ADVERTISEMENT
home / Recipes
irani chai

घरीच कसा तयार कराल ईराणी चहा, सोपी रेसिपी

चहाशिवाय घरातील पाहुणे असो वा घरातील वातावरण असो अपूर्णच वाटते. अनेक घरांमध्ये चहा म्हणजे अमृत समजला जातो. बऱ्याच जणांना चहाचा चस्का आहे. अनेक ठिकाणी चहाची टपरी, चहाची दुकाने आणि वेगवेगळ्या पद्धतीचे चहा मिळतात. पण आजही ईराणी चहाची चव आणि त्याचा ठसका कोणत्याही चहाला येत नाही. बाहेर गेल्यानंतर ईराण्याचा चहा पिण्याची मजाच काही और आहे. असा चहा घरात तयार करताच येत नाही असं अनेकांना वाटतं. विशेषतः आता पावसाळ्याच्या दिवसात ईराण्याच्या हॉटेलवर जाऊन चहा पिण्यात आणि मित्रमैत्रिणींबरोबर नेहमी नाक्यावर गप्पा मारत ईराणी चहा पिण्यात खूपच मजा असते. आताच्या पिढीला ही मजा बऱ्यापैकी कॅफे हाऊन असल्यामुळे घेताच येत नाही. पण तरीही कॉलेजमधील मुलं आणि ईराणी चहा हे कॉम्बिनेशन आजही आठवतं आणि हवंहवंसं वाटतं. तुम्हीदेखील घरच्या घरी हा ईराणी चहा (Irani Chai) तयार करू शकता. घरी आलेले तुमचे मित्रमैत्रिणी आणि पाहुणे नक्कीच खुष होतील यात काहीच वाद नाही. पण ईराणी चहा नक्की कसा बनवायचा असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना? तर त्याचे उत्तर आमच्याकडे आहे. हा खास ईराणी चहा बनविण्याची रेसिपी आम्ही तुम्हाला सांगत आहोत.  ईराणी चहाची अत्यंत सोपी रेसिपी (Irani Chai Recipe in Marathi) खास तुमच्यासाठी. 

अधिक वाचा – प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतो दालचिनीचा चहा

आवश्यक साहित्य आणि बनविण्याची पद्धत

साहित्य 

  • 4 मोठे चमचे तुमच्या आवडती चहा पावडर 
  • 3 कुटलेली हिरवी वेलची 
  • अर्धा चमचा घट्ट क्रिम 
  • 1 दालचिनीची पावडर (अर्धा चमचा दालचिनी पावडर)
  • आवश्यकतेनुसार पाणी 
  • 2 मोठे चमचे साखर 
  • 2 कप दूध 
  • अर्धा कप कंडेंस्ड मिल्क 
  • आवश्यकतेनुसार चक्रफूल 

अधिक वाचा – चहा पिण्याचे फायदे करतील तुम्हाला आश्चर्यचकित (Tea Benefits In Marathi)

ADVERTISEMENT

बनविण्याची पद्धत 

  • ईराणी चहा तयार करणे अत्यंत सोपे आहे. पण याचा स्वाद अप्रतिम आणि जगावेगळा असतो
  • चहा बनविण्यासाठी सर्वात पहिल्यांदा सॉस पॅनमध्ये 4 कप पाणी, वेलची, दालचिनी, चहा पावडर आणि साखर मिक्स करून टाका आणि त्याला उकळी येऊ द्या 
  • जेव्हा उकळी येईल तेव्हा अॅल्युमिनिअर फॉईलने वरून झाका आणि त्यावरून झाकण ठेवा 
  • ही प्रक्रिया करताना अत्यंत काळजीपूर्वक करा. ही प्रक्रिया करून झाल्यावर तुम्ही गॅस मंद आचेवर ठेवा आणि साधारण 20-25 मिनिट्स उकळू द्या
  • ही उकळण्याची प्रक्रिया चालू असताना दुसऱ्या पॅनमध्ये दूध घाला आणि उकळी येऊ द्या आणि मग त्यात घट्ट क्रिम आणि कंडेंस्ड मिल्क मिक्स करा 
  • सर्व व्यवस्थित ढवळून घ्या आणि साधारण 20 मिनिट्स उकळवा. मधून मधून हे मिश्रण ढवळत राहा
  • आता पहिल्या पॅनमध्ये उकळून तयार झालेला चहा गाळून घ्या आणि दोन कपांमध्ये अर्धा अर्धा भरा. वरून दुसऱ्या पॅनमध्ये तयार करण्यात आलेले घट्ट क्रिमचे मिश्रण ओता. अत्यंत चविष्ट ईराणी चहा तयार. ईराणी चहाचा स्वाद हा दालचिनी आणि वेलचीमुळे अधिक चांगला लागतो. त्याशिवाय त्यामध्ये मिक्स करण्यात आलेले क्रिम एक वेगळीच चव आणते

तुम्हालाही ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ईराणी चहा बनवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबरही याची लज्जत घ्या. 

अधिक वाचा –पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी चहामध्ये टाका या तीन गोष्टी

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
10 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT