ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तीत्व हे एकमेकांपेक्षा वेगळं असते. वेगवेगळ्या दिवशी जन्म घेणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव हा एकमेकांपेक्षा वेगळा असतो. आपण या लेखातून सोमवारी जन्म घेतलेल्या व्यक्तींबाबत जाणून घेणार आहोत. सोमवारी जन्म घेतलेल्या व्यक्तींचा स्वभाव, शारीरिक संरचना, व्यवसाय आणि त्यांचे क्षेत्र, आरोग्य, करिअर कसे असते याबाबत अधिक माहिती तुम्ही जाणून घ्या.
सोमवारी जन्म घेतलेल्या व्यक्तींचा स्वभाव
ज्या व्यक्तींचा जन्म सोमवारी झाला आहे, त्यांची इंग्रजी भाषेवर अधिक चांगली पकड असते. अशा व्यक्ती सहसा वेगवेगळ्या विषयांवर बोलू शकतात. या व्यक्तींचे विचार हे अस्थिर असतात. तसंच महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी त्यांना बराच विचार करण्याची गरज असते. तर दुसऱ्यांचे सल्ले त्यांना अधिक प्रमाणात प्रभावित करतात.
ज्योतिषशास्त्रानुसार,सोमवार हा चंद्राचा दिवस मानला जातो. ज्याचा अर्थ या व्यक्तींचा स्वामी हा चंद्र आहे. त्यामुळे चंद्राचा अधिक प्रभाव या दिवशी जन्म घेतलेल्या लोकांवर असतो. अंक ज्योतिषशास्त्रानुसार, सोमवारी जन्म घेतलेल्या व्यक्तींवर 2 भाग्यांक असणाऱ्या व्यक्तांचा अधिक प्रभाव दिसून येतो. तसंच या व्यक्तींचा रंग हा गोरा आणि डोळे अत्यंत सुंदर असतात. आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये या व्यक्ती अधिक लोकप्रिय असतात, कारण या व्यक्ती अधिक दयाळू आणि सतत हसतमुख असतात.
हैराण करणारे व्यक्तीत्व
सोमवारी जन्म घेणाऱ्या व्यक्ती या भावनात्म स्वरूपात अधिक उग्र असतात आणि त्या चंचल असतात. ज्याप्रमाणे या व्यक्तींचा चंद्र बदलतो त्याप्रमाणे या व्यक्तींचा मूड बदलत राहातो. त्यामुळे कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेणे हे सोपे नसते. मात्र या व्यक्ती बऱ्याचदा शांत डोक्याने निर्णय घेतात. सर्वांसह मैत्रीपूर्ण संबंध जपणे यांच्यासाठी महत्त्वाचे असते. यांच्या मनात वेगवेगळे विचार असतात, पण ते विचार व्यक्त करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याची गरज असते. सोमवारी जन्म झालेल्या व्यक्ती या अंतर्मुखी असतात आणि घरात अधिक काळ वेळ घालविण्यात यांना आनंद मिळतो. तसंच या दिवशी जन्म झालेल्या पुरूषांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या महिलांशी हे अधिक भावनिकरित्या जोडलेले असतात.
कसे असते यांचे करिअर
सोमवारी जन्म झालेल्या व्यक्ती या आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करतात कारण त्यांना करिअरमध्ये एक उंची गाठायची असते. तसंच एका ठराविक वेळेत त्यांना आपल्या करिअरमध्ये गोष्टी प्राप्त करायच्या असतात. सोमवारी जन्म घेतलेल्या व्यक्ती या आपल्या कामात सन्मान प्राप्त व्हावा आणि आपल्याला कायम प्रशंसा मिळावी याच पद्धतीने काम करतात. या व्यक्तींना हक्क गाजवायला आवडत नाही आणि ज्या व्यक्ती हक्क गाजवतात त्या व्यक्ती यांना आवडत नाहीत. सोमवारी जन्म घेतलेल्या व्यक्तींना लोकांची मदत करायला आवडते, त्यामुळे हॉस्पिटल, अकॅडमिक सेंटर अथवा कला अशा क्षेत्रात या व्यक्ती आपले करिअर करतात. याशिवाय पाण्याशी संबंधित उद्योग अर्थात जलआपूर्ती, मस्त्य व्यवसाय, दूध उत्पादन या व्यवसायतही या व्यक्ती पुढे जातात.
सोमवारी जन्म झालेल्या व्यक्तींना आयुष्यात यश मिळण्यासाठी काय करायला हवे
सोमवारी जन्म झालेल्या व्यक्तींनी आयुष्यात यश मिळविण्यासाठी या काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यावे. तुम्ही हे उपाय केल्यास, तुम्हाला नक्की यश मिळू शकते
- आपल्या मूड स्विंग्जना नियंत्रित करण्यासाठी तुम्ही मेडिटेशन अथवा योगा करणे सुरू करायला हवे
- जिथे नकारात्मक विचार तुम्हाला त्रासदायक ठरतात, तिथे जाणे सहसा टाळावे
- आपण केंद्रित केलेल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी तुम्ही तुमचे लहानलहान लक्ष्य पूर्ण करावे
- एकाच दिवशी अनेक कामं करायची असतील तर तुम्ही त्याचे व्यवस्थित नियोजन करावे
- सोमवारच्या दिवशी तुम्ही गरजू लोकांना जेवण द्यावे आणि भगवान शंकराची पूजा करावी
- घरात अथवा घराबाहेर कधीही पाण्याचा अपव्यय करू नका
सोमवारच्या दिवशी जन्म घेतलेल्या व्यक्ती या बऱ्यापैकी समान स्वभावाच्या असतात. त्यामुळे तुमचाही जन्म सोमवारी झाला असेल तर तुम्ही या लेखाशी तुमच्या स्वभावाचे साधर्म्य आहे की नाही ते नक्की पाहून घ्या.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade