भविष्य

मेष राशींच्या व्यक्ती असतात तरी कशा, जाणून घ्या वैशिष्ट्य

Dipali Naphade  |  Sep 12, 2020
मेष राशींच्या व्यक्ती असतात तरी कशा, जाणून घ्या वैशिष्ट्य

महिन्यानुसार 21 मार्च ते 19 एप्रिलदरम्यान जन्म झालेल्या व्यक्तींची रास मेष आहे असं मानलं जातं. मात्र ही रास इंग्रजी महिन्यानुसार असते. तुमच्या पत्रिकेनुसार तुमची रास मेष असू शकते. मेष ही रास अग्नीची रास आहे. त्यामुळे साहस, नेतृत्व आणि क्रोध या तिन्ही गोष्टींचा संगम या राशीमध्ये दिसून येतो. तुमच्या जवळच्या व्यक्तींपैकी कोणी मेष राशीचे असतील तर त्यांचा नक्की स्वभाव कसा आणि त्यांची काय वैशिष्ट्य आहेत हे एकदा आम्ही दिले आहे त्याप्रमाणे आहे की नाही ते पडताळून नक्की पाहा. प्रत्येकाला माणूस कसा आहे आणि त्याचा स्वभाव कसा आहे जाणून घ्यायची इच्छा नक्कीच असते आणि आपल्याकडे राशीवरून माणसांची परीक्षा नक्कीच करता येते. मेष राशीच्या व्यक्तींची नक्की काय वैशिष्ट्य आहेत आणि या व्यक्तींचा स्वभाव कसा आहे ते आपण या लेखातून जाणून घेऊया. 

मार्च महिन्यात जन्म घेणाऱ्या व्यक्ती कशाअसतात, जाणून घ्या

मेष राशीच्या व्यक्ती नक्की कशा असतात (Aries sign people Positive and Negative Characteristics in Marathi)

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक माणसाच्या जन्म, महिना आणि वर्षानुसार त्याचा स्वभाव आणि इतर वैशिष्ट्य ही अवलंबून असतात. त्याच आधारावर त्याचा स्वभावही आपल्याला सांगता येतो. आपण या लेखातून मेष राशींच्या व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत. 

या राशीच्या व्यक्ती असतात धडाकेबाज, कोणत्याही गोष्टीला घाबरत नाहीत

भाग्यशाली क्रमांक – 9, 36, 13, 69, 53, 67

राशी स्वामी – मंगळ

भाग्यशाली रंग – मंगळ असल्यामुळे भाग्यशाली रंग लाल आहे. लाल रंग आपल्यामध्ये एक वेगळी शक्ती निर्माण करून आत्मविश्वास देतो. त्याचप्रमाणे या व्यक्तींसाठी पांढरा, लेमन ग्रीन अथवा हिरवा रंगही लाभदायक आहे. 

भाग्यशाली दिवस – मंगळवार, गुरूवार आणि रविवार

भाग्यशाली खडा – पोवळे 

बॉलीवूड सेलिब्रिटी ज्यांची रास आहे मेष – राणी मुखर्जी, अजय देवगण, कंगना राणौत, इमरान हाश्मी, लारा दत्ता, जितेंद्र, अक्षय खन्ना, जितेंद्र, जयप्रदा

जन्मभर एकमेकांना साथ देतात ‘या’ चार राशीच्या व्यक्ती

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक 

 

Read More From भविष्य