Festival

पापांकुशा एकादशीचे महत्व घ्या जाणून, असा केला जातो पूजा विधी

Leenal Gawade  |  Oct 26, 2020
पापांकुशा एकादशीचे महत्व घ्या जाणून, असा केला जातो पूजा विधी

अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला ‘पापांकुशा एकादशी’ असे म्हटले जाते. कॅलेंडर जर तुम्ही कधी नीट निरखून पाहिले असेल तर तुमच्या नजरेखालून ही एकादशी नक्कीच गेली असेल. पण तुम्हाला या एकादशीबद्दल नेमकी काय माहिती आहे? जसं आपल्याकडे गोकुळाष्टमी माहिती आणि जन्माष्टमी शुभेच्छा दिल्या जातात. तसंच ही एकादशी साजरी केली जाते का? या एकादशीचे महत्व काय? याचा पूजाविधी काय यासंदर्भात आपण आज अधिक माहिती घेऊयात. यासोबतच या एकादशीचे पुराणातील महत्व देखील जाणून घेऊया. चला तर करुया सुरुवात आणि जाणून घेऊया पापांकुशा एकादशीविषयी सर्वकाही..

धनत्रयोदशी साजरी करण्यामागील कथा आणि पूजा विधी

पापांकुशा म्हणजे काय?

Instagram

नवरात्रीच्या प्रमुख व्रतांमध्ये पौर्णिमा,अमावस्या आणि एकादशी अशा व्रतांना फार महत्व आहे. खरंतरं प्रत्येक एकादशीचे काहीना काही महत्व असते. पण पापांकुशा एकादशी ही स्वत: सोबतच दुसऱ्याच्या आयुष्यासाठीही फारच लाभदायी असते. पापांकुशा एकादशी ही पापांचा नाश करत त्याचे प्रायश्चित करायची एक संधी आपल्याला देते.यंदा ही एकादशी 27 ऑक्टोबर अर्थात (मंगळवारी) आली आहे. त्यामुळे तुमच्या पापांचा विनाश करणारी ही पापांकुशा एकादशी तुम्ही नक्की करायला हवी. जाणून घेऊया या एकादशीचा पूजा विधी. अगदी घरीच राहून तुम्हाला नेमके काय करायला  हवे ते देखील जाणून घेऊया.

महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अशी करा ‘महाशिवरात्री’ पूजा आणि उपवास

असा असतो या एकादशीचा पूजाविधी

Instagram

अश्विन शुक्ल पक्षात येणाऱ्या या एकादशीचा प्रारंभ यंदा 26 ऑक्टोबर 2020 सकाळी 9 वाजल्यापासून झाला आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजून 47 मिनिटांनी त्याची समाप्ती होणार आहे. पण तरीही ही एकादशी आजच्या दिवशी म्हणजेच 27 ऑक्टोबरला करण्यास काहीच हरकत नाहीत. आज सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन प्रहरी तुम्ही विष्णू देवाच्या पद्मनाभ स्वरुप मूर्तीची किंवा फोटोची पूजा करा. कपाळावर गोपी चंदनाचा टिळा लावून  देवाला पंचामृत, फूलं आणि फळं अर्पित करा. तुम्ही यादिवशी उपवास करणार असाल तर सात्विक असे फळ म्हणजे केळं याचं सेवन करा. आरती आणि पूजाविधी उरकल्यानंतरच तुम्ही केळं खा. या दिवशी अन्नदान करणे देखील शुभ मानले जाते. 

महाशिवरात्रीनिमित्त शिवशंकराबाबत जाणून घ्या ‘या’ रहस्यमय गोष्टी

पापाकुंशा एकादशी संदर्भातील आख्यायिका

पापांकुशा एकादशी व्रत हे खुद्द भगवान विष्णूंनी सांगितलेले व्रत आहे. ब्रम्हांड पुराणात याचा फार विस्तृत असा उल्लेख करण्यात आला आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते.  असे म्हणतात की, स्वत: भगवान विष्णू यांनी पापांकुशा एकादशी व्रताचे महत्व सांगितले होते. त्यांनी युद्धिष्ठिरला अश्विन शुक्ल पक्ष एकादशी संदर्भात सांगितले होते. ही एकादशी पापांचे हरण करणारी आहे. या जगात जो कोणी या एकादशीला उपवास करेल आणि भक्तिभावे पूजा करेल त्या मोक्ष, अर्थ, काम या तिघांची प्राप्ती होईल. शिवाय हे व्रत केल्यामुळे पापांचे उच्चाटन होईल. त्यामुळेच  अनेक ठिकाणी ही एकादशी पाळली जाते. या एकादशीला मनोभावे पूजा करत  पापांचा समूळ नाश केला जातो. 

आता पापांकुशा एकादशीचे महत्व  जाणून घेतल्यानंतर तुम्ही ही नक्की करा ही एकादशी!

Read More From Festival