मनोरंजन

सहा वर्षांच्या नात्यानंतर ‘पवित्र रिश्ता’फेम या जोडीचे झाले ब्रेकअप, चाहत्यांना धक्का

Dipali Naphade  |  Apr 16, 2020
सहा वर्षांच्या नात्यानंतर ‘पवित्र रिश्ता’फेम या जोडीचे झाले ब्रेकअप, चाहत्यांना धक्का

‘पवित्र रिश्ता’ ही मालिका आजही प्रेक्षक विसरले नाहीत. यातील सुशांत सिंह राजपूत, अंकिता लोखंडे, ऋत्विक धनजानी, आशा नेगी या चारही कलाकारांना प्रेक्षकांनी अक्षरशः भरभरून प्रेम दिले. या दोन्ही जोड्या खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात होत्या. हो होत्या असंच म्हणावं लागेल. कारण सुशांत आणि अंकिताची प्रेमकहाणी तर सर्वांनाच माहीत आहे. सहा वर्षांच्या नात्यानंतर हे दोघेही विभक्त झाले आणि आता अंकिता विकी जैन या तिच्या प्रियकरासह लवकरच लग्न करणार असून सुशांत सिंह राजपूतदेखील रिया चक्रवर्तीसह नात्यात असल्याची चर्चा आहे. मात्र आता चाहत्यांना दुसरा धक्का बसणार आहे तो म्हणजे गेल्या सहा वर्षांपासून नात्यात असलेल्या ऋत्विक धनजानी आणि आशा नेगी या दोघांंनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. सहा वर्षांचे त्यांचे हे नाते त्यांनी अखेर संपवले असून याबाबत त्यांच्या जवळच्या व्यक्तींना आधीपासूनच माहीत असल्याचे सुत्रांकडून कळत आहे. 

सलमानच्या आयुष्यातील Unknown फॅक्टसचा सलमान करणार उलगडा

गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये आला होता दुरावा

ऋत्विक आणि आशा हे दोघेही गेले कितीतरी वर्ष एकत्र होते.  इतकेच नाही तर दोघे एकत्र राहातही होते. दोघांचे एकमेकांवर अतिशय  प्रेम असून त्यांनी नेहमीच आपले प्रेम अगदी सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही स्वीकारले होते.  मात्र गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या नात्यात दुरावा आला असल्याची आता चर्चा सुरू झाली आहे. दोघांच्या नात्यामध्ये कोणत्याही गोष्टी नीट नसून दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय एकमताने घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. या  गोष्टीला आता एक महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला असून या दोघांच्याही जवळच्या व्यक्तींना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे. मिळालेल्या माहितीनुसार आशा नेगी आणि ऋत्विक हे लिव्ह इन मध्ये होते. पण आता ऋत्विकने ते घर सोडलं असल्याचेही कळले आहे. ऋत्विक स्पेनला जाण्याच्या आधीच दोघांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. 

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नवऱ्याला कोरोनाची लागण, मात्र रुग्णालयात करून घेतले नाही दाखल

मागच्या वर्षी लग्न करणार असल्याची होती बातमी

मागच्या वर्षी ही जोडी लग्न करणार असल्याच्या अफवांना ऊत आला होता.  मात्र याविषयी दोघांनीही नकार दिला होता. आशा नेगी ही ऋत्विकच्या आई – वडिलांशीही खूपच जवळ आहे. या दोघांमध्ये नेहमीच प्रेम दिसून आले होते.  दोघेही नेहमी एकमेकांची काळजी घेताना दिसून यायचे. पण नेमके या दोघांमध्ये काय बिनसले आहे याची अजून माहिती मिळालेली नाही. ऋत्विक आणि आशा दोघांनीही या मालिकेतून सुरूवात केली आणि चित्रीकरणाच्या दरम्यान दोघे एकमेकांवर प्रेम करू लागले. दोघांनीही कधीही आपले प्रेम नाकारले नाही. पण आता सहा वर्षांनंतर नेमके असे काय  घडले की दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना सतावत असून चाहत्यांनाही धक्का बसला आहे. सध्या दोघेही आपापल्या करिकरकडे लक्ष केंद्रीत करत असल्याचे म्हटले जात आहे. यावर दोघेही आता जेव्हा भाष्य करतील तेव्हाच सर्व काही कळेल अथवा दोघेही काही भाष्य करणार आहेत का याकडेही त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले  आहे. दरम्यान आशा बालाजीच्या वेबसिरीजमध्ये शरमन जोशीबरोबर दिसली होती. तर ऋत्विक अनेक शो चे निवेदन करताना दिसून येतो. 

रामायणमधील ‘लवकुश’ सध्या काय करतात, कुश आहे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता

 

Read More From मनोरंजन