेसपॅक थोडा सेट करुन घ्या.
- तयार पॅक चेहऱ्याला लावून तो सुकवून घ्या.
- काढताना पाणी लावून थोडासा मसाज करुन पॅक काढून टाका.
10. संत्र्याची साल- तांदुळाचे पीठ (Orange Peel -Rice Flour)
जर तुम्हाला तुमची त्वचा स्क्रब करायची असेल तर तुम्ही हे नक्की करुन पाहा. संत्र्याच्या सालीचे फायदे लक्षात घेत त्याचा वापर नक्की करायला घ्या.
- संत्र्याच्या सालीची पावडर घेऊन त्यात तांदळाचे साधारण चमचाभर पीठ घाला.
- त्यात पाणी, लिंबाचा रस घालून तयार पॅक चेहऱ्याला लावा.
- हा पॅक लावून तुम्ही चेहरा स्क्रब करु शकता. तो तसाच चेहऱ्यावर वाळवून तुम्ही तो पॅक धुवून टाका. फ्रेश वाटेल.
संत्र्याच्या पावडरचा असाही करु शकता तुम्ही वापर (Other Homemade Tips Of Orange Peel Powder)
Orange Peel Powder In Marathi
1. ऑरेंज ड्रिंक(Orange Peel Powder Water For Skin)
जर तुम्हाला फळ खायला आवडत नसतील. विशेषत: संत्र तुमच्या पोटात जात नसेल तर तुम्ही संत्र्याची पावडर तयार करुन तुमच्या पिण्याच्या पाण्यात टाकून शकता. संत्र्याच्या पावडरला तशी काही विशेष चव नसते. पण तुम्ही ती पाण्यात घालून प्यायल्यामुळे तुमच्या शरीराला आणि त्वचेला आवश्यक घटक तुम्हाला या पाण्यातून मिळतात.
2. स्कीन रिफ्रेशनर (Orange Water As Skin Refresher)
तुम्हाला तुमच्या त्वचेला इन्स्टंट रिफ्रेश करायचे असेल तर तुम्ही संत्र्याची पावडर पाण्यात घालून तयार पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरु शकता. तेच पाणी तुम्ही बाहेरुन आल्यावर चेहऱ्याला मारु शकता. तुम्हाला फ्रेश वाटेल. संत्र्याच्या सालीचे फायदे पैकी हा एक सोपा असा उपाय आहे.
3. रुम फ्रेशनर म्हणून करा वापर (Use As Room Freshner)
जर तुम्ही संत्र्याची साल पाण्यात फर्मंट व्हायला ठेवून दयावे. साधारण आठवडाभरानंतर तुम्हाला हे पाणी रुम फ्रेशनर म्हणून वापरता येईल. याचा वापर करताना घरातील कोपऱ्यांमध्ये ते फवारा. घरात मच्छर आणि चिलटं येणार नाहीत. संत्र्याच्या सालीचा उपयोग असा करता येईल असा तुम्ही कधी विचारही केला नसेल. पण हा फारच फायदेशीर असा उपाय आहे.
4. टोनर म्हणून करा वापर (Use As Toner)
तुम्ही संत्र्याचा वापर टोनर म्हणून करु शकता. तुम्ही संत्र्याचा फ्रेश ज्यूस आणि त्यात पाणी घालून चेहऱ्याला लावू शकता. त्यामुळे तुमचा चेहरा रिलॅक्स होईल. शिवाय चेहऱ्याला आवश्यक ते घटक तुम्हाला यातून मिळतील.
5. माशांना ठेवतील लांब (Keep Away Flies From Plant)
जर तुमच्याकडे फार झाडं असतील तर त्यामुळे घरात माश्या, चिलटं, मधमाश्या येणे अगदीच स्वाभाविक आहे. संत्र्याच्या सालीना व्हिनेगरमध्ये बुडवून ठेवा. साधारण आठवडाभरानंतर तयार पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरुन ते झाडांवर फवारा. घरात माशा, चिलटं येणार नाहीत.
FAQ’s
1- संत्र्याच्या सालीची पावडर तुम्ही कशी साठवून ठेऊ शकता ?
जर तुम्ही घरच्या घरी संत्र्याच्या सालीची पावडर बनवून ठेवण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे. संत्र्याची साल ही कडकडीत उन्हात वाळवा. ती तुम्ही ज्या मिक्सरमधून काढणार आहात ते मिक्सचे भांडे कोरडे असू द्या. एअर टाईट कंटेनरमध्ये तुम्हाला तुमच्या संत्र्यांच्या सालीची पावडर ठेवायची आहे.
2- तुम्ही संत्र्याच्या सालीचा रोज वापर करु शकता का ?
संत्र्याची साल ही कोणताही विपरीत परिणाम करत नाही. त्यामुळे तुम्ही अगदी सहजपणे याचा वापर करु शकता. तुम्हाला याचा योग्य पद्धतीने वापर करणे माहीत असेल तर नक्की याचा वापर करा.
3- रेडिमेड संत्र्याच्या सालीची पावडर आरोग्यासाठी चांगले आहे का ?
हल्ली बाजारात अनेक ठिकाणी रेडिमेड संत्र्याच्या सालीची पावडर मिळते. जर तुम्हाला रेडिमेड संत्र्याच्या सालीची पावडर मिळत असेल तर ती वापरण्यास काहीच हरकत नाही. पण ही पावडर ऑरगॅनिक आहे की नाही ते नक्की पाहा. कारण केमिकल मिश्रित संत्र्याच्या सालीच्या पावडरचा अपेक्षित परीणाम तुम्हाला मिळणार नाही.
4- कोणत्या संत्र्याची सालं ही त्वचेसाठी चांगली असतात ?
हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारची संत्री मिळतात. पण या सगळ्यामध्ये आपल्या देसी संत्र्याची मजा काही वेगळीच असते. त्यामुळे तुम्ही आपल्या देसी संत्र्याची साल वाळवून ती त्वचेसाठी वापरली तर फारच उत्तम
5- संत्र्याच्या सालीच्या पावडरचे तुम्ही सेवन करु शकता का ?
संत्र्याच्या सालीच्या पावडरचे तुम्ही सेवन करु शकता. पण त्याची फार काय चव लागत नाही. तुम्ही पाण्यात साधारण एक चमचा घालून हे पाणी पिऊ शकता. याचा कोणताही विपरित परीणाम तुमच्यावर होणार नाही.