रेसिपी

चहा चांगला होत नाही, मग ट्राय करा या चहाच्या फक्कड रेसिपी

Leenal Gawade  |  Jul 7, 2022
असा बनवा फक्कड चहा

सध्या वातावरण इतके मस्त थंड आहे ना की, अशा वातावरणात मस्त मस्त रेसिपी करुन खाव्याशा वाटतात. कुरकुरीत कांदा भजी, चिकनच्या रेसिपी, कोळंबी रेसिपी, मका रेसिपी अशा वेगवेगळ्या रेसिपी करुन पाहिल्या जातात. पण या सगळ्यांपेक्षाही चहाप्रेमींसाठी चहा हा फारच महत्वाचा असतो. या पावसात मस्त चहा असेल तर या  ‘ताजा हो ले’ या प्रमाणे तरतरीत झाल्यासारखे वाटते. खूप जणांना आजच्या घडीलाही चहा (Tea Recipe) बनवता येत नाही. चहाची रेसिपी गंडते. अशावेळी परफेक्ट असा चहा बनवायचा असेल तर काही सोप्या रेसिपीज तुम्ही ट्राय करायला हव्यात. चला चहाची परफेक्ट रेसिपी घेऊया जाणून

दुधाचा चहा

दुधाचा चहा

खूप जण घरात चहा करताना प्युअर दुधाचा वापर करतात. म्हणजे या चहामध्ये अजिबात पाणी जात नाही. असा चहा हा खूप रिच बनतो. जर तुम्हाला असा चहा प्यायचा असेल तर तुम्ही असा चहा बनवू शकता. 

  1. एका पातेतलीत दूध गरम करायला ठेवा. त्यामध्ये आवडीनुसार साखर घालून दुधाला जरा आदाण आले की, त्यामध्ये तुम्ही चहापावडर घाला. 
  2. हल्ली अनेक चहापावडरमध्ये मसाला असतो. जर तुमची चहाची पत्ती एकदम कडक असेल तर अशा चहामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार आलं घातलं तरी चालू शकेल. 
  3. आलं कधीही थंड दुधात घालू नका. कारण त्यामुळे दूध फाटण्याची शक्यता असते.

पाणी- दुधाचा चहा

आपल्या घरात अगदी रोज बनवला जातो तो चहा म्हणजे पाण्यात केला जाणारा चहा. खूप जणांना दुधाचा चहा फारसा आवडत नाही. अशांना एकदम कडक असा चहा लागतो. त्यामुळे तुम्ही पाणी आणि दुधाचा मस्त चहा बनवा. 

  1. पातेलीत पाणी गरम करुन त्यामध्ये किसलेलं आलं, वेलची पूड, साखर घालून एक उकळ काढा. 
  2. नंतर त्यामध्ये चहा पावडर घालून त्याला चांगली उकळी आणा. चहा चांगला उकळला की, मग त्यामध्ये दूध घालून पुन्हा चहाला आदाण आणा. 
  3. असे करताना दूध गरम असेल तर उत्तम. म्हणजे चहा पटकन होण्यास मदत मिळते. 

मसालेदार चहा

मसालेदार चहा

खूप जणांना मस्त कडक असा मसालेदार चहा आवडतो. तुम्हीही त्यापैकीच एक असाल तर तुम्हाला या दिवसात मस्त मसाला चहा मिळायलाच हवा. नाही का? 

  1. मसाला चहा आताच्या काळात करणे फार सोेपे आहे. कार हल्ली मसाला पावडर रेडिमेड मिळते.  त्यामुळ त्याचे प्रमाण चुकेल असे काही नसते. 
  2. पातेलीत दूध किंवा पाणी गरम करुन त्यामध्ये चहा पावडर, साखर आणि आवश्यक इतका चहा मसाला घालून चहा चांगला उकळा. या चहाची चव खूपच मस्त लागते. 
  3. या चहासोबत तुम्हाला काही बुडवून खाता येत नाही. हा चहा फक्त पिण्यासाठी असतो. 

आता चहा बनवताना या काही रेसिपी नक्की फॉलो करा आणि तुमची बेस्ट रेसिपी कोणती? ते देखील आम्हाला सांगा. 

Read More From रेसिपी