नातीगोती

अपेक्षांचे ओझे वाढवू शकते नात्यातील तणाव.. तुम्ही करत नाही ना ही चूक

Leenal Gawade  |  Aug 25, 2021
नात्यातील ताण

मनुष्य हा कळपात राहणारा प्राणी आहे.हे सांगण्याचे तात्पर्य इतकेच की माणूस हा एकमेकांवर खूप अवलंबून असतो. त्याला एकट्याला राहणे शक्यच नाही. असे करताना माणूस एकमेंकावर खूप अवलंबून राहू लागतो. व्यक्ती जर तुमच्या खूप जवळची असेल तर त्या व्यक्तीवर विसंबून राहायला आपल्या सगळ्यांनाच आवडते. आयुष्यातील अगदी कोणताही निर्णय घेताना ती व्यक्ती आपल्याला कायम सोबत असावी असे वाटते.  इतकेच नाही तर त्या व्यक्तीकडून आपल्या अपेक्षाही वाढत जातात. त्याने एखादी गोष्ट आपल्याला सांगितली नाही किंवा आपल्या मनाप्रमाणे केली नाही तर त्याचे रुपांतर नात्यामध्ये तणाव येण्यापर्यंत जाते. जर ते वेळीच रोखले नाही तर अशावेळी असे नाते तुटायलाही वेळ लागत नाही. नात्यात तुम्हीही अशी चूक करत असाल तर वेळीच सावध होणे केव्हाही चांगले. तुम्ही ही चूक करत असाल तर आताच काही गोष्टी मनाशी ठरवा

सासूमुळे घरात होत असतील वाद तर करा स्वतःला असे शांत, सोप्या टिप्स

आपली किंमत ओळखा

कोणत्याही नात्यात त्या व्यक्तीसाठी आपली असलेली किंमत जाणून गेणे फारच गरजेचे असते. जर एखादी व्यक्ती तुमच्या सगळ्या गोष्टीला विरोध करत असेल तर तुम्हाला तुमची किंमत ओळखता यायला हवी. ज्या ठिकाणी तुम्हाला असे वाटत असेल की आपल्या असण्या नसण्याचा या व्यक्तीला काहीही फरक पडत नसेल तर तुम्ही देखील त्या व्यक्तीसोबत जास्त वेळ घालवणे बंद करा. कारण त्यामुळे तुमची किंमत त्यालाही कळेल. तुमचे नसणे त्या व्यक्तीला जाणवून देणे गरजेचे असते. यासाठी तुम्ही जेवढा कमी वेळ या व्यक्तीसोबत घालवता येईल तेवढा कमी वेळ तुम्ही त्या व्यक्तीसोबत घालवा. म्हणजे तुमची किंमतही राखली जाईल.

 बोलणे कमी करा

कधी कधी एखाद्यासोबत आपली इतकी चांगली ट्युनिंग होते की आपण त्या व्यक्तीसोबत बराच वेळ घालवण्यास तयार होतो. एखाद्या व्यक्तीला सतत फोन करणे किंवा बोलत राहणे यामुळे त्यालाही कंटाळा येतो. विषय असे काही राहात नाही. त्या व्यक्तीसोबत काही क्षुल्लक शाब्दिक वादावादी होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीवर तुम्ही मनापासून प्रेम करत असाल तर त्याच्यावर सतत बोलण्याची अपेक्षा अजिबात करु नका. त्याला आणि तुम्हालाही थोडासा वेळ घ्या. म्हणजे तुम्हालाही थोडासा वेळ नक्कीच मिळेल. 

का कोणावर अवलंबून राहा

Instagram

एखादी व्यक्ती म्हणून जन्माला आल्यानंतर तुम्हाला दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची काहीही गरज नाही.  जर तुम्ही एखाद्यावर सतत अवलंबून राहात असाल तर एकमेंकावर अवलंबून राहण्याची सवय लागून राहते. त्यामुळे सगळ्यात आधी एकमेकांवर अवलंबून राहण्याची सवय सोडून द्या. जर एकमेंकावर अवलंबून राहात असाल तर दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची सवय लागते. एक प्रकारे तुमची अपेक्षा वाढू लागते. त्यामुळे हे अपेक्षांचे ओझे दुसऱ्यावर लादणे सोडून द्या. 

तुमच्या दुसऱ्यांकडू असलेल्या अपेक्षा या तुमच्यासाठी त्रासदायक ठरु शकतात. त्यामुळे तुम्ही अपेक्षांचे ओझे वाढवू नका त्यामुळे नात्यात ताण येऊ शकतो. त्यापेक्षा थोडी मोकळीक द्या म्हणजे तुम्हालाही त्याचा त्रास होणार नाही.

आयुष्याच्या कठीण काळात असा राखा संयम, नक्कीच बदलेल काळ

Read More From नातीगोती