आरोग्य

सतत चहा गरम करुन प्यायल्याने होऊ शकतात हे नुकसान

Leenal Gawade  |  Aug 16, 2021
सतत चहा गरम करुन पिण्याचे नुकसान

 चहा हे खूप जणांसाठी अमृत आहे. अशांना दिवसभर जरी चहा दिला तरी ते पिऊ शकतात. खूप जणांकडे सकाळी चहा केला जातो. त्याचवेळी थोडासा जास्तीचा चहा करुन तो दिवसभर पिण्याची खूप जणांना सवय असते.जेव्हा मन करेल किंवा ज्यावेळी चहा प्यायची इच्छा होईल त्या त्या वेळी खूप जण टोपात तयार केलेला चहा गरम करतात आणि पिऊ लागतात. पण सतत तोच तोच चहा गरम करुन पिणे हे आरोग्यासाठी मुळीच चांगले नाही. असा चहा हा आरोग्यासाठी फारच घातक ठरु शकतो. जाणून घेऊया सतत चहा गरम करुन प्यायल्याचे तोटे

अॅसिडीटी वाढण्याची शक्यता

चहा थंड झाल्यानंतर तो गरम करणे हे अजिबात चांगले नाही. चहामध्ये असलेले पोषक घटक चहा सतत गरम करुन प्यायल्यामुळे कमी होऊ लागतात. जर तुम्ही चहा सतत गरम करुन पित असाल तर त्यात असलेली अॅसिडीटी वाढू लागते. खूप वेळा असा गरम केलेला चहा प्यायलामुळे छातीकडे जळजळ होऊ लागते. जर तुम्हाला अॅसिडिटीचा आधीपासूनच त्रास होत असेल तर अशावेळी तुम्ही चहा सतत गरम करुन पिणे अजिबात चांगले नाही. त्यामुळे जर असा चहा पित असाल तर आताच पिणे थांबवा

चव कडू लागते

सौजन्य : Instagram

कोणतीही गोष्ट जर तिच्या मूळ रुपात चाखली नाही तर त्याची चव बदलू लागते. चहाच्या बाबतीतही अगदी तसेच आहे. चहा एकदा केल्यानंतर त्याची चव ही कदाचित अमृताप्रमाणे तुम्हाला लागेल. पण तुम्ही तोच चहा ज्यावेळी प्रत्येकवेळी पिताना सतत गरम करत असाल तर मात्र तुम्हाला त्याच्या चवीत फरक पडतो. शरीरात जास्त प्रमाणात कडू जात असेल तरी देखील ते शरीरासाठी अजिबात चांगले नाही. त्यामुळे तुमचे पोटाचे आरोग्य बिघण्याची शक्यता असते.

सूक्ष्म जंतूंचा धोका

चहा गरम गरम गरम पिता त्यावेळी ती गळा शेकण्याचे काम करते. पण एकदा चहा करुन झाल्यानंतर तो साधारण काही तासांनंतर खराब होतो. त्या चहामध्ये अनेक सूक्ष्म जीवणू येतात. त्यामुळे त्यातील पोषकत्वे कमी होऊन तो चहा विष बनतो. त्यामुळे असा चहा पिण्याची चुकी मुळीच करु नका. 

पचनाचा त्रास

अॅसिडीटीचा त्रास हा तुम्हाला सतत चहा प्यायल्यामुळे होतो.  अगदी तसाच काहीसा त्रास तुम्हाला चहाच्या सततच्या सेवनामुळे होऊ शकतो. पण हा त्रास पचनाशी निगडीत आहे. खूप जणांना एकदा केलेला चहा सतत प्यायल्यामुळे मळमळण्याचा किंवा उलट्या होण्याचा त्रास होऊ लागतो. असा चहा प्यायल्यानंतर कदाचित लगेच त्रास होत नसेल पण हा त्रास काहीजणांना काही तासात जाणवू लागतो. त्यामुळे असा चहा अजिबात पिऊ नका.

आता घरी एकदा केलेला चहा पुन्हा सतत गरम करुन मुळीच पिऊ नका.

अधिक वाचा

घरीच कसा तयार कराल ईराणी चहा, सोपी रेसिपी

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी चहामध्ये टाका या तीन गोष्टी

वापरलेल्या टी बॅग टाकून न देता असा करा पुर्नवापर

Read More From आरोग्य