घर आणि बगीचा

घरात ही झाडे लावलीत तर लवकरच चाखायला मिळतील फळे

Vaidehi Raje  |  May 20, 2022
fast growing trees

पर्यावरणासाठी तर झाडे आवश्यकच आहेत, पण आपल्या घराच्या आजूबाजूला भरपूर झाडे असतील तर आपल्याला थंड ,ताजी व शुद्ध हवा मिळते. झाडे त्यांच्या सभोवतालचे वातावरण ताजेतवाने ठेवतात आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करतात. याशिवाय त्यावरील फळे आपल्याला निरोगी ठेवतात. रोज ताजी फळे खाल्ल्याने आपण अनेक गंभीर आजारांपासून दूर राहू शकतो. जर तुम्हाला बागकामाची आवड असेल आणि तुम्ही काही नवीन झाडे लावण्याचा विचार करत असाल तर ही फळझाडे लावा जी लवकर वाढतात आणि लवकरच फळे देण्यास सुरुवात करतात. तर जाणून घेऊया येत्या बागेत पावसाळ्यात कोणती फळ झाडे लावता येतील. 

केळी

हिंदू धर्मात केळीच्या झाडाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. असे म्हणतात की भगवान श्रीविष्णू आणि लक्ष्मीदेवी  यामुळे प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो. पपईप्रमाणे, केळीचे झाड देखील मोठे असते, परंतु आपण त्याचे रोप एका कुंडीत देखील सहजपणे लावू शकतो. जेव्हा झाड वाढू लागते तेव्हा तुम्ही ते बाहेर काढू शकता आणि जमिनीत लावू शकता. केळीच्या रोपाची इतर झाडांपेक्षा जास्त काळजी घ्यावी लागते. तुम्ही एका वेळी 3 ते 4 झाडे लावू शकता. कुंडी अशा ठिकाणी ठेवा जेथे थेट सूर्यप्रकाश नसेल. मजबूत सूर्यप्रकाशामुळे रोप जळू शकते. केळीची लागवड करण्यासाठी सुपीक मातीचा वापर करावा.

पेरू

पेरूची झाडे ही कलमी असतात किंवा कलमांपासून वाढतात. याचे फळ अतिशय ताजे आणि गोड असते. तसेच, त्याचा सुगंधही खूप चांगला असतो. हे कच्चे देखील खाऊ शकता. पेरूची मुळे कमी पसरतात, त्यामुळे तुम्ही ते सहज लावू शकता. पेरू खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये अनेक आरोग्यदायी घटक असतात. पेरू खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. 

सीताफळ

बाहेरून कडक आणि आतून मऊ असे सीताफळ हे लोह आणि व्हिटॅमिन सीने समृद्ध आहे. हे एक अतिशय चविष्ट फळ आहे जे अनेक आजारांपासून संरक्षण करते. सीताफळाची पाने देखील खूप फायदेशीर आहेत. या रोपाची वाढ उष्ण आणि कोरड्या हवामानात वेगाने होते. खूप थंड ठिकाणी त्याची वाढ व्यवस्थित होत नाही. अगदी कमकुवत आणि खडकाळ जमिनीवरही हे सहज उगवता येते. त्याची रोपे लावण्यासाठी जुलै हा सर्वोत्तम काळ आहे.

पपई

पपई हे एक फळ आहे जे पिकल्यावर तर स्वादिष्ट लागतेच, पण कच्चे असताना देखील आपण खाऊ शकतो.कच्च्या पपईपासून अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. पपईच्या झाडाची उंची फक्त 20 ते 25 फूट असते. लागवड केल्यानंतर या झाडावर तुम्हाला लवकरच फळे दिसू लागतील. पपई पिवळी होण्याची वाट पाहू नका. हिरवी पपई मोठी झाली की ती झाडावरून काढा आणि ती पिकण्यास ठेवा. जर तुमचे कोलेस्ट्रॉल वाढले असेल, तसेच तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही पपईचे सेवन करायला हवे. तसेच पपई पोटाचे आरोग्य राखण्याबरोबरच आपली रोगप्रतिकार शक्तीही मजबूत करते. बाळंतिणीला तर आवर्जून कच्च्या पपईची भाजी खायला देतात. 

मलबेरी किंवा तुती 

मलबेरी किंवा तुतीचे झाड खूप वेगाने वाढते. एकदा झाड मोठे खाल्यावर तुम्ही त्याची फळे दीर्घकाळ खाऊ शकता. मलबेरीची चव खूप गोड असते. या फळांचा रंग लाल आणि गडद जांभळा असतो. त्यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन ए इत्यादी असल्याने हे फळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. सर्दी असो वा लघवीशी संबंधित कोणतीही समस्या, मलबेरी खाल्ल्याने या समस्यांपासून सुटका मिळते. याशिवाय हे फळ पोटासाठीही फायदेशीर आहे.

ही झाडे तुम्ही घरच्या अंगणात लावू शकता.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From घर आणि बगीचा