आरोग्य

सतत गवती चहा प्यायल्याने होऊ शकते हे नुकसान

Leenal Gawade  |  Sep 27, 2021
गवती चहाचे तोटे

चहा प्यायला तुम्हाला आवडत असेल तर आजचा विषय हा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा असा विषय आहे. त्यातच आरोग्यासाठी तुम्ही काही खास चहांचे सेवन करत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती फार महत्वाची आहे. खूप जण आर्युवेदीक चहा पिणे पसंत करतात. गवती चहा ही अशी वनस्पती आहे जी चहाची चव चांगलीच वाढवते. खूप जण घरी अगदी आवर्जून गवती चहा पितात. पण एखाद्या गोष्टीचा अतिरेक हा आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतो. गवती चहाचे सेवन जर तुम्ही रोज करत असाल तर त्याचे तोटे जाणून घेणे देखील गरजेचे आहे. त्यासाठीच जाणून घेऊया सतत गवती चहा पिण्याचे तोटे

हे फायदे वाचाल तर रोज प्याल ‘गवती चहा’

गवती चहा म्हणजे काय? 

Instagram

गवती चहा ही वनस्पती अगदी गवतासारखी दिसते. गवती चहा ही वनस्पती कुंडीत देखील उगवते. त्याची पाने मोडल्यानंतर त्याचा एक सुंदर सुंगध येतो. चहा केल्यानंतर त्यामध्ये एक चांगला सुगंध येतो. थंडीत किंवा हिवाळ्यात गवती चहा प्यायल्यामुळे शरीराला उर्जा मिळते. गवती चहा अगदी सहज आणि कुठेही मिळतो. त्यामुळे गवती चहा हा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी आणि पोटाचे आरोग्य चांगले करण्यासाठी गवती चहा फारच फायद्याचा ठरतो.

 गवती चहाचे तोटे

गवती चहाचे सेवन तुम्ही सतत करत असाल तर तुम्हाला साहजिकच त्याचे काही तोटे जाणवायला सुरुवात होतील. एखाद्या गोष्टीचा अतिरेक तुमच्या अवयवांवर खास परिणाम करत असतो. त्यामुळे त्याकडे मुळीच दुर्लक्ष करु नका. 

  1. गवती चहाच्या अति सेवनाचा परिणाम मोशनवर होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला जुलाब आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ लागतो. जर तुम्हाला असा त्रास होत असेल तर तुम्ही काळासाठी गवती चहापासून थोडासा ब्रेक घ्या. 
  2. गवती चहा अति प्रमाणात प्यायल्यामुळे ते शरीराला अधिक गरम पडू शकतात. त्यामुळे देखील पोटांचे अनेक विकार उद्भवण्याची शक्यता असते. 
  3.  गवती चहा हा तोंडाचे विकार उद्धवण्यास कारणीभूत ठरते. तोंड येणे किंवा जीभ फुटणे असा त्रास देखील  गवती चहामुळे जास्त प्रमाणात होऊ लागतो. 
  4. गवती चहाच्या अति सेवनामुळे शरीराला अति उर्जा मिळून शरीराला त्रास होण्याची शक्यता असते. 
  5. गवती चहाच्या अति सेवनामुळे आरोग्याच्या काही तक्रारी जाणवण्याची देखील शक्यता होऊ शकते.

गवती चहामुळे होते त्वचा होते चांगली

गवती चहामुळे त्वचाही चांगली होण्यास मदत मिळते. त्वचेसाठी जर तुम्ही गवती चहाचा उपयोग करत असाल तर त्यामुळे तुम्हाला स्पॉटलेस आणि सुंदर त्वचा मिळण्यास मदत होऊ शकते. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा त्वचेसाठी नुकसान देणारा ठरु शकतो. 

आता गवती चहाचा वापर करताना किंवा त्याचे सेवन करताना त्याचा विचार करावा.

संवेदनशील त्वचेसाठी 3 महत्त्वाचे घटक, घेतील त्वचेची काळजी

Read More From आरोग्य