Fitness

सतत खाऊ नका ओवा,संभवतील या आरोग्य तक्रारी

Leenal Gawade  |  May 5, 2021
सतत खाऊ नका ओवा,संभवतील या आरोग्य तक्रारी

 

एखादी गोष्ट आपल्याला खाण्याची सवय झाली की, ती सवय जाता जात नाही. लॉकडाऊनच्या या काळात अनेकांच्या खूप काही सवयी बदलेल्या आहेत.घरी राहून पचनाचा त्रास होऊ लागल्यामुळे अनेक वेगळे काढे, घरगुती नव नवे अघोरी उपायही खूप जणांनी केले असतील. पचनाचा त्रास होऊ लागल्यावर तुम्हाला पोट फुगल्यासारखे वाटते? सतत जेवण वर वर आल्यासारखे होत असेल आणि अशावेळी तुम्ही ओवा खाण्याचे फायदे नक्कीच आहेत. तुम्हाला काही काळासाठी फार बरे वाटते. पण उगाचच कारण नसताना ओवा खाण्याची ही सवय जर तुम्हालाही लागली असेल ओवा खाल्ल्यामुळे काही त्रास होऊ शकतात हे त्रास तुमच्या शरीरासाठी हानिकारक असून तुम्ही ही सवय आताच बंद करा.

अपचन होतंय तर करा झटपट घरगुती उपचार

ओवा खाण्यामुळे होऊ शकतात हे दुष्परिणाम

Instagram

 

 जर तुम्हाला सतत ओवा खाण्याची सवय लगली असेल तर तुम्हाला हे त्रास अगदी हमखास होऊ शकतात जाणून घेऊया दुष्परिणाम 

  1. ओवाच्या अति सेवनाचा पहिला दुष्परिणाम म्हणजे बद्धकोष्ठता. जर तुम्ही सतत ओवा खात असाल तर तुमच्या पोटात विष्ठेचे खडे होऊ लागतात. ज्यामुळे विष्ठा होण्यास खूपच अडचणी येतात. 
  2. पोटातील गॅस बाहेर काढण्याचे काम ओवा करत असले तरी देखील ओवाच्या अति सेवनामुळे पोटात गॅस होण्याची शक्यता असते. हा गॅस सतत शरीरात फिरु लागतो. त्यामुळे तुम्हाला यामुळे डोकेदुखी होण्याचा संभवही असतो. 
  3. ओव्यामध्ये Thymol नावाचा घटक असतो जो शरीरात जास्त गेला की, त्यामुळे सतत आजारी असल्यासारखे वाटत राहते. त्यामुळे कोणताही काम करण्याची इच्छादेखील होत नाही.
  4. ओवा जर अति खाल्ला तर पचनशक्ती वाढायची सोडून ती दिवसेंदिवस कमी होऊ लागते. काहीही खाल्यानंतर गळ्याकडे येत असे वाटू लागते. खूप जणांना यामुळे उलटीचा त्रास होण्याचीही शक्यता असते. 
  5. ओवा सतत खाल्यामुळे त्वचा ही अधिक  नाजूक होते.  त्यामुळे त्वचेचा कॅन्सर होण्याची शक्यता ही अधिक वाढू लागते. 

    दम्याच्या रूग्णांनी कोविड काळात विशेष काळजी घेणे आवश्यक, तज्ज्ञांचे मत

कधी करावे ओव्याचे सेवन

 

ओव्याचे सेवन हे आरोग्यासाठी लाभदायी ठरते. ज्यावेळी तुम्ही अगदी योग्य प्रमाणात त्याचे सेवन करता  त्यामुळे ओवा नेमका कसा खावा ते देखील आपण आता जाणून घेऊया. 

 उन्हाळ्यात खा सब्जा आणि वजन करा कमी

INR Buy

Read More From Fitness