ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
toxic relationship

सासूमुळे घरात होत असतील वाद तर करा स्वतःला असे शांत, सोप्या टिप्स

संसार म्हटला की, भांड्याला भांडे लागणारच आणि सासू सुनेचं नातं म्हटलं की, त्याकडे कधी चांगल्या नजरेने पाहिलं जाणं जरा कठीणच आहे. घराघरातील तीच परिस्थिती आहे. एकवेळ मुलगा आणि मुलीची पत्रिका जुळते की नाही ते पाहण्यापेक्षा सासू आणि सुनेची पत्रिका जुळते का ते पाहणं आपल्याकडे गरजेचे आहे असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही. बऱ्याच घरांमध्ये लग्न झाल्या झाल्या एक वर्षात सासूशी भांडण आणि वाद होत असल्यामुळे वेगळं झाल्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे पाहायला मिळतात. तर काही जणी समाजामध्ये काय बोलतील या भीतीने सासूचे टोमणे आणि त्रास सहन करत तशाच राहतात. पण तुम्हालाही लग्न झाल्यानंतर सासूबरोबर राहताना स्वतःला शांत ठेवायचे असेल तर तुम्ही लग्नाआधीपासूनच मनाशी काही गोष्टी नक्की करून घ्या. या टिप्स तुम्ही ठरवल्यात आणि त्याप्रमाणे तुम्ही वागलात तर नक्कीच तुम्हाला सासूमुळे घरात वाद झाले तरीही त्रास करून घेणे जरा कमी होईल. 

स्वतःच्या बाजूने ठामपणे उभे राहा 

तुमच्या आयुष्यात लग्न झाल्यानंतर अशी वेळ कितीतरी वेळा येऊ शकते जिथे तुम्हाला सासूला न विचारता काही निर्णय परस्पर घ्यावे लागतील. अशा स्थितीत तुम्ही सासूला घाबरून अथवा पुढे काय होईल याचा विचार करून गप्प बसू नका. तुम्ही अत्यंत सौम्यपणे परिणामांसह नक्की परिस्थिती काय होती हे ठामपणाने मांडायला शिका. उलटून न बोलता अत्यंत शांतपणाने व्यवस्थित सविस्तरपणे आपली बाजू मांडणे आणि स्वतःच्या बाजून ठामपणे उभे राहायला शिका. तुम्ही शांत राहिलात तर सासूलादेखील शांत राहणे भाग आहे. त्यामुळे नाहक होणारा वाद टळतो. 

घरातल्या गोष्टी घरातच ठेवा 

Freepik

बऱ्याचदा आपली सासू आपल्यासमोरच कोणाहीसमोर घालून पाडून बोलते अथवा अपमान करते असा अनुभव तुम्हाला आला असेल तरीही त्यावेळी कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळा. तुम्हाला शक्य असेल तर सासरच्या अशा काही माणसांपासून दोन हात लांबच राहा आणि आपल्या गोष्टी आपल्यापुरत्या मर्यादित ठेवा. सासूबद्दल कोणताही अपशब्द कोणाकडेही बोलू नका. तुम्ही असे वागाल तेव्हाच सासूला तुम्हाला तिच्या बोलण्याने काहीच फरक पडत नाही याची जाणीव होईल आणि ती आपोआपच तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागेल. कारण सुनेने दुर्लक्ष केलं तरच या गोष्टींमधील वाद थांबू शकतो. 

अधिक वाचा – नाते दृढ करणाऱ्या या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहीत हव्यात

ADVERTISEMENT

नवऱ्याबरोबर नात्यात वितुष्ट येऊ देऊ नका 

couple
Shutterstock

आपली सासू आपल्याबरोबर कशी वागते हे तुमच्या नवऱ्याला माहीत असेलही वा नसलेही. पण तुम्ही जे काही घडलं आहे हे एकदा शांतपणे बसून त्यांना सांगणे गरजेचे आहे. पण तुमच्याशी जर तुमचा सहमत नसेल तर तुम्ही चिडचिड करू नका. ती त्याची आई असल्यामुळे तुमची प्रत्येक गोष्ट ऐकणं शक्य नाही. पण याचा अर्थ त्याच्यासह नात्यात वितुष्ट येईल असे वागू नका. कारण त्यामुळे तुम्हालाच अधिक त्रास होणार आहे हे लक्षात घ्या. पण असे जरी असेल तर नवऱ्याला त्याच्या आईची चूक लक्षात येईल हे चांगुलपणाने तुम्ही नक्कीच दाखवून देऊ शकता. 

अधिक वाचा – लॉकडाऊनमध्ये सासू-सुनेतील वाद टाळण्यासाठी करून पाहा हे उपाय

हसून द्या योग्य उत्तर 

काही सासू अशा असतात ज्यांना आपल्या सुनेच्या माहेरच्या लोकांबद्दल बोलायची खूपच खोड असते. असे ऐकल्यानंतर सुनेला राग येणे साहजिक आहे. पण तोंड वेडेवाकडे करून अथवा भांडून बोलण्यापेक्षा तुम्ही हसत हसतच त्या गोष्टीला उलट उत्तर कसं देता येईल हे शिकून घ्या. खेळकर वातारवण ठेऊनच तशीच उत्तरे द्यावीत आणि समोरच्याचे तोंड बंद करावे याची काळजी घ्या. तसंच तुम्हाला एखाद्या गोष्टीने मनाला वाईट असेल अथवा तुमच्या मागे तुमच्याबद्दल कोणालाही काही सांगण्यात येत असेल आणि तुम्हाला ते कळले तर सरळ एकदाच समोर जाऊन शांतपणे त्याबाबत सांगावे. या गोष्टी नमूद कराव्यात. पण तुमचे नाते घरात कसेही असेल तरीही दुनियेसमोर मात्र ते दाखवून देऊ नका. कोणत्याही कार्यक्रमात गेल्यानंतर सासूशी वाईट वर्तणूक करू नये. कारण तसे केल्यास, तुम्ही समजदार नाही असाच गैरसमज समाजात होतो. 

कोणत्याही घरात सासू आणि सुनेच्या वादाने अत्यंत गंभीर रूप घेतले तर तुम्ही घाबरून जाऊ नका. अन्याय सहन करणे हे चुकीचे आहे. तुम्हालाा मानसिक अथवा शारीरिक त्रास होत असेल तर तुम्ही त्वरीत हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून हिंसेविरूद्ध नक्की आवाज उठवा. यासाठी अनेकजण मदतीसाठी उपलब्ध असतात. त्यामध्ये सेंट्रल सोशल वेल्फेअर बोर्ड, पोलीस हेल्पलाईन, विविध एनजीओ यांचाही समावेश आहे. लक्षात घ्या आपल्या देशात जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा दिल्याही जातात आणि साजराही केला जातो. त्यामुळे वेळीच मदत घ्या आणि सक्षम राहा.

ADVERTISEMENT

अधिक वाचा – सासू- सुनेत दुरावा आणतात या गोष्टी

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

09 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT