Destination Weddings

उन्हाळ्यात डेस्टिनेशन वेडिंगसाठी निवडा ही थंड हवेची ठिकाणं

Trupti Paradkar  |  Apr 11, 2022
उन्हाळ्यात डेस्टिनेशन वेडिंगसाठी निवडा ही थंड हवेची ठिकाणं

लग्नसोहळे बऱ्याचदा एप्रिल, मे मध्ये आयोजित केले जातात. कारण या काळात लहान मुलांच्या शाळांना सुट्टी असते. मित्र परिवारासोबत एखादा सोहळ्याचा आनंद घेण्याचा हा चांगला काळ असतो. मात्र या काळात मुंबईत उकाडा खूप असतो. शिवाय आजकालचा जमाना हा डेस्टिनेशन वेडिंगचा आहे. त्यामुळे लग्नसोहळा आयोजित करण्यासाठी तुम्हाला हवं ते ठिकाण तुम्ही निवडू शकता. जर उन्हाळ्यात लग्नासाठी एखादं हिल स्टेशन निवडलं तर तुमचा सोहळा बेस्ट होतोच, शिवाय कुटुंब आणि मित्रपरिवासोबत वेकेशनचा आनंदही घेता येतो. यासाठी उन्हाळ्यात लग्नाचा बेत आखत असाल तर निवडा ही थंड हवेची ठिकाणे… यासोबतच वाचा डेस्टिनेशन वेडिंगसाठी महाराष्ट्रातील ही ’10’ ठिकाणं आहेत परफेक्ट (Destination Wedding Places In Maharashtra In Marathi)

महाबळेश्नर – पाचगणी 

महाराष्ट्रातील महाबळेश्वर आणि पाचगणी ही दोन थंड हवेची ठिकाणं प्रसिद्ध आहेत. त्यामुळे वेस्टर्न घाटात लग्नाचा बेत आखत असाल तर महाबळेश्वर अथवा पाचगणीच्या एखाद्या हॉटेल अथवा रिसॉर्टची निवड करू शकता. महाराष्ट्रात असल्याने पुण्या-मुंबईच्या लोकांसाठी हे ठिकाण जास्त दूर नाही. त्यामुळे तुमचे पाहुणे नक्कीच या ठिकाणी येण्यासाठी पटकन तयार होतील. शिवाय थंड हवामानात आणि निसर्गरम्य ठिकाणी लग्नसोहळ्याचा आनंद घेणं एक छान अनुभव राहिल.

शिमला

उन्हाळा सुरू होताच कुल्लुमनाली, शिमला अशा थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा बेत आखला जातो. मात्र सिमला तुमच्या मुलांच्या लग्नासाठीही एक उत्तम ठिकाण आहे. भारताच्या क्वीन ऑफ हिल्सची निवड तुम्ही घरातील डेस्टिनेशन वेडिंगसाठी करू शकता. या ठिकाणी असलेले वेडिंग वेन्यूवर तुम्हाला निसर्गाचा मनसोक्त आनंद घेता येतो. शिवाय लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांचे लग्नासोबत छान वेकेशनही होते.

मसूरी 

सिमला प्रमाणेच मसूरीदेखील एक प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आहे. त्यामुळे इथलं मनमोहक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी तुम्ही मसूरीमध्ये लग्नाचा घाट घालू शकता. मसूरीमध्ये लग्नसोहळा आयोजित करण्यासाठी तुम्हाला सुंदर आणि रॉयल रिसॉर्ट उपलब्ध असतात. डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या मसूरीमध्ये लग्न करण्याचा अनुभव अगदी वेगळाच असू शकतो. 

ऋषीकेश

गंगा नदीच्या किनारी वसलेलं ऋषीकेश उन्हाळ्यात फिरण्यासाठी अनेकांचं फेव्हरेट आहे. डेस्टिनेशन वेडिंगसाठीही तुम्ही ऋषीकेशची निवड करू शकता. या ठिकाणी धार्मिक वातावरण असल्यामुळे तुम्हाला अगदी पारंपरिक पद्धतीने लग्नसोहळा आयोजित करता येईल. डेस्टिनेशन वेडिंगसाठी तुम्हाला या ठिकाणी अनेक हॉटेल्स अथवा रिसॉर्ट मिळतील.

दार्जिलिंग 

उन्हाळा आणि दार्जिलिंग एक छान कॉम्बिनेशन आहे. कारण या ठिकाणी वातावरण नेहमीच आल्हाददायक असतं. छान वातावरणात आणि कमी लोकांच्या उपस्थितीत तुम्हाला लग्नसोहळा करायचा असेल तर तुम्ही दार्जिलिंगची निवड करू शकता. मात्र इथे अगदी कमी जागेत दाटीवाटीने हॉटेल्स असल्याने जास्त लोकांसह लग्नाचा घाट घालणं थोडं कठीण आहे. मात्र इथलं वातावरण लग्नसोहळ्यासाठी अविस्मरणीय नक्कीच ठरू शकतं. 

Read More From Destination Weddings